Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो

Bigg Boss 14: कविता कौशिकचा सलमानवर गंभीर आरोप, सोडायचा आहे शो

यावर्षी सुरुवातीला अगदीच मरगळ वाटणाऱ्या बिग बॉसचा हा 14 वा सीझन हळूहळू रंगत चालला आहे. मराठमोळा राहुल वैद्य असो वा एजाज आणि कविता कौशिकची ठसन असो हल्ली रोज काही ना काहीतरी घरात घडतच आहे. पण आता या सगळ्यात वरचढ किस्सा ठरला आहे तो म्हणजे कविता कौशिकचा. इतर सर्वांना सोडून आता कविताने ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) चा होस्ट अर्थात निवदेक सलमान खान यालाच टारगेट केले आहे. कविताला एजाजबरोबरील वागण्यामुळे पहिल्याच आठवड्यात बाहेर जावे लागले होते. मात्र पुन्हा घरात मिळालेल्या प्रवेशानंतरही कविता बऱ्याचदा भांडतानाच दिसून येते. आता तिने सर्व राग सलमान खानवर काढला आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर आता या अभिनेत्रीने केले हॉट फोटोशूट, फोटो व्हायरल

अली आणि एजाजसह कविताचे जोरदार भांडण

अली आणि एजाजसह कविताचे जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले.  यामध्ये कविताने सलमानचे नाव घेत म्हटले की माझी केवळ आणि केवळ नेगेटिव्ह साईड बाहेर दाखविण्यात येत आहे. घरातील लोक मला सतत उकसवतात आणि मी काही बोलले तर तर ते सगळ्यांना वाईट वाटतं.  सलमान तर माझं ऐकतच नाही तो फक्त एजाजचं ऐकतो  असंही कविताने म्हटले आहे. इतकंच नाही तर रागात कविता म्हणाली की, ना तिला या शो ची ट्रॉफी हवी आहे ना तिला पैसे पाहिजेत. इथे मला राहायचंच नाही असा रवैया यावेळी कविताने घेतला आहे. कविताला एजाजने आपल्यासाठी काहीतरी खायला बनव असं सांगितल्यानंतर आपली ड्युटी झाल्यावर एजाजने काहीही बनवून घ्यावे असं तिने सांगितलं पण हे प्रकरण एक वेगळ्याच वळणावर गेलं आणि घरात खूपच मोठं भांडणं झालं. इतकं की कविताने एजाजला धक्काही दिला. याचा सर्व घरातल्यांनी विरोधही केला. पण यासाठी कविताला कोणतीही शिक्षा देण्यात आलेली नाही. 

मराठीतील या कलाकारांनी वजन कमी करण्यासाठी घेतली विशेष मेहनत

 

सलमान खान आपल्याला समजून घेत नाही

भांडण झाल्यानंतरही रूबिना आणि अभिनवने समजावल्यानंतरही कविताच्या मनात एकच गोष्ट आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार ‘हे घर म्हणजे नरक असून इथे तिला कोणीही समजून घेत नाही. तिची केवळ नकारात्मक बाजू दाखवण्यात येत आहे.  सलमानही आपल्याला समजून घेत नाही. मला वाटलं होतं की सलमान माझी बाजू ऐकून घेईल पण त्याला त्यात कोणताही इंटरेस्ट नाही.  त्याला केवळ एजाजचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे.’ इतकंच नाही तर कविता म्हणाली, ‘मी त्याच्या प्रत्येक बोलण्यावरून कळून चुकले आहे की मी बाहेर कशी दिसत आहे या शो मधून. मला या शो मध्ये  राहायचं नाही. मला ट्रॉफी पण नको आणि पैसे पण नकोत’. कविताने सलमानवर केलेले हे गंभीर आरोप तिला शनिवारच्या विकेंड वार मध्ये महाग तर पडणार नाहीत ना असा प्रश्न आता तिच्या चाहत्यांना पडला आहे. कारण तिने एजाजवर हात उचलणं ही तिची चूक असतानाही ती कोणाचंही ऐकून घ्यायला तयार नाही आणि हे आता तिला शनिवारी ऐकून घ्यावं लागेल असा अंदाज सध्या लावला जात आहे. सलमान आता कविताचे आरोप कशा प्रकारे खोडून काढेल याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशीचं हे आहे ब्युटी सिक्रेट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक