राहुल वैद्यला मत देण्यासाठी दिशाने केले ट्विट, दिशाच्या होकाराची चाहत्यांनाही उत्सुकता

राहुल वैद्यला मत देण्यासाठी दिशाने केले ट्विट, दिशाच्या होकाराची चाहत्यांनाही उत्सुकता

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) सुरूवातीला लोकांच्या पसंतीला उतरलं नव्हतं. पण मराठमोळ्या राहुल वैद्यने दुसऱ्या आठवड्यापासून कमालीचा खेळ करत गाजवायला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीच राहुलने आपली मैत्रीण दिशा परमारला नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नासाठी मागणी घातली आहे. त्या दिवसापासून राहुल दिशाच्या उत्तराची वाट पाहत आहे. तर दिशाने अजूनही काहीही उत्तर दिलं नसलं तरीही तिच्या वागण्यातून मात्र तिचा राहुलला नक्कीच होकार असणर असा अंदाज चाहते लावत आहेत. दिशाच्या होकाराची चाहत्यांनीही उत्सुकता आहे. राहुल या आठवड्यात नॉमिनेट असून त्याला मत देण्यासाठी दिशाने ट्विट केले आहे आणि सोशल मीडियावर स्टोरीदेखील पोस्ट केली आहे. त्यामुळे आता चाहते अजून बुचकळ्यात पडले आहेत.

गौहर - झेद करणार 25 डिसेंबरला निकाह, प्री वेडिंगसाठी निवडले पुण्यातील रॉयल लोकेशन

दिशाच्या उत्तराची सर्वांनाच अपेक्षा

राहुल आणि दिशा एकमेकांना गेली दोन वर्ष ओळखत आहेत. बरेच वेळा या दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. मात्र दोघांनीही आतापर्यंत आपण केवळ मित्र असल्याचे म्हटले होते. मात्र राहुलने आता आपल्या मनातील भावना व्यक्त करत दिशाला लग्नासाठी सर्वांसमोर तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मागणी घातली आहे. राहुल सध्या तिच्या उत्तराची वाट पाहत असून दिशाने मात्र आपण उत्तर पाठवलं आहे (disha parmar replied to bigg boss contestant rahul vaidya proposal) असं ट्विट केलं होतं.  पण नक्की दिशाचं उत्तर काय आहे हे अजूनही कळलेले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर दिशाच्या प्रत्येक फोटोवर राहुलचे चाहते तिला उत्तर देण्याची विनंती करत आहेत. राहुल एक चांगला मुलगा असून तो उत्तम आहे असं म्हणत अनेकांनी दिशाला राहुलला होकार कळवण्याचीही विनंती केली आहे. इतंकच नाही तर दिशाला अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये ‘भाभीजी’ असंही म्हणत स्वीकारलं आहे. केवळ मुलंच नाही तर मुलीही दिशाला विनंती करत आहेत. नॅशनल टेलिव्हिजनवर अशा प्रकारे इतक्या रोमँटिकली मागणी घालणं हे खूपच सुंदर होतं असं प्रत्येकाला वाटत आहे. 

सना खानशी तुलना झाल्यामुळे सोफिया हयातला आला राग, अध्यात्मिक बाबतीत केले हे विधान

राहुलला दिशाचा पाठिंबा

दिशाचं उत्तर कळलं नसलं तरीही राहुल वैद्यला दिशा मनापासून पाठिंबा देत आहे हे मात्र दिसून येत आहे.  दिशाने नुकतेच आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये आणि ट्विटमध्येही राहुलला नॉमिनेशनमधून वाचवण्यासाठी मत दिले की नाही? असा प्रश्न करत त्याचे वोटिंग डिटेल्स शेअर केले आहेत आणि त्याला मत देण्याचे आवाहनही केले आहे. त्यामुळे दिशा नक्कीच राहुलच्या  प्रेमात  असून त्याला होकारच देणार असाही अंदाज चाहत्यांनी लावला आहे. राहुल आणि दिशा सोशल मीडियावर एकमेकांना नेहमीच कमेंट देत असतात आणि फोटोही पोस्ट करत असतात हे दिसून आले आहे. तसंच राहुलच्या आईनेही दिशासाठी आपली संमती काही दिवसांपूर्वी दर्शवली होती. त्यामुळे आता केवळ दिशा बिग बॉसच्या घरात जाऊन त्याला भेटून उत्तर देणार की राहुल बाहेर आल्यानंतर उत्तर देणार याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. पण इतके दिवस झाल्यामुळे आता राहुलही बेचैन झाल्याचं  विकेंड का वारमध्ये दिसून आलं होतं. मात्र आपण घरात आहोत आणि दिशा आपल्याला फॉलो करणार नाही असं होणार नाही इतका विश्वास  राहुलने दाखवला आहे आणि ट्विट करून दिशाने ते सिद्धही केले आहे. 

सोनाक्षी सिन्हा मालदिव्ज वेकेशनवर, बिकिनी लुक झाला व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक