#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

#BBM2 मधून इलिमिनेट होऊनही माधवच ठरला ‘विजेता’

मराठीतील अभिनेता आणि #BBM2 च्या घरातील लाडका स्पर्धक माधवला लागली आहे लॉटरी. पण ही लॉटरी पैश्यांची नसून ती आहे करिअरच्या बाबतीतली. बिग बॉस मराठीच्या दुस-या पर्वात स्पर्धक म्हणून गेलेला अभिनेता माधव देवचकेने जरी ट्रॉफी जिंकली नसली तरीही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि प्रेक्षकांच्या शुभेच्छांचा त्याला लगेच फायदा झाल्याचंही दिसतंय.

माधव देवचके ठरला ‘विजेता’

आता तुम्ही म्हणाल माधव तर एलिमिनेट झाला मग तो विजेता कसं काय? तर यारों का यार म्हणून ओळखला जाणारा माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याला शोमॅन सुभाष घईंचा चित्रपट मिळाला आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या अमोल शेडगे दिग्दर्शित ‘विजेता’ या सिनेमात माधव देवचके मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

माधवचा नव्या कामाला शुभारंभ

नुकताच माधवच्या विजेता सिनेमाचा मुहूर्त झाला. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रीकरणालाही आता सुरूवात झाली आहे. याविषयी माधव देवचके म्हणाला, “बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे माझं भाग्यच म्हणायला हवं. सुभाष घईंसारख्या दिग्गज फिल्ममेकरच्या सिनेमात काम करायला मिळणं ही निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्यांचे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नवतच.”

माधवने दिलं बिग बॉसला क्रेडीट

आपल्या करिअरमध्ये मिळालेल्या या सुवर्णसंधीचं क्रेडीट माधवने दिलं आहे बिग बॉस मराठीला आणि ते खरंही आहे. आत्तापर्यंत बिग बॉसमध्ये झळकलेल्या अनेक सेलिब्रिटीजना त्याचा फायदा झाल्याचं दिसतंय. माधव याचं क्रेडीट बिग बॉसच्या शोला देताना म्हणतो की, “बिग बॉसचे फिल्मसिटीमध्ये सध्या जिथे घर बांधण्यात आले आहे. ती जागाच खरं तर माझ्यासाठी खूप लकी आहे. या अगोदर याच जागी ‘हमारी देवरानी’ आणि ‘सरस्वती’ या माझ्या दोन्ही सुपरहिट मालिकांचे सेट लागले होते. ‘हमारी देवरानी’,’सरस्वती’ आणि ‘बिग बॉस’ हे माझ्या करियरमधले तीन टर्निंग पॉईंट ठरले आहेत.”

बिग बॉसमध्ये झळकलेल्या या कंटेस्टंटनाही झाला फायदा

माधवसोबतच 'बिग बॉस सिझन 2' मध्ये असतानाच नेहा शितोळेला चित्रपट येरे येरे पैसा च्या तिसऱ्या भागात भूमिका मिळाली आहे तर बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधल्या अनेक कंटेस्टंट सेलिब्रिटीजना बिग बॉसमध्ये भाग घेतल्याचा फायदा झाला होता. कारण साहजिक आहे या रिएलिटी शोमुळे तुम्ही प्रेक्षकांसमोर रोज येता आणि त्यांच्या मनात जागा निर्माण होते. त्यामुळे बिग बॉसमधल्या लोकप्रियतेचा फायदा पहिल्या सिझनमधील अभिनेत्री मेघा धाडे, अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि अभिनेता - सामाजिक कार्यकर्ता सुशांत शेलार यांना निश्चितच झाला.

हेही वाचा -

#BBM2 : धक्कादायक निकालात माधव देवचके झाला एलिमिनेट

#BBM2update : टास्कसाठी नाही करणार विश्वासघात, शिव होतोय भावनिक

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”