नवरा गुलदस्त्यात तरीही राखी सावंत बनणार आई, केला खुलासा

नवरा गुलदस्त्यात तरीही राखी सावंत बनणार आई, केला खुलासा

कॉन्ट्रोव्हर्सी आणि मनोरंजनाचा डोस म्हणजे राखी सावंत. यामध्ये कोणाचंही दुमत नक्कीच नसेल. सध्या राखी सावंत आपल्या वेगवेगळ्या गोष्टींनी बिग बॉस (Bigg Boss 14) मध्ये प्रेक्षकांचे आणि चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. राखी म्हणजे मनोरंजनाचा निखळ डोस अशी अगदी सोशल मीडियावरही चर्चा आहे. राखीचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं आहे. अगदी तिचं लग्न आणि कधीही कोणाहीसमोर न आलेला तिचा नवरा रितेशदेखील. आपण लग्न केलं आहे या गोष्टीवर राखी ठाम आहे. राखी सावंत नेहमीच सगळ्यांना हसवत असते. पण या सगळ्या मस्ती आणि हास्याच्या मध्ये तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी ती खुलेपणाने शेअर करतानाही दिसते. लग्नाबाबत आणि रितेशबाबतही राखी बोलत असते. पण आता आपल्याला आई व्हायचं आहे असंही राखीने बोलून दाखवलं आहे आणि ती कशी आई होणार याबाबतही तिने खुलासा केला आहे.

Good News: अभ्या अर्थात समीर परांजपे झाला बाबा, कन्यारत्नाचा जन्म

सोनाली फोगाटकडे केलं मन व्यक्त

राखीने आपलं मन सोनाली फोगाटकडे व्यक्त केले. आपल्या नवऱ्याबद्दल बोलताना राखी खूपच भावूक झाली होती. तर आपल्याला मूल हवं असून आपण आपली अंडी फ्रिज केल्याचे आणि आता आपल्याला डोनरची गरज आहे असंही राखीने म्हटलं आहे. राखी पुढे म्हणाली की, आतापर्यंत माझ्या आयुष्यात कोणीही आलेले नाही. माझा अभिषेक नावाचा बॉयफ्रेंड होता. अभिनव आणि रूबिनाच्या आयुष्यात मला अजिबात यायचं नाही. त्यांचं आयुष्य आनंदाने जावो हीच इच्छा आहे. पण मला अभिनवकडून थोडेसे प्रेम हवे आहे असंही तिने सांगितले. तसंच आपण आपली गर्भाशयातील अंडी फ्रिज केली असून कोणी डोनर मिळाला तर मला आई व्हायचं आहे असंही राखी म्हणाली. त्यानंतर राखीने अभिनवकडे इशारा करून इतकंही म्हटलं की, याच्या बायकोला आणि त्याच्या कुटुंबाला बाहेर जाऊन याबाबत विचारणा करते. जर त्यांना काहीच हरकत नसेल तर अभिनवने डोनर बनावं आणि मला आई होण्याचा  आनंद द्यावा. 

मुलांच्या सुरक्षेसाठी आता विराट-अनुष्काला फॉलो करणार करिना आणि सैफ

रितेशबाबतही राखीची चर्चा

यावेळी रितेशबाबतही राखीने सोनालीकडे  मत व्यक्त केलं. आपलं लग्न तर झालं आहे पण हे लग्न न होण्याच्या बरोबरीचं असल्याचंही राखीने म्हटलं आहे. राखीने सांगितलं की, तिचा नवरा कधीही समोर येणार नाही. काही असं कारण आहे की ज्यामुळे जगासमोर रितेश मला आपलं म्हणणार नाही. राखीला नेहमीच रितेशबाबत काही ना काही सांगताना बिग बॉसमध्ये आपण ऐकतो. तसंच ती नक्कीच खरं बोलत असावी असं वाटतं आणि तिच्याविषयी काळजीही नक्कीच तिच्या चाहत्यांना वाटते. रितेशच्या न येण्यामुळे आता राखीला अभिनवमध्ये आपला नवरा दिसत असून आपण अभिनवच्या प्रेमात असल्याचे राखीने कितीतरी वेळा बोलून दाखवले आहे. इतकंच नाही तर सलमान खानसमोरही तिने आपले प्रेम व्यक्त केले. राखी अनेक वेळा अभिनवला आपल्या मनातील हे प्रेम सांगताना दिसून येते. वास्तविक राखीचे कोणतेही म्हणणे अभिनव कधीच गंभीरपणे घेत नाही. तर रूबिनाचाही राखी आदर करते. दरम्यान सध्या राखी पुन्हा एकदा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. टास्कदरम्यान लघुशंकेवर नियंत्रण न केल्यामुळे राखीने पँटमध्येच लघ्वी केली आणि याबाबत रूबिनाला घरात कोणालाही हे कळता कामा नये असंही सांगितलं. सध्या बिग बॉस राखी सावंत गाजवत आहे हे मात्र नक्की. 

ऐश्वर्या रायची कॉपी मानसी नाईकने लग्नातही केला ऐश्वर्याचा जोधा लुक

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक