Bigg Boss 14: घरात सुरु झालं आहे जास्मिन-अली-निकी असं लव्ह ट्रँगल

Bigg Boss 14: घरात सुरु झालं आहे जास्मिन-अली-निकी असं लव्ह ट्रँगल

Bigg Boss च्या घरात येऊन प्रेमप्रकरण सुरु होत नाही, असं एकही वर्ष जात नाही. पण या सीझनमध्ये प्रेमप्रकरण होणे हे फार धुसर होते. तरीही काही काळ एजाज- पवित्रा यांच्यामध्ये काहीतरी दिसून आलं जे फार काळ टिकलं नाही. पण आता एक नवा लव्ह ट्रँगल या घरात पाहायला मिळत आहे. जास्मिनच्या समर्थनार्थ घरात आलेल्या अलीच्या प्रेमात निकी तांबोळी असल्याचे पाहायला मिळाले आहे. घरात जास्मिन आणि अलीची केमिस्ट्री पाहायला मिळत असताना निकी तांबोळीचे राखीपुढे आपल्या मनातील सांगणे एका नव्या कहाणीला सुरुवात झाल्याचे घरात दिसून आले आहे. पण निकी तांबोळीचे अचानक प्रेमात पडणे हा देखील खेळाचाच भाग असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.

Bigg Boss 14: रुबिना झाली नवी कॅप्टन, कश्मिरा शहाची एक्झिट

राखीसमोर व्यक्त केले प्रेम

https://fb.watch/2yviwgZWu8/

निकी तांबोळी आणि राखी यांचे घमासान युद्ध घरात झाल्यानंतर आता पुन्हा या दोघी घरात एकमेकांशी नीट बोलू लागल्या आहेत. मंगळवारी झालेल्या एका एपिसोडमध्ये राखी आणि निकीची या विषयावर चर्चा सुरु आहे. निकी राखीला हे सांगताना दिसत आहे की, जास्मिन-अली हे चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये त्याहून अधिक काही नाही. मला अली आवडतो. हे राखीला ती सांगते. त्यामुळे राखी त्यावर लगेचच उत्तर देत तिला तुझ्या मनातील गोष्ट भावना अलीला सांगून टाक असे तिला सांगत आहे. पण दुसऱ्याच क्षणी राखी ही गोष्ट अलीला सांगताना दिसत आहे. त्यावर नाराज झालेला अली ही पाहायला मिळाला आहे. अली निकीवर वीकेंड का वारमध्ये रागावताना दिसला आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये मैत्रीही होणं शक्य नाही तर प्रेम कसे होईल?असे प्रेक्षकांनाही वाटत आहे. शिवाय अली आता पुन्हा आल्यानंतर त्याचे आणि जास्मिनचे नाते अधिक दृढ झालेले दिसत आहे. 

निकी तांबोळीचा खेळ

निकीने अगदी पहिल्याच एंट्रीच्यावेळी सलमानसमोर आपले मनसुबे व्यक्त केले होते की, या घरात ती मुलांना त्यांच्या प्रेमात पाडायला आली आहे. त्यांना जवळ करुनच मी माझा खेळ खेळणार आहे. त्यामुळे शातिर हसीना अशीच तिची एंट्री या घरात पाहायला मिळाली. जान कुमार सानूला जवळ करत तिने या घरामध्ये बराच गोंधळ घातला. जान कुमार सानूवर आरोपही केले. जान कुमार सानू प्रेमात पडलेला पाहता तिने त्याला केवळ गेम पुरतेच वापरले असे स्पष्ट झाले. जान कुमार सानूसोबतच राहुल वैद्यशी मैत्री करायला सतत झटणारी निकी तांबोळी खेळानुसार आणि घरातील संग्नमतानुसार राहुलशी मैत्री करताना आणि त्याच्याविरुद्ध बोलताना दिसली. पण राहुल वैद्य तिच्या या खेळात कधीच अडकला नाही. उलट त्याने एक हाताचे अंतर कायमच निकीसोबत राखले. टॉप 4 च्या एका टास्क दरम्यानही तिने राहुलच्या चारित्र्यावर डाग लावण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टीमुळे राहुल फारच हादरुन गेला.त्यामुळे आता दोघेही या खेळात परतल्यानंतर निकीने कितीही प्रयत्न केला तरी राहुल निकीशी तितकासा बोलताना दिसत नाही त्याने पुन्हा एकदा निकीपासून दूर राहणे पसंत केले आहे.

Bigg Boss 14 : राखी सावंत आहे टोटल इंटरटेन्मेंट, राखीबद्दल प्रेक्षकांचे बदलतेय मत

खेळासाठी काय पण?

खेळ जिंकण्यासाठी काही पण अशा भूमिकेत निकी तांबोळी कायम दिसून आली आहे. प्रत्येक खेळानुसार घरातील सगळ्यांसोबत नाते ठेवते. घरात नव्याने आलेल्या चॅलेंजर्सपैकी राहुल महाजन आणि मनू पंजाबी यांच्यासोबत तिने एक चांगले नाते टिकवून ठेवले आहे. त्यामुळे आता निकीचा प्लॅन अनेकांना लक्षात आला आहे.

आता निकीने घरात तयार केलेला नवा विषय घरातल्यांसाठी नेमका कसा असेल हे पुढील काही एपिसोड्समध्ये कळेलच

ड्रग्ज प्रकरणातून सुटका मिळाल्यानंतर भारती सिंह परतली कपिल शर्मा सेटवर