ड्रामा क्वीन ज्या दिवसापासून Bigg Boss 14 च्या घरात गेली आहे. त्या दिवसापासून घराचे वातावरण एकदम बदलून गेले आहे. राखी सावंत ज्याप्रमाणे सांगून गेली होती. त्याच प्रमाणे ती घरात इंटरटेनरच्या रुपात दिसून आली आहे. खेळ एकीकडे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन एकीकडे.. अशी राखी या घरात दिसून येत आहे. पहिल्या सीझननंतर थेट 13 वर्षांनी राखी या शोमध्ये आली आहे. पण अनेकांचे मत परिवर्तन करण्यात ती यशस्वी झाली आहे. राखी ही फार लाऊड आणि चीप म्हणणाऱ्यांनाही राखीचा घरातील अंदाच आवडू लागला आहे. इन्स्टाग्रामवरील राखी आणि घरातील राखी यामध्ये फरक असून राखी ही एक व्यक्ती म्हणून खूपच चांगली असल्याची मत आता सगळ्या सोशल मीडियावर उमटू लागली आहे
कोरिओग्राफर गणेश आचार्यच्या वेटलॉसवर कपिल शर्माने केली ही कमेंट
राखी करतेय मनोरंजन
राखी सावंत घरात गेल्यापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. इतकेच नाही ती मरगळलेल्या घरातल्यांनाही हसवण्याचे काम करत आहे. बिनधास्त बोल अशी राखी बिना फिल्टर सगळा ड्रामा करते असेच तुम्हाला वाटेल. Bigg Boss सारख्या खेळात स्पर्धकांची रणणिती सुरु असताना राखी त्यातूनही मार्ग काढत स्वत:ला आनंदी ठेवण्याचे काम करते. त्यामुळे घरात तिचे अद्याप कोणासोबत वाजलेले नाही. पहिल्याच आठवड्यात राखी आणि आर्शी यांची मैत्रीतली फाईट दिसून आली. पण तीही तितकीच मनोरंजन करणारी होती. त्यामुळेच राखी घरातल्यांना आणि बाहेर तिला पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही मनापासून आवडत आहे.
राखीच्या लग्नाची बातमी
राखी सावंत Bigg Boss मध्ये जाण्याआधी तिच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. तिने रितेश नावाच्या NRI माणसाशी लग्न केले असे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तिने तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो कुठेच पोस्ट केले नाही. त्यामुळे तिने पुन्हा एकदा स्टंट केला असे सांगितले गेले. पण राखीने या रिअॅलिटी शोमध्ये आल्यानंतर लग्नाची बातमी खरी आहे. पण त्याचे फोटो पोस्ट करु शकत नाही. मी लवकरच त्याला सगळ्यांसमोर आणेन असे सांगितले आहे. राखीच्या लग्नाच्या बातमीला राहुल महाजनने दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता हे लग्न झालेले आहे की नाही हे तसे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण या बातमीतूनही तिने घरातल्यांचे मनोरजंन केले आहे.
Bigg Boss 14: कविता कौशिक-अभिनव शुक्ला आमनेसामने, आरोप-प्रत्योरोपाने रंगला एपिसोड
राखीचा खूप मोठा संघर्ष
राखी सावंत बोलते तेव्हा ती काहीतरी असं बोलते की, त्याची बातमीच होते. पण राखी सावंतने राखी हे नाव मिळवायला आणि या इंडस्ट्रीत टिकायला खूप मेहनत केली आहे. तिने अशा बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. ज्यामुळे ती टिकून राहिली आहे. डान्सची उत्तम आवड असल्यामुळे हिरोईल व्हायचे आणि नाचायचे इतकेच तिला माहीत होते. घरातल्यांचा नकार पत्करत तिने या इंडस्ट्रीत पाय ठेवले. तिने आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. पण तिने तिची एक ओळख निर्माण केली. अत्यंत साध्या घरातील ही मुलगी असूनही तिने तिचे नाव सिद्ध केले आणि आता या सीझनमध्येही तिने आपले नाव तिच्या इंटरटेन्मेंटमुळे सिद्ध केले आहे.
या रिअॅलिटी शोमध्ये राखी सावंत जिंकेल किंवा नाही पण तिने 100 टक्के लोकांची मतं जिंकली आहेत.
Bigg Boss14 : राहुल, निकी, अली गोनी येणार परत, सुत्रांनी दिली माहिती