‘पति,पत्नी और वो'नंतर भूमी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात

‘पति,पत्नी और वो'नंतर भूमी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात

अभिनेत्री भूमी पेडणेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘पति,पत्नी और वो’ या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच तिच्या बोल्ड लुकची आणि डायलॉगची सगळीकडे चर्चा होत आहे. आतापर्यंत आलेल्या तिच्या चित्रपटांनी तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली आणि आता आणखी एका चित्रपटामुळे तिची हमखास चर्चा होणार आहे. कारण भूमीला एक ऐतिहासिक चित्रपट मिळाला आहे असे कळत आहे. या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेत दिसणार असून या चित्रपटानंतर ती लगेचच या ऐतिहासिक चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.

श्रीदेवीच्या आठवणीने बोनी कपूर भावूक

भूमी साकारणार दुर्गावतीची भूमिका

Instagram

पिरियॉडीक चित्रपटांचा सध्या ट्रेंड सुरु आहे. अर्जुन कपूरचा ‘पानिपत’ हा चित्रपटही लवकरच फ्लोअरवर येणार आहे. अजय देवगणचा ‘तान्हाजी’ हा चित्रपटसुद्धा आहे.  त्यासोबत आता चर्चा होत आहे ती दुर्गावती या चित्रपटाची. राणी दुर्गावती या गोंडावाच्या(पटना) राणी होत्या. त्या लढवय्या होत्या. त्यांच्या पराक्रमाच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लढवय्येपणाची आणि पराक्रमाची आठवण करुन देण्यासाठीच या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात राणी दुर्गावतीच्या भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. या चित्रपटाची तिची तयारी सध्या सुरु झाली आहे. 

चित्रपटाबद्दल अधिक माहिती नाही

Instagram

भूमी पेडणेकर दुर्गावतीच्या भूमिकेत दिसणार असली तरी अद्याप .या चित्रपटाबाबत फार काही कळले नाही. या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, इतर स्टारकास्ट याबद्दल अद्याप काहीच माहिती नाही . पण हा चित्रपट लवकरच येणार आहे असे कळत आहे.  त्यामुळे या चित्रपटाच्या अपडेटसाठी थोडी वाट तरी नक्कीच पाहावी लागणार आहे

पति, पत्नी और वोमध्ये बोल्ड अंदाज

जर तुम्ही ‘पति, पत्नी और वो’ चा ट्रेलर पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल ती अशी की या मधील पत्नी ही काही साधी सुधी नाही. इतर वेळी चित्रपटात नेहमी घर की मुर्गी दाल बराबर दाखवण्यात येते. पण इथे असे काहीच दाखवण्यात आले नाही. उलट भूमी पेडणेकर या चित्रपटात अधिक बोल्ड अंदाजात दिसून येत आहे.

हिना पांचाळचा गोव्यामध्ये हॉट 'हिप्स डोन्ट लाय' डान्स

हिट चित्रपटांची मालिका

Instagram

भूमी पेडणेकरने आता पर्यंत फारच कमी काम केलं असलं तरी तिने चित्रपटांची निवड नेहमीच चांगली केली आहे. नुकताच तिचा ‘सांड की आँख’ आणि ‘बाला’ चित्रपट येऊन गेला आणि आता  या नव्या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या करिअरचा विचार केला तर ती ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटापासून तिने करीअरला सुरुवात केली. या चित्रपटात ती आयुषमान खुरानासोबत दिसली. या चित्रपटात तिचे वजन खूपच जास्त होते. पण त्यानंतर तिने तिच्यात बराच बदल घडवला आणि आता संपूर्ण वेगळी भूमी आपल्यासमोर आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.