‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14) आता मध्यावर येऊन पोहचले आहे. सोशल मीडियावर अनेकांचे चाहत्यांचे गट तयार झाले आहेत. टीव्ही इंडस्ट्रीवरील आवडती जोडी रूबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या दोघांचा गेमही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र बऱ्याच जणांना रूबिनाचा हेकेखोर स्वभाव अजिबात आवडत नसल्याचेही दिसून येत आहे. पण आता रूबिनाने अभिनवसह तिच्या नात्याबद्दल खुलासा केला असून सर्वांनाच धक्का बसणार आहे. रूबिना आणि अभिनव बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी घटस्फोट घेऊन वेगळं होण्याचा विचार करत होते असा खुलासा नॅशनल टेलिव्हिजनवर रूबिनाने केला आहे. हे स्वतः रूबिनाने सांगितले असून सर्वांनाच याचा धक्का बसला आहे. याचा प्रोमो आता समोर आला असून अभिनव मात्र रूबिनाच्या या खुलाशामुळे नाखुष दिसून आला आहे.
Bigg Boss 14 : अभिनव- रुबिनाच्या नात्यात जास्मिनमुळे तणाव
व्यक्तिगत आयुष्याबद्दल रूबिनाचा खुलासा
बिग बॉसमध्ये आज अर्थात 30 नोव्हेंबरला एक टास्क देण्यात येणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला आहे. घरातल्या व्यक्तींना नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील असं सिक्रेट शेअर करण्याचे सांगण्यात आले ज्याबद्दल केवळ जवळच्या व्यक्तींना अथवा केवळ स्वतःलाच माहीत आहे. या टास्कमध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला रूबिनाकडे असणारा इम्युनिटी स्टोन देण्यात येईल असंही सांगण्यात आले. आज हा भाग प्रसारित करण्यात येणार आहे. यामध्ये निक्की तांबोळी आणि एजाज खानही आपल्या सिक्रेटचा खुलासा करताना दिसणार असून प्रत्येक स्पर्धक आज अत्यंत भावूक होताना दिसणार आहे. याच टास्कदरम्यान रूबिनाने अभिनवसह आपल्या नात्याचा खुलासा करत सर्वांनाच धक्का दिला आहे. रूबिनाने सांगितले की, बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय त्यांनी याचसाठी घेतला कारण ती आणि अभिनव एकमेकांसह घटस्फोट घेणार होते. या दोघांनी एकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता. जर हे दोघं बिग बॉसमध्ये नसते तर दोघांनी आतापर्यंत घटस्फोटाची केस नक्की दाखल केली असती असंही तिने सांगितले.
एव्हरग्रीन माधुरी दीक्षित केसांची घेते अशी काळजी, सिक्रेट केले शेअर
रूबिनाच्या खुलाशाने अभिनव नाराज
रूबिनाने आपल्या नात्याबद्दल सांगताना म्हटले की, बिग बॉसमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण होते की, आम्ही एकमेकांना नोव्हेंबरपर्यंत वेळ दिला होता. आम्ही घटस्फोट घेणार होतो. हे आमचे सत्य आहे आणि मी आता आनंदी आहे. मात्र रूबिनाच्या या खुलाशानंतर तिचा नवरा अभिनव मात्र नाराज दिसून आला आहे. अभिनवने यावर म्हटले की, आता ही बातमी पूर्ण दुनियेभर छापून येईल आणि त्याचा गाजावाजा होईल.
Bigg Boss 14: पवित्रा पुनिया बाहेर आणि ड्रामा क्वीन राखी सावंत घरात दाखल
हेकेखोर रूबिनाबरोबर राहणं कठीण अन्य सदस्यांचे म्हणणे
रूबिना अत्यंत हेकेखोर असून तिच्याबरोबर राहणं कठीण आहे असं घरातील अन्य सदस्यांचे म्हणणे आहे. अनेकदा टास्क करतानाही तिच्यासह भांडणं होतात आणि ती स्वतःला कोणीतरी वेगळी समजते असंही अनेकांनी आतापर्यंत म्हटले आहे. अभिनवच्या चांगल्या स्वभावामुळेच ते एकत्र राहू शकतात असंही अनेकांना वाटतं. सोशल मीडियावरही याबाबत अशीच मतं आहेत. तर राहुल वैद्यने तर रूबिनाला तिच्या तोंडावरच सांगितलं आहे की, ती स्वतःला जे काही समजत आहे तो गर्व एक दिवस नक्की कमी होईल. मात्र त्यावरही रूबिनाने अहंकाराने त्याला उत्तर दिले. त्यामुळे तिच्याविरोधात अर्धेअधिक घर दिसून आले आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक