Bigg Boss 14मध्ये आता नवा ट्विस्ट येणार आहे. कारण आता या खेळात काही जुन्या आणि लोकप्रिय खेळाडूंची एंट्री होणार आहे. या खेळातून नुकतेच बाहेर पडलेले निकी, राहुल आणि अली गोनी या खेळात पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याची बातमी सध्या जोर धरु लागली आहे. निकी तांंबोळीने तिच्या कमबॅकची हिंट दिल्यानंतर तिच्या येण्यावर सध्यातरी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पण अद्याप राहुलकडून किंवा त्याच्या कोणत्याही सोशल अकाऊंटवरुन यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. पण सध्या होत असलेल्या ट्रेंडनुसार हे तिघेही या खेळात एक एक करुन परतणार आहेत, अशी माहिती सध्या सुत्रांकडून मिळत आहे.
राहुल येणार परत
या खेळात राहण्याची इच्छा नसल्याचे सांगत या खेळातून स्वत:हून बाहेर पडलेल्या राहुल वैद्यच्या या अचानक झालेल्या एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला होता. किती वोट्स मिळाले हे न ऐकताच त्याने खेळ सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तो घरातून बाहेर पडल्यानंतर अनेकांनी राहुलच्या अशा एक्झिटवर टीका केली होती.अर्थात मेकर्सनी त्याला परत बोलवावे अशी इच्छा प्रेक्षकांची आणि सेलिब्रिटींची होती. त्यामुळेच राहुल सध्या गोरेगावमधील एका हाटेलमध्ये असून त्याची लवकरच या खेळात एन्ट्री होणार आहे.यासाठी तो सज्जही झाल्याचे कळत आहे. आता या वीकेंड का वारमध्ये की सिक्रेट रुममधून त्याची एन्ट्री होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गायिका सावनी रविंद्र असा करणार 2020 चा सांगितीक शेवट
निकी तांबोळी, अली गोनीही येणार परत
या स्पर्धेतील ग्लॅमरस आणि सतत घरात एटंरटेन्मेट करणारा चेहरा म्हणजे निकी तांबोळी. कमी वोट्समुळे घरातून बाहेर पडला होता. पण आता निकी तांबोळीलाही वाईल्ड कार्ड एन्ट्रीमधून परत आणणार असल्याचे कळत आहे. निकी तांबोळी गेल्यापासून घरातील सगळा चार्म निघून गेल्याचे अनेकांनी सांगितले आहे. अली गोनी आणि राहुल वैद्यची या घरात खूप घनिष्ठ मैत्री झाली होती. पण अली गेल्यानंतर राहुलही एकटा पडला. आता अली गोनीही या खेळात परत येणार असल्याचे सांगितले जाते आहे. अली गोनीही या खेळात परत येणार असल्याची चर्चा आहे. पण राहुल वैद्यप्रमाणे अली गोनीच्या कमबॅकची बातमी मेकर्सकडून देण्यात आलेली नाही तर ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज
आता खेळात येईल मजा
राहुल वैद्य घरातून स्वत:हून बाहेर पडला. पण या खेळात पाच जुन्या स्पर्धकांची एंट्री झालेली आहे. राहुल महाजन, मनु पंजाबी, विकास गुप्ता, आर्शी खान या घरात आलेले आहेत. या शिवाय राखी सावंत ही देखील लवकरच या खेळामध्ये येणार आहे. पण अद्याप ती देखील या खेळात सहभागी झालेली नाही. आता जुने खेळाडू विरुद्ध नव्य सीझनचे खेळाडू असा हा डाव रंगणार आहे. सध्या घरात रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला, एजाज खान आणि जास्मिन भसीन हे स्पर्धक राहिलेले आहेत. त्यांच्यात हा सामना रंगणार आहे. आता हे चार जण पुन्हा खेळात आल्यानंतर नेमकं काय होणार ? रुबिना- राहुलमध्ये असलेली ती दुश्मनी परत राहणार का? नेमके काय काय बदल होणार? हे वीकेंड का वारमध्ये कळेलच.
Bigg Boss 14: राहुल परतण्याची चर्चा,प्रेक्षकांमुळे मेकर्सना घ्यावा लागला निर्णय