ड्रग्ज प्रकरणातून सुटका मिळाल्यानंतर भारती सिंह परतली कपिल शर्मा शो सेटवर

ड्रग्ज प्रकरणातून सुटका मिळाल्यानंतर भारती सिंह परतली कपिल शर्मा शो सेटवर

गांजा प्रकरण अडकलेल्या भारती सिंहला काहीसा दिलासा मिळाला आहे. जामिन मिळाल्यानंतर ती गायक आदित्य सिंहच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दिसली होती. पण आता ती तिच्या कामावर परतणार आहे. अर्थात कॉमेडीचे काम तिने पुन्हा सुरु केले आहे. सध्या ती ‘द कपिल शर्मा’ मध्ये लल्ली नावाचे एक पात्र साकारत आहे. त्याचे शुटींग तिने पुन्हा सुरु केले असून सेटवरील एक फोटो शेअर करत तिने ही बातमी फॅन्सपर्यंत पोहोचवली आहे. गांजा प्रकरणात भारतीचे नाव आल्यापासून तिला या शोमधून कपिल शर्माने हकलवले अशा बातमच्या समोर येत होत्या. पण तिने शेअर केलेल्या या फोटोनंतर या बातम्या या केवळ अफवा होत्या हे सिद्ध होते. दरम्यान जाणून घेऊया या संदर्भातील विस्तृत माहिती

मुंबई एअरपोर्टवर हरवले जुही चावलाचे डायमंडचे कानातले, शोधण्यासाठी मागितली मदत

सेटवरचा फोटो केला शेअर

भारतीने नुकताच तिच्या अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. यामध्ये लाल रंगाचा एक ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. लाल ड्रेस, भांगेत सिंधूर एखाद्या नव्या नवरीसारखी ती सजली आहे. या फोटोखालील कॅप्शनमध्ये तिने कपिल शर्मा शोचा उल्लेख केल्यामुळेच या गोष्टी स्पष्ट होताना दिसत आहे. त्यामुळे लल्ली हे पात्र पुन्हा एकदा साकारताना भारती सिंह दिसणार आहे. ज्यावेळी भारतीला अवैद्य गांजा बाळगल्याप्रकरणी NCB ने ताब्यात घेतले होते. त्यावेळीच कपिल शर्मा शोमधून तिची हाकालपट्टी करण्यात आल्याची एक बातमी वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली. ज्यामुळे भारती आणि कपिल या दोघांवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीवर गांजाचा आरोप असल्यामुळे फॅन्सनी तिला ट्रोलही केले. तर कपिल शर्माने माणुसकी न राखता काहीही सिद्ध होण्याच्या आधी भारतीला शोमधून काढून टाकले. पण प्रत्यक्षात असे काहीही नव्हते. कपिल या संदर्भात कधीत मीडियासमोर येऊन काहीही बोलला नव्हता. तो कायम भारतीच्या पाठिशी होता. हे त्याने सिद्ध केले. त्यामुळे आता जर तुम्ही भारतीचे फॅन्स असाल तर तुम्हाला लवकरच ती या शोमध्ये दिसेल.

भूमी पेडणेकरचा 'दुर्गामती' निघाला फुसका बार, साऊथ चित्रपटाचा रिमेक

पुनीत पाठकच्या लग्नात केला कपल डान्स

डान्सर पुनीत पाठक हा ही नुकताच विवाहबंधनात अडकला. त्याच्या लग्नाला भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया दोघांनीही हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या लग्नात त्या दोघांनी एक खास असा परफॉर्मन्सदेखील दिला. ज्यामुळेही तिला ट्रोल करण्यात आले. भारती गांजा प्रकरणात अडकल्यापासून तिच्या फॅन्समध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे तिच्यावर मिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहे. पण भारतीला आता या कमेंट्सची सवय झाली असावी. कारण तिने या संदर्भात कोणत्याही प्रतिक्रिया दिेलेल्या नाहीत. 

गांजा बाळगणे पडले महागात

NCB कडून सध्या ड्रग्जसंदर्भात अधिक कसून चौकशी सुरु आहे. खारदांडा परीसरात ड्रग्जची विक्री करणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले. या तरुणाकडून गांजा आणि अन्य प्रकारचे ड्रग्ज मिळाले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अनेक नावांचा खुलासा करण्यात आला. ज्यामध्ये कॉमेडी क्वीन भारती सिंह हिचे देखील नाव होते. या आधारावरच भारतीसिंहच्या प्रोडक्शन ऑफिसवर आणि घरावर छापा मारण्यात आला. यामध्ये तिच्या घरातून तब्बल 86.5 ग्राम इतका गांजा सापडला. गांजा संदर्भात त्यांची कसून चौकशी केल्यानंतर हर्ष आणि भारती यांनी  याचे सेवन केल्याचे कबूल केले. त्यानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली. त्यांना 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पण या दोघांनी जामिन अर्ज केला. कोर्टाने या दोघांचा जामिन मंजूर केला असून या दोघांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या संदर्भात भारती सिंहने काहीही मत व्यक्त केलेले नाही. 

दिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब