पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भन्साळी लवकरच बनवणार चित्रपट

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भन्साळी लवकरच बनवणार चित्रपट

नेहमीच वेगळ्या कथांच्या शोधात असलेल्या संजय लीला भन्साळी यांना आता एक नवी स्क्रिप्ट हाती लागली आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर भन्साळी चित्रपट तयार करणार असून यावर्षाअखेरीस हा सिनेमा रिलीज देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे. १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केला यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर दुसरे 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यात आले. या घटनेवर आधारीत चित्रपट भन्साळी बनवणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्यासोबत भूषण कुमार यांचेही नाव या चित्रपटाशी जोडलेले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशप्रेमावर आधारीत असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या सगळीकडेच या 'सर्जिकल स्ट्राईक'वर भरभरुन बोलले जात आहे. टीका आणि स्तुती अशा दोन्ही स्वरुपात ही चर्चा सुरु आहे.


सलमान खानच्या सांगण्यावरुन परतणार नवज्योत सिंह सिद्धू परतणार कपिलच्या शोमध्ये?


 अभिषेक कपूर करणार दिग्दर्शन


चित्रपटाचे काम सुरु झाले असून हा चित्रपट अभिषेक कपूर दिग्दर्शित करणार असल्याचे कळत आहे. अभिषेक कपूर यांनी नुकताच आलेला केदारनाथ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. सर्जिकल स्टाईक या चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर भन्साळी, भूषण कुमार यांच्यासोबत महावीर जैन हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका कसा असेल अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आधारीत विकी कौशलचा ‘उरी’ हा चित्रपट आला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता.आता देशाने केलेले हे दुसरे सर्जिकल स्ट्राईक असून त्यावर चित्रपट करण्याचा निर्णय संजय लीला भन्साळी यांनी घेतला आहे.


vickey kaushal uri


मलायका- अर्जुन एप्रिलमध्ये अडकणार विवाहबंधनात


 भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी चित्रपट


भारत- पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती असताना अशा प्रकारचे चित्रपट बनवले जाऊ नये अशी प्रतिक्रिया उमटत असताना हा चित्रपट भारतीय जवानांचे कौतुक करण्यासाठी केले जात असल्याचे  भन्साळी यांचे म्हणणे आहे. बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्धवस्त करत तेथील २०० ते ३०० दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय वायूसेनेचे हे साहसी कार्य संपूर्ण जगाला कळावे हे त्यामागील उद्दिष्टय आहे. त्यामुळे हा चित्रपट तयार होणार आहे. शिवाय या धरतीवर आधारीत मालिकादेखील लवकरच तयार करण्यात येणार आहे.


आणि शिल्पा शेट्टीला आली 'अक्की'ची आठवण


टीव्हीवर येणार मालिका


चित्रपटासाठी अद्याप स्टारकास्ट ठरलेली नाही. पण लवकरच या चित्रपटासाठी स्टारकास्ट फायनल करण्यात येईल, असे देखील कळत आहे. पण त्याआधी टीव्हीवर देखील या साहसी शौर्याचे वर्णन करणारी मालिका येणार आहे. मालिकेत १४ फेब्रुवारीच्या घटनेपासून ते भारताच्या वायूदलाने केलेले सर्जिकल स्ट्राईटक ते विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांची देशवापसी याचा यामध्ये समावेश असणार आहे. सध्या या मालिकेसाठी अनेक नावे पुढे येत आहे. यातील काही नाव ‘पुलवामा- डेडली अटॅक’, ‘सर्जिकल स्ट्राईक २.०’, ‘हिंदुस्तान हमारा’, ‘हाऊ इज जोश’ अशी काही नावे या मालिकेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. आता ही मालिका कोणत्या चॅनेलवर सुरु होणार आहे. याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नाही.


(फोटो सौजन्य-Instagram)