Bigg Boss 14: कविता कौशिक-अभिनव शुक्ला आमनेसामने, आरोप-प्रत्योरोपाने रंगला एपिसोड

Bigg Boss 14: कविता कौशिक-अभिनव शुक्ला आमनेसामने, आरोप-प्रत्योरोपाने रंगला एपिसोड

कोणतेही एविक्शन झालेले नसताना घरातून स्वत:हून बाहेर पडलेल्या कविता कौशिकच्या नवऱ्याच्या एक ट्विटमुळे सगळा गोंधळ उडाला. रुबिना- कविता यांचे भांडण सुरु असताना ज्यावेळी अभिनवने कविता विरोधात काही अपशब्द उच्चारले. त्यानंतर रागात आलेल्या रोनितने ( कविता कौशिकचा नवरा) एक ट्विट केले. या ट्विटबद्दल घरात कळल्यानंतर अभिनव आणि रुबिना यांच्यामध्ये वादाची ठिणगी धगधगत होती. पण हा खेळ संपण्याची आणि खेळातून बाहेर पडण्याची वाट न पाहता या दोघांना आमनेसामने करण्यासाठी वीकेंड का वारमध्ये या दोन्ही जोडप्यांना एकमेकांसमोर आणले. झाल्या प्रकरणातील सगळ्या गोष्टी सोडवत आरोप- प्रत्यारोप करत वीकेंड का वारचा हा संपूर्ण एपिसोड रंगला. दरम्यान, हे प्रकरण काय ते जाणून घेऊया.

Bigg Boss14 : राहुल, निकी, अली गोनी येणार परत, सुत्रांनी दिली माहिती

फिनाले राऊंड दरम्यान झाले भांडण

रुबिना दिलैक ही घरातील दमदार खेळाडू आहे. आपल्या उत्तम हिंदी आणि डिबेट स्किलमुळे ती नेहमीच घरातील भांडणांमध्ये सहभागी असते. राहुल वैद्यसोबत तिची शाब्दिक चकमक सुरुच असते. पण कविता कौशिकसोबतही ती भांडण्यात मागे पुढे पाहायची नाही. या खेळामध्ये अनेकदा कविता कौशिकने अभिनव फार बदलला असे सांगितले होते. शिवाय रुबिना प्रत्येक भांडणात तुझ्या नवऱ्याचा खरा चेहरा आणि सत्य विचार असे देखील म्हटले होते. कविता कौशिक आणि अभिनव शुक्लाची मैत्री का तुटली हे देखील तुझ्या नवऱ्याला विचार असे तिने म्हटले होते. पण या बद्दल ती फार काही बोलली नाही. टॉप 4 च्या दरम्यान या दोघांमध्ये इतकी भांडण झाली की, कविता कौशिकने घर सोडून जाणे पसंत केले. त्यानंतरही काही काळ रुबिना या घरात धुमसताना दिसली. 

पतीने केले ट्विट

अभिनव हा नेहमी रुबिनाच्या चुकीच्या गोष्टींमध्येही सहभागी असतो. आपल्या पत्नीवर नितांत प्रेम करणारा नवरा अशी त्याची इमेज झाल्यामुळे कोणत्याही खेळाचे उत्तम प्रदर्शन न करता तो अद्याप या खेळामध्ये टिकून राहिला आहे, असे अनेक नेटिझन्सचे मत आहे. कविता- रुबिनाचे भांडण झाल्यावर अभिनव हे भांडण सोडवून शकत होता. पण असे असतानाही त्यानेही ते भांडण सुरु ठेवले. त्या भांडणात त्याने आग ओकण्याचे काम केले. त्यामुळेच चिडलेल्या कविता कौशिकच्या पतीने अभिनवच्या काही जुन्या आठवणी सांगितल्या. अभिनवला दारुचे व्यसन होते. त्या व्यसनाधीन अवस्थेत त्याने तिला बरेच मेसेज केले होते. पण फार जुनी गोष्ट आहे आणि त्याचा या ठिकाणी उल्लेख नको म्हणून कविता कौशिकनेच त्याच्या नवऱ्याला हे ट्विट काढून टाकायला सांगितले. 

सैफ आणि करिनाच्या दुसऱ्या बाळाचं काय असणार नाव, केला खुलासा

कविता- अभिनव आमने सामने

कविता या खेळातून बाहेर पडली आहे. पण अभिनवच्या कानावर घरातील काही लोकांनी ही माहिती अर्धवट आणि त्यांच्या र्व्हजनमध्ये सांगितल्यामुळे खूप गोंधळ उडाला होता. हा गोंधळ निस्तरण्यासाठीच रॉन आणि कविता आले होते. त्यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु होती. एकमेकांवर आरोप करत अभिनवने काही आरोपांचे खंडन केले. अभिनवने कोर्टात या गोष्टी बघून घेऊया असा सज्जड दम दिल्यावर मात्र सलमानने अभिनवला समजावले की, जुन्या गोष्टींना कोर्टात नेऊन तुमचे खासगी आयुष्य खराब करण्यापेक्षा आहात त्या ठिकाणी खूश राहा. तुमचे लग्न झालेले आहे. आता .या गोष्टी फार मागे पडल्या आहेत. त्यामुळे हा वाद इथेच संपवा.

 ही आग काही काळासाठी थंड झाली असली तरी याचे पडसाद रुबिना बाहेर आल्यावर कशापद्धतीने उमटणार आहेत पाहायला. हवे. दरम्यान, या खेळात आता राहुल वैद्यची पुन्हा एंट्री होणार असे कळत आहे. त्यामुळे अनेकांना आनंद झाला आहे. 

गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट