Bigg Boss 14 मधून राहुल वैद्य जाण्याची चर्चा, फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

Bigg Boss 14 मधून राहुल वैद्य जाण्याची चर्चा, फॅन्सनी व्यक्त केली नाराजी

Bigg Boss 14 मध्ये आता संपूर्ण सीन पलटला आहे. फिनालेला बराच काळ शिल्लक असताना आता अचानक फिनाले राऊंडची घोषणा करत अनेक सेलिब्रि़टी स्पर्धकांना घराबाहेर काढायला सुरुवात केली आहे. पवित्रा पुनिया या खेळातून बाहेर पडल्यानंतर एका मागोमाग एक एविक्शनचा खेळ सुरु राहिला आहे. टॉप 4 साठीचा प्रवास आता सुरु राहिला असून घरातील एजाजसोडून इतर स्पर्धकांची ती स्पर्धा सुरु झाली आहे. राहुल, निकी, रुबिना, अभिनव, जास्मिन, अली, कविता या सात जणांमध्ये ही स्पर्धा रंगली. यामध्ये अली गोनीने बाहेरचा मार्ग स्विकारला असून कविता या स्पर्धेतून स्वत:च बाहेर झाली आहेच. पण आता राहुल वैद्यला घरातून बाहेर काढण्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. ट्विटरवर कायम ट्रेंड करणाऱ्या राहुलला खेळातून बाहेर काढण्याच्या चर्चेमुळे सगळीकडे फॅन्स नाराजी व्यक्त करत आहे.

प्रेगनन्सीमध्ये अनुष्का करतेय शिर्षासन, विराटची घेत आहे मदत

राहुल वैद्य कलर्समुळे जाणार बाहेर ?

Instagram

खेळात पहिल्या दिवसापासून राहुलशी वैर घेतलेल्या रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांनी खेळात कोणेही टास्क आतापर्यंत जिंकले नाहीत.तरी देखील त्यांना केवळ कलर्सचे कलाकार म्हणून जास्त स्क्रिन टाईम दिला जातो असा आरोप स्पर्धकांनी सोशल मीडियावर केला आहे. ट्विटरवर राहुल वैद्य ट्रेंड होत असताना अचानक रुबिना दिलैकचे नाव पुढे आल्यामुळे हा एक प्रकारे डाव असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत या घरात स्पर्धकांनी अर्ध्याहून जास्त दिवसांचा टप्पा पार केला आहे. त्यात पहिल्या दिवसापासून राहुल वैद्य ट्रेंडमध्ये आले. पण कलर्सच्या पॉलिसीनुसार जर शक्ति मालिकेची लीड रुबिना दिलैक जिंकणार असेल तर हा शो फारच बायस असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

सेलिब्रिटींनी केली पाठराखण

Bigg Boss या रिअॅलिटी शोचे अनेक चाहते आहेत. अनेक सेलिब्रिटी याला फॉलो करतात. राहुल-जास्मिन असा वाद रंगला त्यावेळी सुद्धा अनेक सेलिब्रिटींनी राहुलची पाठराखण करत जास्मिनवर वुमन कार्ड खेळत असल्याचा आरोप केला होता. काम्या पंजाबी, गौहर खान, फराह खान अशा अनेक सेलिब्रिटींनी त्याला पाठिंबा दिला होता. त्यामुळे खेळात त्याला त्याचे पाय मजबूत रोवता आले. 

Casting couch: लग्नाचे आमिष देत अभिनेत्रीवर दोन वर्ष अन्याय, पोलिसात घेतली धाव

आरोपांची नाही पर्वा

खेळाच्या सुरुवातीला निकी तांबोळीने राहुल वैद्य हा मुलींच्या मागे असतो आणि तो त्याची गाणी मुलींना पाठवतो. अशी कानभरणी निकीने या घरात केल्यामुळे राहुलचे मत अनेकांबद्दल खराब झाले. निकी तांबाेळी ही राहुलची मैत्रीण असून सुद्धा तिने कधीही राहुल समोर हा विषय काढला नाही. पण स्पीकर टास्क दरम्यान ज्यावेळी राहुलला काही प्रश्न विचारण्यात आले त्यावेळी निकीने त्याला गाणं का पाठवतो असा प्रश्न केला त्यावर राहुलने तिला सडेतोड उत्तर देत ते मेसेज कधी आणि का पाठवले ते सांगितले. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून सुरु असलेला हा विषय आता नेमका काय होता ते देखील सगळ्यांनाच कळले आहे. 


राहुलच्या खेळाचे उत्तम प्रदर्शन असताना आणि त्याने टास्क जिंकलेला असताना त्याला अचानक खेळातून का बाहेर काढले जाण्याची चर्चा होत असल्यामुळे राहुलची चर्चा होताना दिसत आहे.

आदित्य नारायण आणि श्वेता अगरवाल लग्नबंधनात, फोटो व्हायरल