Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा

Bigg Boss 14: कविता कौशिकची पुन्हा एकदा एंट्री, राहुलला मिळाला प्रेक्षकांचा पाठिंबा

Bigg Boss च्या घरात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. गेल्या आठवड्यात डबल एविक्शनचा झटका दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या घरामध्ये कविता कौशिकची एन्ट्री झाली आहे. पुन्हा एकदा कविता कौशिकची एन्ट्री अशापद्धतीने होणे अनेकांना धक्का देणारे होते. पण वीकेंड का वारमध्ये सलमानने काही गोष्टी सांगितल्यानंतर आपली खराब झालेली इमेज बदलण्यासाठी कविताला पुन्हा एकदा घरी पाठवण्यात आल्याचा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या आठवड्यात कोण जाईल असा प्रश्न पडला असताना राहुल वैद्य हा मराठमोळा स्पर्धक प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळे या आठवड्यात सेफ झाला आहे. दरम्यान या आठवड्यात सलमानने नेमके कोणाला काय खडेबोल सुनावले ते जाणून घेऊया.

पूनम पांडेच्या त्या अश्लील व्हिडिओविरोधात गोव्यात तक्रार दाखल

राहुल वैद्यची केली तारीफ

Instagram

गेल्या आठवड्यात घरातल्या सगळ्या स्पर्धकांनी मिळून राहुल वैद्यला घराचा व्हिलन ठरवून टाकले. त्याच्यावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. राहुलच्या खासगी आयुष्यात जाऊन त्याचे संस्कार आणि त्याचे विचित्र वागणे याबद्दल बऱ्याच गोष्टी अनेकांनी सांगितल्या. पण प्रत्यक्षात त्याची काहीही चुकी नसल्याचे घरातील बाहेर सगळ्याच प्रेक्षकांना माहीत होते. त्यामुळे राहुलची काहीही चुकी नसल्याचे अनेकांनी कमेंट देऊन सांगितले. शिवाय सलमाननेही त्याची बाजू घेत इतरांना खडे बोल सुनावले होते. या वीकेंडच्या वारमध्ये सलमानने निकी- राहुलमध्ये मास्क टास्कच्यावेळी झालेली निकीची चुकी सांगत राहुलने टास्कमध्ये आपली पत राखली याचा आनंद मानत त्याची तारीफ केली. गेल्या वेळीही राहुलला त्याच्या वागणुकीचे सर्टिफिकेट मिळाले होते.

पवित्राला सुनावले खडेबोल

गेला आठवडा राहुलने गाजवल्यानंतर हा आठवडा पवित्रा-एजाजच्या भांडणाने गाजला. घरी कॅप्टन झालेल्या एजाजने नॉमिनेशनमधून वाचवले नाही म्हणून घरात जो तमाशा केला त्यामुळे घरात वातावरण काही काळासाठी तापले. पवित्रा पुनियाने आपले नियंत्रण सोडत एजाजला शिव्यांची लाखोळी वाहिली. जी नॅशनल टेलिव्हिजनवर अजिबात चांगली वाटली नाही. त्यामुळेच सलमानने तिला तिची चुकी दाखवत तिला चांगल्या शब्दात सुनावले. त्यामुळे पवित्रा ही देखील ऑफ ट्रॅक होत असल्याचे सांगितले. पवित्राला तिची चूक दाखवत सगळ्या गोष्टी पूर्ववत करुन घरात चांगले राहण्याचा सज्जड दमही सलमानने पवित्राला दिला. 

Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

राहुलला मिळाले खूप प्रेम

राहुलचा खेळ पाहता त्याची काहीही चूक नसल्याचे सगळयांच्याच लक्षात  आले. याचा फायदा नक्कीच राहुलला झाला. राहुलला भरपूर मत मिळाली. त्यामुळे तो यंदाच्य नॉमिनेशन पासून सेफ झाला आहे. तर नैना सिंह ही मात्र या रेसमधून बाहेर पडल्यामुळे या आठवडयात ती घरातून बाहेर पडली आहे. पुन्हा नव्याने कानउघडणी करुन आलेली कविता कौशिक आणि अली गोनी हे नेमका कसा खेळ खेळणार हे आता पाहावे लागणार आहे. 


आता नव्या टास्कमध्ये कोणाची जादू चालणार, कॅप्टन म्हणून जास्मिन कशी कामगिरी करणार आणि नवा कॅप्टन कोण होणार? या सगळ्या गोष्टीची अनेकांना उत्सुकता आहे.

केएल राहुलने केला आथियाबरोबर फोटो पोस्ट, लवकरच स्वीकारणार का नाते याबाबत चाहते उत्साही