Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

बिग बॉस 13 (Bigg Boss 13) चालू झाल्यापासून असा एकही दिवस नाही की, या शो ची चर्चा रंगली नाही. अगदी बेस्ट बेड फॉरेवर पासून ते घरातील रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाच्या भांडणापर्यंत रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टींवरून चर्चा रंगलेली असते. बिग बॉसचा पहिला फिनाले एक महिन्याने लगेच होणार आहे. यावेळी वेगळी थीम असून आता या आठवड्यात रंगणाऱ्या फॅक्टरी टास्कनंतर फिनालेमध्ये एका स्पर्धकाची डायरेक्ट एंट्री होणार आहे. त्यासाठी सध्या सगळेच जीव तोडून खेळत आहेत. पण आता या टास्कनंतर ती कोणती स्पर्धक असणार जी फिनालेचं तिकीट सर्वात पहिले मिळवणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सिद्धार्थ आणि पारस यांच्यातील वाद अधिक चिघळत चालले असल्याचं दिसत आहे. घरामध्ये दोन गट झाले असून रोज नवी भांडणं दिसून येत आहेत. 

फॅक्टरी टास्कचं काय आहे महत्त्व?

बिग बॉसमध्ये अनेक टास्क करण्यात येतात आणि त्यातूनच स्पर्धक घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट होत असतात.  आता या फॅक्टरी टास्कचं महत्त्व आहे कारण या टास्कमधून फिनाले मध्ये जी टीम जिंकेल त्यातून एक महिला स्पर्धक डायरेक्टली फिनालेचं तिकीट जिंकणार आहे. तसंच ती स्पर्धक पुढची क्वीनदेखील असेल. घरातील पहिली क्वीन देवोलिना भट्टाचार्जी होती. तर आता यासाठी दोन टीम पाडण्यात आल्या आहेत. पहिल्या टीमचा कॅप्टन पारस असून त्याच्या टीममध्ये माहिरा शर्मा, रश्मी देसाई, देवोलिना आणि सिद्धार्थ डे असून दुसऱ्या टीमचा कॅप्टन सिद्धार्थ शुक्ला आहे. त्याच्या टीममध्ये शेहनाझ गिल, आरती सिंह, असीम, अबू मलिक, शेफाली बग्गा आहेत. पण या टास्कदरम्यान दोन्ही टीमदरम्यान घमासान वादावादी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की कोणाला यातून फायदा होईल हे सांगणं कठीण आहे. कारण या टास्कमध्ये देण्यात आलेल्या टॉय फॅक्टरी दरम्यान पारसच्या टीमने सिद्धार्थच्या टीमने केलेली 60 खेळण्यांची ऑर्डर रिजेक्ट केली. त्याचा परिणाम म्हणून सिद्धार्थच्या टीमनेदेखील पारसच्या टीमला ऑर्डर मिळवून दिली नाही. त्यामुळे आता फिनालेचं तिकिट मिळवण्यासाठी नक्की कोण पुढे असेल हे बघणं अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे. 

Bigg Boss 13: घरात होणार 3 हँडसमची एंट्री

टास्कदरम्यान देवोलिना - आरतीच्या मैत्रीमध्ये पडली फूट

देवोलिना आणि आरती यांची या घरामध्ये चांगली मैत्री झाली होती. पण त्यामध्ये रश्मी देसाईने फूट पाडल्याचं दिसून येणार आहे. रश्मीने देवोलिनाला अशा काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे देवोलिना आणि आरतीच्या मैत्रीमध्ये फूट पडणार आहे. यासाठी देवोलिनाने सिद्धार्थकडे जाऊन या गोष्टीचं समर्थन केलेलंही दिसून येणार आहे. पण हा आता कोणता नवा कंटेंट आहे की खरंच आरती आणि देवोलिनाच्या मैत्रीत फूट पडली आहे ते पाहावं लागेल. 

Bigg Boss 13: बंद करण्याची मागणी, सलमानचा शो पुन्हा एकदा विवादात

भोजपुरी स्टारची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

एका महिन्यात फिनाले असल्याने आणि दोन्ही आठवड्यात दोन दोन स्पर्धक बाहेर जाणार असल्याने लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री बिग बॉसमध्ये होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर यावेळी वाईल्ड कार्ड एन्ट्रीमध्ये भोजपुरी स्टार खेसारीलाल यादव याचं नाव असल्याचंही सांगण्यात येत आहे. याआधी कमाल आर. खान, मोनालिसा आणि विक्रम यांनी बिग बॉसमध्ये आपलं अस्तित्व सिद्ध केलं होतं. आता खेसारीलाल यादवदेखील आपला वेगळेपणा दाखवणार हे बघावं लागेल. तसंच खेसारीलालची एन्ट्री ही दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

Bigg Boss 13: एक्स बॉयफ्रेंडसोबत बेड शेअर करण्यास रश्मीने दिला नकार

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.