Bigg Boss 14: मराठमोळा राहुल वैद्य जिंकतोय सिनिअर्स आणि प्रेक्षकांची मनं

Bigg Boss 14: मराठमोळा राहुल वैद्य जिंकतोय सिनिअर्स आणि प्रेक्षकांची मनं

‘बिग बॉस’ चा 14 वा हंगाम सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत. पहिल्या आठवड्यात सर्वांना परखण्यात आणि कोण कसं आहे हे जाणून घेण्यात प्रेक्षकांनाही वेळ लागला. तसाच स्पर्धकांनाही वेळ लागला. पण या आठवड्यात प्रेक्षकांचं आणि अगदी घरातील सिनिअर्सचंदेखील मनोरंजन केलं आहे ते मराठमोळ्या राहुल वैद्यने. एका रियालिटी शो मुळे राहुल वैद्य हे नाव खरंतर घराघरात पोहचलं. पण राहुल माणूस म्हणून कसा आहे हे आता जगासमोर येत आहे. पहिल्या दिवसापासूनच कोणाच्याही फाटक्यात पाय न टाकणारा पण वेळ येईल तेव्हा आणि तिथे स्वतःसाठी लढणारा राहुल या आठवड्यात मात्र अप्रतिम चमकला आहे. जीव ओतून टास्क करणारा राहुल, सिनिअर्सना खुष करून टास्क पूर्ण करण्यात यशस्वी होणारा राहुल हा आता प्रेक्षकांनाही आवडू लागला आहे.

Good News: 'विवाह'फेम अमृता राव लवकरच होणार आई, बेबी बंपसह फोटो व्हायरल

अभिनय करण्याचीही क्षमता

राहुल वैद्य हा उत्तम गायक आहे यामध्ये कोणताच वाद नाही. पहिल्याच  आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आल्यानंतर आता मात्र राहुलने आपले वेगवेगळे रंग दाखवायला सुरूवात केली आहे  पण तेही सकारात्मक दृष्टीने. सतत भांडण करूनच लक्ष वेधून घेता येतं हा बिग बॉसच्या घरातील अलिखित नियम मोडीत काढत राहुलने आपल्या मजेशीर खेळाने आणि सतत सिनिअर्सचे लक्ष आपल्याकडे वेधून नक्कीच या  आठवड्यात जागा बळकट केली आहे असं म्हणावं लागेल. इतकंच नाही तर आपल्याकडे अभिनय करण्याची  क्षमता आहे हेदेखील राहुलने दाखवून दिले आहे. एजाज खान आणि राहुल वैद्य एकत्र बोलत असताना प्रत्येकाच्या बोलण्याची ढब हुबेहूब कॉपी करत आपण वेगळंच रसायन असल्याचं राहुलने दाखवून दिलं आहे. पहिल्या आठवड्यात कामाशी काम ठेवणारा राहुल आता मात्र या आठवड्यात अधिक खुलून आल्याचं दिसून आलं आहे. इतकंच नाही तर टास्क करत असताना राहुलने शायरी तयार करत हिना खान आणि गौहर खान यांनाही आपलंसं करून घेतलं. तर टास्कमध्ये उत्तम काम करत यावेळी नॉमिनेशनपासून राहुल वाचला आहे. 

इंडस्ट्री सोडण्याची घोषणा केली,पण मेकअपमुळे सना खान झाली ट्रोल

आपल्या मतावर ठाम राहतो राहुल

बिग बॉसच्या घरात रोज नवनवीन बदल होत असतात. प्रत्येकाची मैत्री आणि नाती बदलत असतात. अशामध्येही आपला वेगळेपणा जपत राहुल बऱ्याचदा सर्वांशी मिळतंजुळतं घेत आपल्या मतावर ठाम राहात असलेला दिसून येत आहे. त्यामुळे सिद्धार्थने राहुलला न काढण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे असं म्हणावं लागेल. घरात गाणी गाऊन, अभिनय करून तर कधीतरी फनी जोक्स करत राहुल आता लक्ष वेधून घेत आहे. पहिल्या आठवड्यात राहुल वैद्य आणि पवित्रा पुनियामध्ये काही शिजतंय असं वाटत असताना आता मात्र हे गणित बदललं आहे. तर या आठवड्यात राहुलची फॅशन आणि स्टाईल याबाबतही बोललं गेलं आहे. घरात राहूनही अत्यंत स्टायलिश राहुल राहत असून पहिल्याच आठवड्यात सुरक्षित झालेली निक्की तांबोळीदेखील राहुलच्या स्टाईलवर फिदा झालेली दिसून येत आहे. त्यामुळे सगळ्याच बाबतीत आता हळूहळू खुलून येणारा आणि उभारून येणारा राहुल बिग बॉसच्या घरात आपली जागा कशी मजबूत करतो याकडेच मराठी प्रेक्षकांचं नक्की लक्ष लागून राहीलं आहे.

साथ निभाना साथिया मालिकेचा दुसरा सीझन, अहमचा असणार डबल रोल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक