Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज

Bigg Boss 14 : राहुल वैद्यला सतत केलं जातंय टार्गेट, मेकर्सवर फॅन्स नाराज

Bigg Boss 14 च्या घरात 100 दिवसांहून अधिक काळ घरात घालवण्यानंतर आता फिनालेकडे जाण्याची घौडदोड सुरु झाली आहे. घरात चॅलेंजर्सच्या रुपात आलेले आणि जुने स्पर्धक आणि नवे स्पर्धक यांच्यामध्ये आता खेळ सुरु आहे. पण या घरात एक नवंच राजकारण घडताना दिसत आहे. गायक राहुल वैद्य याला गेल्या 2 ते 4 आठवड्यांपासून टार्गेट केलं जात आहे. एक चांगला आणि लोकपसंतीच स्पर्धक असून देखील त्याला अपमानाची वागणूक सतत दिली जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसू लागले आहे. त्यामुळे मेकर्सवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका चांगल्या व्यक्तीची प्रतिमा सतत वाईट दाखवण्याचा मेकर्सचा डाव असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर हा एक स्टंट असल्याचे देखील म्हटले जात आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक

कंगनावर या व्यक्तीने केले चोरीचे आरोप, केला गंभीर गुन्हा

सतत होतो अपमान

राहुल वैद्य घरात आल्यापासून त्याने आपले मुद्दे अत्यंत मुद्देसुदपद्धतीने मांडले आहे. प्रत्येक टास्क त्यांने त्याच्या पद्धतीने केला आहे. सुरुवातीला त्याच्या आणि जास्मिनमध्ये झालेल्या भांडणात सलमान खानने देखील राहुल वैद्यची बाजू घेत सगळे प्रकरण शांत केले होते. त्यामुळे राहुल वैद्य हा तोंडाने फटकळ असला तरी तो इतरांसारखा नाही हे लोकांना पटले होते. यामुळेच त्याचा फॅनबेसही वाढला होता. हा संपूर्ण सीझन राहुल वैद्यमुळे अनेकांच्या लक्षात राहील अशा गोष्टी घडल्या होत्या. त्यामुळे राहुल वैद्य या खेळाचा विजेता होईल असे अनेकांना वाटले होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. राहुल वैद्यची स्तुती करणे तर सोडा पण राहुल वैद्यला स्क्रिन टाईमही दिला जात नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीत चुका काढून त्याला प्रत्येक वीकेंडच्या वारच्या वेळी वेगवेगळी नाव दिली जातात. त्याचा परिणाम नक्कीच त्याच्या फॅन्सवर होत आहे. त्याचा अशा पद्धतीने अपमान करणे चुकीचे असल्याचे त्याच्या फॅन्सचे म्हणणे आहे.

अभिनव- रुबिनासाठी सगळा घाट?

या स्पर्धेत असलेली अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा नवरा अभिनव शुक्ला या खेळात पहिल्या दिवसापासून एकत्र आहे. अगदी सुरुवातीपासून अभिनव शुक्लाने राहुल वैद्यला उद्धट आणि महिलांचा अपमान करतो असे सांगत टार्गेट केलेले आहे. त्याची फारशी ओळख नसतानाही केवळ रुबिनाचा नवरा म्हणून त्याला बरेच वोट्स दिले जात आहे. अभिनव हा महिलांना मान- सन्मान देतो आणि राहुल वैद्य हा असंस्कारी असल्याचे हल्ली सतत दाखवले जात आहे. त्यामुळे तर मेकर्सना 100 % कलर्सचा चेहरा असलेल्या रुबिना दिलैकला विजेता करायचे आहे हे नक्की झाले आहे. अभिनव- रुबिनासाठी राहुल वैद्यचा काटा काढणे गरजेचे आहे. म्हणूनच अशा पद्धतीने त्याला वागवले जात असल्याची जोरदार चर्चा होत आहे. 

ह्रतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा फायटर असणार या वर्षीचा बिग बजेट चित्रपट

राहुल वैद्यला घरातून का काढले?

या आधी टॉप 4 ची स्पर्धा सुरु असताना रुबिना , अभिनव, राहुल, एजाज, जास्मिन, निकी असे  स्पर्धक होते. कमी वोट्समुळे निकी तांबोळी घरातून बाहेर पडली. पण राहुल वैद्यला कोणतेही कारण नसताना घरातून बाहेर जाण्याची ऑफर देण्यात आली. कोणतेही कारण नसताना त्याला सरळ सरळ मेकर्सनी बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी राहुल वैद्यनेही सरळ बाहेरचा रस्ता स्विकारला. पण अचानक असे काय झाले की, राहुलला घराच्या बाहेर काढण्यात आले हे अनेकांना कळले नाही. पण तो घरातून बाहेर गेल्यानंतर अनेकांनी या रिअॅलिटी शोवर प्रश्न उपस्थित गेले. ज्याच्या परिणाम स्वरुप त्याला पुन्हा एकदा घरात आणण्यात आले. 


पण त्याला पुन्हा आणून देखील त्याचे खच्चीकरण करण्यासाठी मेकर्स बऱ्याच गोष्टी करताना सध्या दिसत आहे. 

अमृता खानविलकरने केले चाहत्यांना आपल्या अदांनी घायाळ, फोटो व्हायरल