Bigg Boss14 :एजाज -कविताच्या मैत्रीत फूट, एजाजवर केले आरोप

Bigg Boss14 :एजाज -कविताच्या मैत्रीत फूट, एजाजवर केले आरोप

Bigg Boss 14 च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्यानंतर आता नवी स्पर्धा सुरु झाली आहे. घरातील कॅप्टन कोण होणार? यासाठी आता रेड झोन- ग्रीन झोनमध्ये स्पर्धा सुरु झाली.रेड झोनमधून नॉमिनेट झालेले सगळे स्पर्धक ग्रीन झोनमध्ये जाण्यासाठी टास्क दरम्यान वेगवेगळे षडयंत्र रचत आहेत. यामध्ये अनेकांची मैत्री आणि चांगले संबंध पणाला लागले आहेत. या आधीच घरात मैत्रीवरुन अनेक वादंग निर्माण झाले आहेत आणि आता नव्याने आलेली एजाजची मैत्रीण कविता कौशिक- यांच्या मैत्रीत आता दरी निर्माण झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. पण या दोघांमध्ये नेमकं काय झालं आहे? जाणून  घेऊया.

Bigg Boss 14 : राहुल वैद्यची वाढतेय क्रेझ, प्रेक्षकही देतायत दाद

 

एजाज झाला कॅप्टन

कॅप्टनसीसाठीच्या टास्कमध्ये वर्ल्ड टूर असा एक गेम ठेवण्यात आला होता. रेड झोनमधील स्पर्धक ग्रीन झोनमधील स्पर्धकांच्या हातातील टूरिस्ट बॅग खेचून घेणार असा टास्क होता. या टास्क दरम्यान रेड झोनच्या स्पर्धकांनी स्ट्रॅटर्जी करुन  एजाजला या खेळात जिंकू देण्याचा निर्णय घेतला. अभिनव- रुबिना- जास्मिन या तिघांनाही हा निर्णय मनापासून पटलेला नसतानाही एजाजला कॅप्टन करण्यात आले आणि कविताला  अगदी दोनच दिवसात कॅप्टन पदावरुन खाली आणण्यात आले. घरातील अनेकांना एजाज कॅप्टन झाला आहे हे पटले नसले तरी रेड झोनमधील पवित्र-निकी- राहुल-जान यांना मात्र आनंद झाला आहे.

गळ्यात मंगळसूत्र दिसल्याने या मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चेला उधाण

कॅप्टन झाल्यावर वाढले वाद

एजाज कॅप्टन झाल्यानंतर घरात कविता आणि त्याच्यामध्ये खटके उडू लागले आहेत.  नियमांचे पालन करणारा एजाज कविताच्या कामाध्ये चूक काढत असल्याचे आढळला आणि त्यामुळे कविता- एजाजचे भांडण झालेले यामध्ये दिसले. घरात माईक घालणे अनिवार्य आहे. पण कविताने माईक काढल्यानंतर त्याने माईक घालण्याची मागणी केली. पण यानंतर चिडलेल्या कविताने एजाजवर आरोप करायला सुरुवात केली. एजाजच्या मैत्रीमुळे कविताशी कोणी बोलत नसल्याचे तिने म्हटले आहे. कॅप्टनपद मिळाल्यानंतर  एजाज हा उद्धट झाला आहे. या घरात तुझा उद्धटपणा आधीही दिसून आला आहे, असे म्हणत कविताने कॅप्टनचा अपमान केला आहे. नव्या एपिसोडमध्ये कविताचा हा रुद्रावतार दिसून आला आहे. त्यामुळे रेड झोनच्या काही स्पर्धकांनाही कविताचे वागणे खटकू लागले आहेत. 

कविता हिटलिस्टवर

कविता कौशिक हा टीव्हीवरील नावाजलेला चेहरा आहे. ती एक मोठी अभिनेत्री असून देखील कॅमेऱ्यावरील फुटेज मिळवण्यासाठी ती उगाचच एजाजवर आवाज चढवताना दिसत आहे. एजाजवर आरोप केल्यानंतर अभिनव- रुबिना- जास्मिन यांच्या गटात जाऊन ती बसताना दिसत आहे. आता या नव्या मैत्रीमुळे सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

घरात सुरु होतेय नवी लव्ह-स्टोरी

घरात एजाज- पवित्राचे जोरदार भांडण दिसू आले आहे. टास्क दरम्यान किंवा कामांना घेऊन एजाज-पवित्राचे भांडण होताना दिसले आहे. अनेकांना त्यांच्या भांडणामध्ये प्रेम दिसले होते. त्यामुळे ही लव्ह स्टोरी बिग बॉसमध्ये दिसावी असे वाटत होती. पवित्रा- एजाजमध्ये मैत्रीचे रंग फुलत असताना त्यांच्यात प्रेमही कधीतरी होईल असे अनेकांना वाटत आहे. 


पण आता बदललेले रंग पाहता पुढे काय होईल ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण अब सीन पलटेगा!! तबादल्यानंतर आता एजाज नेमका काय निर्णय घेतो ते नव्या एपिसोडमध्ये कळेल.

Bigg Boss 14: राहुल वैद्यने जान सानूवर केले नेपोटिझमचे आरोप