भोजपुरी स्टारची मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

भोजपुरी स्टारची मुलगी करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

स्टार किड्सनी चित्रपटात येणे हे काही नवे नाही. जान्हवी कपूर, सारा खान ही आताची काही नावे आहेत. पण आता एका भोजपुरी स्टारची मुलगी चक्क बॉलीवूड डेब्यु करणार आहे. हा स्टार आणखी कोणी नसून रविकिशन आहे. रविकिशनची मुलगी रीवा किशन बॉलीवूडमध्ये  पदार्पण करत असून तिचा पहिला चित्रपट ‘सब कुशल मंगल’ असल्याचे कळत आहे. त्यामुळे आता आणखी एका नव्या चेहऱ्याची भर बॉलीवूडमध्ये पडणार आहे. 


सारा खान आणि कार्तिक आर्यन फायनली करणार रोमान्स


ravikishan rivakishan


पाहा 'डोक्याला शॉट' चित्रपटाचा टीझर


चित्रपटाची स्टारकास्ट निश्चित


आता तुम्हाला या चित्रपटाचे नाव कळाले. आता स्टारकास्टबद्दल सांगायचे झाले तर या चित्रपटात रीवा किशन पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मासोबत काम करणार आहे. याचाच अर्थ आणखी एक स्टार किड चित्रपटातून डेब्यू करणार आहे. तो म्हणजे प्रियांक. या चित्रपटाचे कास्टिंग पूर्ण झाले असून पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे शुटींग सुरु होणार असल्याचे निर्मात्यांकडून सांगण्यात आले आहे. आता कथेबद्दल सांगायचे झाले तर चित्रपट विनोदीपटात मोडणारा असून कथा झारखंडची असल्याचे कळत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अद्याप सुरुवात झाली नसली तरी स्टारकास्ट मात्र निश्चित झाली आहे. 


रोहित शेट्टी-सलमान खान करणार एकत्र काम 


रीवाने गिरवले अभिनयाचे धडे


रविकिशन याची मुलगी रीवाने दीड वर्ष अमेरिकेत राहून अभिनयाचे धडे घेतले आहेत. शिवाय ती वर्षभर नसरुद्दीन शाह यांच्यासोबतही एका नाटकात काम करत होती. त्यामुळे अभिनयाचे धडे तिने चांगलेच गिरवले आहेत. शिवाय ती मॉडेलिंगही करते. तिने तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर देखील केले आहे. तिच्या प्रोफाईलवरुन तिला अभिनयाची नृत्याची विशेष आवड असल्याचे दिसून येते.  आता ज्या चित्रपटातून ती डेब्यू करत आहे त्या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, ज्या नितिन मनमोहन यांनी रविकिशन यांना ओळख मिळवून दिली. तेच रीवाच्या सिनेमाचे निर्माते आहे. त्यामुळे आता रीवाला नितिन मनमोहन रविकिशनसारखे लकी ठरतात का ते पाहायला हवे.

प्रियांकही करतोय डेब्यु 


पद्मिनी कोल्हापुरेचा मुलगा प्रियांक शर्मा देखील रीवासोबत डेब्यु करत आहे. काही दिवसांपूर्वी पद्मिनी कोल्हापुरेने प्रियांकचा फोटो शेअर करत अभिमान वाटत असल्याचे म्हटले होते. 


priyank sharma-padmini


हे स्टार किड्सही करणार डेब्यु


२०१९ या वर्षात अनेक स्टारकिड्सची एंट्री होणार असे म्हटले जात आहे. यात सगळ्यात आधी नाव येत आहे ते परेश रावल यांचा मुलगा आदित्य आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिचं.. कारण ते स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटात दिसणार आहे.  सनी देओलचा मुलगा करण देओल (पल पल दिल के पास), मोहनीश बेहलची मुलगी प्रनूतन (नोटबूक), सुनील शेट्टीचा मुलगा अहान ( RX100 तेलुगु सिनेमाचा हिंदी रिमेक), संजय लीला भंसाळीची भाची शर्मिन आणि जावेद जाफरीचा मुलगा मिजान (अनाम), डैनी डेंजोपाचा मुलगा रिन्जिंग (स्क्वॉड) , पुनम ढिल्लनचा मुलगा अनमोल ठकेरिया (Tuesday and fridays), भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी (मर्द को दर्द नही होता) या चित्रपटातून दिसणार आहे. ही यादी इथेच संपत नाही तर अनेक स्टारच्या भाची, पुतणी, नात चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.


 (फोटो आणि व्हिडिओ सौजन्य- Instagram)