बिग बॉस मराठी सिझन 2 संपल्यानंतर #BB13 ला धमाकेदार सुरूवात झाली आहे. यंदाही बिग बॉसच्या 13 व्या सिझनप्रमाणे घरातही 13 सदस्यांची एंट्री झाली आहे. पण गंमत म्हणजे पहिल्या दिवसापासूनच कंटेस्टंट्समध्ये चढाओढ सुरू झाली आहे. जाणून घ्या काय झालं –
पहिल्याच दिवशी वादांना सुरूवात
बिग बॉसमधील कंटेस्टंट रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्लाने रविवारी बिग बॉसच्या घरात एंट्री केली. हे दोघंही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. पण काही कारणांमुळे त्यांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे कदाचित दोघांच्या वावरण्यात काहीसा तणाव दिसून येतोय. तर बिग बॉसने या दोघांनाही अशा परिस्थिती टाकलं आहे की, भांडण होणं साहजिक आहे. घराबाबत सांगताना सलमानने सांगितलं होतं की, दोन जणांना बेड शेअर करावा लागेल. याला नाव देण्यात आलं आहे बीएफएफ म्हणजे बेड फ्रेंड्स फॉरएव्हर. त्यानुसार बिग बॉसने रश्मी देसाई आणि सिद्धार्थ शुक्ला घरामध्ये एक बेड शेअर करण्यास सांगितलं. घरात सिद्धार्थ येताच रश्मीने प्रश्न उपस्थित केला की, आपण काय एकाच बेडवर झोपणार आहोत. पण रश्मीने या गोष्टीला लगेच नकार दिला. तेव्हा सिद्धार्थने सांगितलं की, हा बिग बॉसचा नियम आहे, त्यामुळे असं करावचं लागेल.
थोबाडीत मारण्यापर्यंत गेली मजल
रश्मी आणि सिद्धार्थ या एक्स कपलनंतर कंटेस्टंट पारस छाबडा आणि असीम रियाजमध्ये चांगलंच वाजलं. एवढं की पारसने असीमला म्हटलं की मी तुला थोबाडीत मारेन. यानंतर दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. पहिल्याच दिवशी ही गत आहे म्हटल्यावर येत्या काळात काय होणार, याचा विचार न केलेला बरा.
एक मराठी चेहरा नाही बिग बॉस 13 च्या मुख्य यादीत
बिग बॉस 13 सिझनमध्ये एकही मराठी चेहरा नाही. असो, या सिझनमध्ये बिग बॉसच्या घरात अनेक बदल करण्यात आले आहेत. तसंच शोच्या बदललेल्या फॉर्मेटमुळे कंटेस्टट्सना वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे. शोमधील 13 कंटेस्टंट्सपैकी पाच मेल कंटेस्टंट असून बाकी सर्व फिमेल कंटेस्टंट्स आहेत. यंदाच्या सिझनमध्ये कोएना मित्रा, रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, देवोलीना भट्टाचार्य, दलजीत कौर, पारस छाबडा, आरती सिंह, सिद्धार्थ डे, अबू मलिक, शहनाज गिल, माहिरा शर्मा, असीम रियाज आणि शेफाली बग्गा हे काही माहित असलेले तर काही अनोळखी चेहरे आहेत. तर शोमध्ये घराची मालकीण म्हणून दिसणार आहे अमिषा पटेल.
टास्कसाठी सर्वाधिक पसंती मिळाली सिद्धार्थ शुक्लाला
शोला सुरूवात होताच सर्वात आधी सलमान खानने मेल कंटेस्टंट्सची प्रेक्षकांना ओळख करून दिली. त्यानंतर सलमानने सर्व फिमेल कंटेस्टंट्स येईपर्यंत त्यांना डिस्पले एरियात थांबायला सांगितलं. त्यानंतर एक एक करून फिमेल कंटेस्टंट्सनी येऊन त्यांच्या टास्कनुसार एक एक पार्टनर निवडला. या कंटेस्टंट्स लिस्टमध्ये सर्वाधिक पसंती सिद्धार्थ शुक्लाला मिळाली तर सर्वात कमी पसंती अबू मलिकला.
पंजाबच्या कतरिना आणि सलमानचं हसू
शोमध्ये शेफाली बग्गा आणि शहनाज गिलने एकत्र एंट्री केली. पण शहनाजने लाईमलाईट खेचत स्वतःला पंजाबची कतरिना असं सांगितलं हे ऐकताच सलमान स्वतःचं हसू लपवता आलं नाही. शहनाजने सलमानसाठी गाणं म्हटलं आणि त्याच्यासोपबत डान्सही केला.
सोमवारी होणार सत्त्वपरीक्षा
सोमवारच्या एपिसोडमध्ये अमिषा पटेल एक इंटरेस्टींग टास्क घेऊन बिग बॉसच्या घरात एंट्री करणार आहे. पण यासाठी स्पर्धकांना कठोर मेहनत करावी लागणार आहे. जर तुम्हीही मराठी बिग बॉसला मिस करत असाल तर सध्या हिंदी बिग बॉस बघायला हरकत नाही.