ADVERTISEMENT
home / बिग बॉस
Bigg Boss 14 - पवित्रा आणि एजाज लवकरच देणार Good News, अडकणार विवाहबंधनात

Bigg Boss 14 : पवित्रा आणि एजाज खान लवकरच देणार Good News, अडकणार विवाहबंधनात

बिग बॉस (Bigg Boss 14) मध्ये नाते तयार होणे हे काही नवे नाही. अनेक जण इथे येऊन एकमेकांना भेटले आणि कायमस्वरूपी लग्नबंधनात अडकले. अशीच एक जोडी म्हणजे एजाज खान आणि पवित्रा पुनिया. या दोघांची बिग बॉसमध्येच मैत्री झाली आणि दोघेही प्रेमात पडले. एजाजला पवित्रा घरातून गेल्यानंतर तिच्यावरील प्रेमाबद्दल जाणवले आणि ती पुन्हा एजाजला भेटायला आली तेव्हाच त्या दोघांनीही एकमेकांना प्रेमाची कबुली दिली. पण हे केवळ पब्लिसिटी स्टंट होता असंही काही जणांना वाटलं. पण आता एजाज बाहेर आल्यानंतर आपल्या वडिलांनी लग्नाला परवानगी दिली असून पवित्रा आपल्या घरातील सर्व सदस्यांना आवडली असल्याचं एजाजने सांगितले आहे. तर दुसरीकडे पवित्राने लवकरच आपण गुड न्यूज देणार असल्याचेही सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये पवित्राने याबाबत खुलासा केला. लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे.

विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे नाते करणार का घोषित, चर्चांना उधाण

आमच्या भावना अतिशय खऱ्या आहेत – पवित्रा

पवित्राने एजाज बाहेर आल्यानंतर एक मुलाखत दिली असून यामध्ये आपल्या मनात एजाजबद्दल असणाऱ्या प्रेमाच्या भावना या अत्यंत खऱ्या असल्याचे सांगितले आहे. आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत त्या अगदी खऱ्या  आहेत आणि आम्ही दोघांनीही या भावना अगदी नॅशनल टीव्हीवर व्यक्त केल्या आहेत.  असं करण्यासाठी हिंमत लागते आणि ती आम्हा दोघांमध्येही आहे.  बिग बॉसच्या घरात राहतानाही आमच्यामध्ये  जे काही झाले त्यापैकी कोणत्याच गोष्टी खोट्या  नव्हत्या. आम्ही दोघे असेच आहोत आणि दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे असं पवित्राने खुलेपणाने सांगितले आहे. 

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत मालदीव्समध्ये करतेय रोमान्स

ADVERTISEMENT

हे नातं हळूहळू पुढे घेऊन जाऊ

पवित्राने एजाजसह नात्याबद्दल पुढेही खुलासा केला आहे, ती म्हणाली, ‘माझ्या मित्रमैत्रिणींनाही या नात्याबद्दल विश्वास नव्हता. तेदेखील या नात्याबद्दल सतत प्रश्न विचारून मला हैराण करत होते. पण हे कोणत्याही पब्लिसिटीसाठी नाही.  कारण स्वतःची इमेज कोणी का खराब करून घेईल. एजाज आणि मला दोघांनाही आमच्या नात्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही हे नातं हळूहळू पुढे घेऊन जाऊ. आमचं प्रेम खरं आहे. जेव्हा आम्ही दोन महिने एकमेकांपासून वेगळे राहिलो. तेव्हाच आम्हाला स्वतःच्या मनाला पारखून घ्यायला वेळ मिळाला.  दूर राहूनही आमच्या मनातील फिलिंग्ज बदलल्या नाहीत. त्यामुळे हेच सिद्ध होतं की, आम्हा दोघांमध्ये केवळ आणि केवळ प्रेमच आहे.  आम्हालाही याची जाणीव झाली आहे की, आमच्यामध्ये बाकी नाही तर फक्त आणि फक्त प्रेम आहे.’

कपिल शर्मा होणार दुसऱ्यांदा बाबा, चाहत्यांसोबत स्वतः शेअर केली गुड न्यूज

लवकरच देणार लग्नाची खुषखबरी

पवित्राने लग्नाबाबतही खुलासा केला आहे. पवित्रा आणि एजाजचे चाहते या दोघांच्या लग्नाबाबतही जाणून घ्यायला उत्सुक आहेत. पवित्रा म्हणाली की, ‘आम्हाला आताचा दिवस जगायचा आहे. हा आमच्यासाठी खूपच अविस्मरणीय काळ आहे. आम्ही एकमेकांबद्दल केवळ प्रेम व्यक्त करत आहोत. जेव्हा समोरचा माणूस आपल्यासाठी काहीही करायला तयार असतो तेव्हा आपणही त्याला तितकाच जीव लावतो असं मला वाटतं. एजाज आणि मी खूपच चांगले भविष्य निर्माण करू शकतो असं मला वाटतं.  वाट पाहा आम्ही लवकरच तुम्हाला गुड न्यूज देऊ.’ या तिच्या वक्तव्यामुळे एजाज आणि पवित्रा लवकरच लग्नबंधनात अडकतील याची त्यांच्या चाहत्यांना खात्री आहे.  

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
28 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT