Bigg Boss 14: रुबिना झाली नवी कॅप्टन, कश्मिरा शहाची एक्झिट

Bigg Boss 14: रुबिना झाली नवी कॅप्टन, कश्मिरा शहाची एक्झिट

कॅप्टन्सी हा महत्वपूर्ण टास्क Bigg Boss च्या घरात मानला जातो. कारण त्यामुळे नॉमिनेट झाल्यानंतर वाचण्याची एक संधी मिळते. पण कॅप्टन होणे या घरात सोपे नसताना टास्क खेळून कॅप्टन झालेल्या अली गोनीची कॅप्टनसी काढून सलमानने रुबीना दिलैकला कॅप्टन्सी दिली आहे. त्यामुळे अनेकांना असे का केले काही काळासाठी कळलेच नाही. तर दुसरीकडे या आठवड्यात चॅलेंजर्सच्या गटातील कश्मिरा शहा ही घरातून कमी वोट्समुळे बेघर झाली आहे. या आठवड्यात इतके काही घडले जे कदाचित घरात राहणाऱ्या स्पर्धकांना आणि प्रेक्षकांनाही काही काळासाठी कळले नाही. पण कॅप्टन्सी देण्यामागे काय कारण असावे याचा अंदाज अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. जाणून घेऊया या सगळ्यावर काय म्हणतेय सोशल मीडिया.

NCB च्या रडारवर पुन्हा करण जोहर, हाऊस पार्टीचे मागितले व्हिडिओ

रुबिना झाली कॅप्टन

एक आठवडा घरात आणखी राहायचे असेल तर या खेळाच्या नियमानुसार कॅप्टन होणे फारच गरजेचे असते. त्यासाठी दिलेला टास्क आणि रणणिती आखणे फारच गरजेचे असते. अगदी पहिल्या दिवसापासून कोणताही टास्क न जिंकणारी रुबिना कॅप्टन होण्यासाठी आधी जरा तरी भांडताना दिसायची पण रुबिना- अभिनव या जोडप्याला कॅप्टन बनवण्यासाठी कोणीही तयार होत नाही. त्यामुळे त्यांनी या खेळात कालांतराने कॅप्टन होण्याचा विचारच मनातून काढला आहे. पण रविवारच्या एपिसोडमध्ये सलमानने अचानक रुबिनाच्या हातात घराची सगळी सुत्रं दिली. अली गोनी कॅप्टन झालेला असताना असा निर्णय का घेतला गेला यावर उलट- सुलट चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. पण रुबिना दिलैक घरातील प्रत्येक गोष्टीमध्ये चुका आणि शिस्तीवरुन घरातल्यांना सतत बोलत असते, असे सलमानने सांगितले. शिवाय अली गोनीला सगळ्यांनी कोणताही विचार न करता पुन्हा एकदा कॅप्टन केले त्यामुळेच त्याच्याकडून कॅप्टन्सी काढून ती रुबिनाला देण्यामागे ती कशापद्धतीने घर सांभाळू शकते हे अनेकांना पाहायच आहे असा होतो. रुबिनाचे घरातील वावरणे अनेकांना आवडत नाही. तिच्या इतरांबद्दलच्या टीका आणि इतर कॅप्टन असतानाचे वागणे पाहता तिने या पदावर राहून पाहावे यासाठीच तिला सलमानने कॅप्टन बनवले असे दिसते.

नताशाने होकारापूर्वी 4 वेळा दिला होता नकार, वरूण धवनचा खुलासा

कश्मिरा शहा घरातून झाली बेघर

तर या आठवड्यात घरातून कश्मिरा शहाची एक्झिट झाली आहे. घरात आलेल्या 5 चॅलेंजर्सपैकी विकास गुप्ताला हिंसा केली म्हणून काढून टाकण्यात आले. त्यानंतर आता पहिल्या एविक्शनमध्ये कश्मिरा शहा घरातून बाहेर पडली आहे. कमी वोट्स मिळाल्यामुळे ती या घरातून बाहेर पडली आहे. या घरात आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून मत कमी पडतील या भीतीने कश्मिरा शहा घरातील प्रत्येक टास्कमध्ये प्रत्येकाला सपोर्ट करण्यासाठी सांगत होती.पण तिला म्हणावा तितका फायदा झाला नाही. बदक टास्कमध्ये तिचे आणि निकीचे झालेले धुव्वादार भांडण अनेकांच्या लक्षात राहिले. ती या घरात बऱ्यापैकी दिसत होती. पण आताच्या घडीला घरात इतके स्पर्धक आहेत की, कोणाला तरी बाहेर काढणे गरजेचे होते. जुन्या खेळांडूमध्ये रंगलेला खेळ अनेकांना अजून पाहायचा आहे त्यामुळेच कदाचित चॅलेंजर्सला अधिक काळासाठी घरात  ठेवण्याची अनेकांना इच्छा नाही. असे दिसून येत आहे. चॅलेंजर्स आल्यापासून झोपलेल्या सगळ्या स्पर्धकांमध्ये पुन्हा एकदा थोडी धास्ती दिसून आली आहे. त्यामुळेच टास्क अधिक चांगल्या पद्धतीने होत आहेत. 


आता या नव्या कॅप्टन्सीमध्ये रुबिना दिलैक नेमकं काय करणार हे सगळ्यांनाच पाहायचे आहे.

Bigg Boss 14 : राखी सावंत आहे टोटल इंटरटेन्मेंट, राखीबद्दल प्रेक्षकांचे बदलतेय मत