Bigg Boss 14: जास्मिनला वाचवल्यामुळे एजाज-पवित्रामध्ये भांडणाची ठिणगी

पवित्रा- एजाजमध्ये वादाची ठिणगी

गेल्या आठवड्यात राहुल वैद्यने संपूर्ण आठवडा गाजवल्यानंतर या आठवड्यात पुन्हा एकदा पवित्रा पुनियाची जादू चालताना दिसत आहे. एकीकडे प्रेम आणि त्याच्या दुप्पट भांडण करणारी घरातील जोडी एजाज- पवित्रा यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. या वादाच्या ठिणगीला यंदा जास्मिन कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे. पण नेमके कोणत्या कारणामुळे पवित्राला एजाजचा इतका राग आला ते पवित्राने सांगितले असले तरी बाहेरच्यांनी  आता वेगळेच तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली आहे. पण हे नक्की की या घरात नवे प्रेम-प्रकरण अजिबात पाहायला मिळणार नाही. दरम्यान, या घरात नवीन सदस्याची एन्ट्री झाली आहे ज्यामुळे या घरात आता नवे ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. 

करणवीर बोहराने शेअर केला टीजे सिद्धूचा प्रेगनन्सी व्हिडिओ

नॉमिनेशमधून वाचवले नाही याचा राग?

कॅप्टनसीच्या टास्कमध्ये एजाजला कॅप्टन बनवण्याचा निर्णय पवित्राने घेतला होता. पण ज्यावेळी कॅप्टन पदाचा फायदा घेत त्याला नॉमिनेशमधून वाचवण्याचा एक अधिकार देण्यात आला.त्यावेळी मात्र त्याने पवित्राजचा विचार न करता जास्मिनला या टास्कपासून वाचवले. जास्मिनला वाचवण्यासाठी त्याने दिलेले कारण हे पवित्राला पटले नाही. त्यामुळे पवित्राचा राग अनावर झाला. तो राग तिने अजिबात व्यक्त केला नाही. पण मनात खदखदत असलेला हा राग तिने भांडणात काढला. हे भांडण इतके मोठे झाले की, पवित्राने चक्क एजाजला धक्का दिला. चिडलेल्या एजाजने घरात पवित्राच्या आवाजाला आवाज भिडवत तितकेच मोठे भांडण केले. शिवाय तिने घरात चहाही फेकून दिला. पण या भांडणामध्ये जास्मिनने बाजू सांभाळण्याचे काम केले. पण हे भांडण फार काही टिकताना दिसले नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुटेज खाण्याचे काम तर केले नाही ना, असा प्रश्न पडला आहे.

अली गोनीची झाली एंट्री

गेल्या आठवड्यात कविता कौशिक  आणि निशांत मल्खानीला घरातून बेघर करण्यात आले आहे. त्यामुळे  एका नव्या वाईल्ड कार्डची गरज या गेममध्ये होती. ही वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून अली गोनीची एन्ट्री  झाली आहे. अली हा जास्मिनचा मित्र असून त्याने तिच्यासोबत झालेल्या सगळ्या प्रकरणावरुन तिला योग्य ती बाजू समजून सांगत राहुलची चुकी नसल्याचे सांगितले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राहुलला खऱ्या अर्थाने क्लीनचिट मिळाली आहे.  अली गोनी हा अचानक गेममध्ये आल्यामुळे त्याला काही काळासाठी क्वारिंटीन राहावे लागणार आहे. त्यानंतरच त्याला घरात जागा मिळणार आहे. 

कश्मीरा शाहचं हॉट फोटोशूट पाहुन क्लिनबोल्ड झाला कृष्णा अभिषेक

जास्मिन झाली नवी कॅप्टन

गेल्या आठवड्यात उगाचच नको त्या मुद्दयावर तमाशा केल्यानंतर जास्मिनने आपली चुकी मान्य केली. सगळ्यांसोबत चांगले राहिल्यामुळे तिला यंदा कॅप्टन बनण्याचा मान मिळाला आहे. रेड झोनमधील राहुलसोबत निकीने नको तो वाद ओढावून घेतल्यामुळे निकीला कॅप्टन पदापासून बाहेर काढण्याचा निर्णय हा राहुलने घेतला. शिवाय टास्कमध्ये  ग्रीन झोनमध्येच कॅप्टन पदासाठी वाद झाल्यामुळे हा रेड झोनमधील लोकांना फार काही मेहनत करावी लागली नाही. 


आता या नव्या कॅप्टनमुळे घरात किती घोळ होतो. ते आता काहीच दिवसात कळेल.

लग्नासाठी आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम, डिसेंबरमध्ये करणार लग्न