ADVERTISEMENT
home / मनोरंजन
भूमीसोबत असं काय घडलं की, तिला सहन करावा लागतोय ‘हा’ त्रास

भूमीसोबत असं काय घडलं की, तिला सहन करावा लागतोय ‘हा’ त्रास

प्रत्येक स्त्रीसाठी तिचा चेहरा फार महत्त्वाचा असतो. त्यात जर ती स्त्री अभिनेत्री असेल तर तिचा चेहरा तिच्या करिअरचा एक भाग असतो. मात्र जर एखाद्या अभिनेत्रीला तिच्या भूमिकेसाठी तिचा चेहराच गमवावा लागला तर… हे ऐकूनच एखादीचा थरकाप उडू शकतो. मात्र बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अशाच एका  भयानक प्रसंगातून बचावली आहे. ‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भूमीला कदाचित तिचा चेहरा गमवावा लागला असता. अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू सध्या ‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान व्यस्त आहेत. भूमी या चित्रपटात ‘चंद्रो तोमर’ची भूमिका साकारत आहे तर तापसी पन्नू चंद्राजीची बहीण ‘प्रकाशी’ यांची भूमिका साकारत आहे. या दोघी जगातील सर्वात वयस्कर शार्पशूटर आहेत. या चित्रपटात या भूमिका साकारण्यासाठी भूमी आणि तापसी प्रचंड मेहनत घेत आहेत. या भूमिकांसाठी त्या दोघींना कमीत कमी तीन तास मेकअपसाठी द्यावे लागतात. भूमी अशा हेवी मेकअपमध्ये भर उन्हात जवळजवळ आठ ते दहा तास काम करत होती. कडक उन्हात शूटिंग केल्यामुळे भूमीचा चेहरा बर्न झाला आहे. मात्र भूमीने ही गोष्ट लगेच कोणाला न सागंता तसेच शूटिंग सुरू ठेवले. ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर जळल्यासारखे डाग पडले आहेत. हेवी मेकअपसाठी वापरण्यात येणारी केमिकल्स आणि प्रखर सुर्यकिरणे यामुळे तिच्या चेहऱ्याचे फारच नुकसान झाले आहे.

Bhumi Pednekar Burn face

डॉक्टरांचा भूमीला सल्ला

भूमीला तिच्या डॉक्टरांनी या समस्येवर एक नैसर्गिक उपचाराचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी भूमीला कोरफडाचा गर चेहऱ्यावर लावण्यास सांगितले आहे. भूमीने तिच्या चेहऱ्यावर हा उपचार करण्यास सुरूवात केली आहे. भूमी चेहऱ्यावर कोणतेही मेडीकेटेड औषध अथवा उत्पादन लावत नाही आहे. लवकरच ती यातून बाहेर पडेल अशी आशा तिच्या चाहत्यांना वाटत आहे.  भूमी नेहमीच तिच्या प्रत्येक भूमिकेसाठी नवनवीन प्रयोग करत असते. तिच्या जोर लगाके हईशा मधील भूमिकेसाठी तिने तिचे वजन वाढवले होते. त्यानंतर डाएट आणि व्यायाम करून तिने पुन्हा वजन कमी केले होते. “सांड की आंख” या चित्रपटासाठीदेखील भूमीने तिच्या चेहऱ्याची पर्वा केली नाही.

Bhumi Pednekar Burn face3

ADVERTISEMENT

तापसी आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र

तापसी आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या पोस्टरमध्ये तापसी आणि भूमी यांनी उत्तरप्रदेशातील एक टिपिकल पेहराव केला आहे. घागरा आणि शर्ट त्यावर ओढणी असा त्यांचा टिपिकल पेहराव असून त्यांनी हातात बंदूक घेतली आहे. ही बंदूक नुसती शो बाजी नाहीतर त्यांच्या चेहऱ्यावर शार्प शूटर असल्याचा आत्मविश्वासही झळकत आहे.  ‘तन बुढा होता है, मन बुढा नही होता’ अशी टॅग लाईन देऊन या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. चंद्रो आणि प्रकाशी तोमर या शूटर आजींच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. उत्तरप्रदेशातील या आजी साधारण 90 वर्षांच्या आहेत. पण आजही त्या बंदुकीचा निशाणा चोख लावू शकतात. या शूटर आजींना आतापर्यंतअनेक मेडल्स  मिळालेली आहेत. 8 मुलं आणि 15 नातवंडांचा सांभाळ करत त्यांनी बंदुक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी बंदुक चालण्याचे प्रशिक्षण कधी आणि का सुरु केले ? या मागेही एक रंजक कथा आहे.

शिल्पा शेट्टीने मुलगा वियान सोबत केलं वर्कआऊट

खरंच महेश भटने कंगनावर फेकली होती का चप्पल

मिस वर्ल्डपासून ते हॉलीवूडपर्यंतचा प्रियांका चोप्राचा बदललेला लुक आहे कसा

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

19 Apr 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT