Bigg Boss 14 :राखी सावंतला डिवचणे जास्मिन भसीनला पडले भारी, झाली बेघर

Bigg Boss 14 :राखी सावंतला डिवचणे जास्मिन भसीनला पडले भारी, झाली बेघर

गोड स्वभाव आणि कोणाच्याही अध्यात मध्यात नसणाऱ्या जास्मिन भसीनला राखी सावंतला डिवचणे फारच भारी पडले आहे. यंदाच्या एविक्शनमधून जास्मिन भसीन बेघर झाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून बदललेल्या जास्मिनच्या रुपाचा हा परिणाम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. घरात नको त्या कारणावर आक्रमक होत जी गोष्ट करु नको असे सांगूनही जास्मिन भसीनने ते ऐकले नाही याच्या परिणामस्वरुप तिला यंदा कमी वोट मिळाले आहेत. अगदी पहिल्या दिवसापासून वेगवेगळ्या गोष्टींमुळे वेगवेगळ्या रुपात समोर आलेली जास्मिन घरातल्यांनाच काय पण पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही कळेनाशी झाली आहे. राखीसोबत तिने जे केले त्याचीच ही शिक्षा असल्याचे म्हटले जात आहे. जाणून घेऊया या एविक्शनबद्दल

ये रिश्ता क्या कहलाता है' मधून नायराची एक्झिट, शिवांगी जोशीने सोडली मालिका

जास्मिनची झाली एक्झिट

यंदा नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रुबिना, अभिनव, जास्मिन आणि अली अशा दोन जोड्या होत्या. घरातील नियमांचे उल्लंघन करत त्यांनी नॉमिनेशन संदर्भात चर्चा केल्यामुळे या चार जणांना शिक्षा म्हणून नॉमिनेट करण्यात आले होते. त्यामुळे एक जोडी तुटणार हा अंदाज आधीच आला होता. जास्मिन आणि अभिनव या खेळामध्ये आधीपासून आहे. पण तरीही अनेकदा ते बॉटममध्ये आले आहेत. रुबिना आणि अलीला कायम जास्त फॅन्स असल्याचा फायदा मिळाला आहे. पण ज्यावेळी अभिनव आणि रुबिना ही जोडी नॉमिनेशन्समध्ये असते. त्या प्रत्येकवेळी अभिनवला रुबिनाच्या फॅन्सचा फायदा झाला आहे. त्यामुळे यंदा  या दोघांपैकी एक कोणीतरी जाईल अशी अपेक्षा होती. पण गेल्या दोन आठवड्यात जास्मिनकडून ज्या काही चुका झाल्या आहेत. त्याचा परिणा असा दिसून आला की, जास्मिनला अनेकांकडून नकारच मिळाला. अचानक आलेला उद्धटपणा तिच्या यंदाच्या एविक्शनचे कारण बनला

अमिताभ बच्चन यांच्या कोरोना कॉलरट्यून विरोधात कोर्टात याचिका

राखीसोबत केली मस्करी

जास्मिन आणि राखी यांचे नाते सुरुवातीला बरे होते. चॅलेंजर्सच्या रुपात आलेल्या राखीसोबत अनेकांनी वेगळे वागण्याचा प्रयत्न केला. राखी ही या घरात एंटरटेन्मेंट करण्यासाठी आली आहे. त्यामुळे ती बरेचदा अली- जास्मिनच्या नात्याला घेऊन काहीना काही कमेंट करायची. पण या दोघांनी प्रेमाची कबुली द्यावी शिवाय या दोघांना वेगळे करेन असे काहीसे सांगून ती घरात काही ड्राम तयार करायची. पण बिग बॉसच्या नियमांनुसार शाब्दिक वाराला या खेळात बंदी नाही. पण हिंसा किंवा शारीरिक पातळीवर जाऊन काही करण्याला आहे. राखी सावंतवर राग काढण्यासाठी जास्मिनने तिच्या डोक्यात घरात असलेले बदकाचे डोके इतक्या रागात घातले की, तिच्या नाकाला इजा झाली. नाकाची प्लास्टिक सर्जरी झालेली आहे आणि ती दुखतेय हे सांगून देखील जास्मिनने तिला नौटंकी म्हणणे सुरुच ठेवले. राखीसाठी खास डॉक्टर बोलावण्यात आले तिची तपासणी झाली. तिला आराम करण्यास सांगितला. खुद्द बिग बॉसने येऊन जास्मिनची निंदा केली तरी देखील जास्मिनने राखीला खोटारडी म्हणणे सुरु ठेवले. तिच्या शरीराची मस्करी केली. तिच्यावर असे आरोप केले की, जास्मिनची प्रतिमा आपसुकच अनेकांसाठी मलीन झाली आणि राखीला लोकांचा सपोर्ट मिळाला. खुद्द सलमान खाननेही राखीला पाठींबा देत जास्मिनची कान उघडणी केली. पण त्याचा काहीच परिणाम जास्मिनवर झाला नाही. ती कायमच राखीला दोष देत राहिली. 


आता असा उद्धटपणा तिने केला आणि तो लोकांना कसा दिसला हे तिला स्वत:  पाहिल्यावर नक्कीच लक्षात येईल.

प्रियांका चोप्राने केले लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन, सलॉनमध्ये पोहचले पोलीस