बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न

बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न

गोपी बहू बनत सगळ्यांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच लग्न करणार आहे. तिच्या लग्नाची बातमी यंदाच्या बिग बॉसपासूनच सुरु झाली होती. कारण या घरातच तिने तिच्या लग्नाविषयी आणि आयुष्यात असणाऱ्या जोडीदाराविषयी सांगितले आहे. तिने घरात एजंल नावच्या तिच्या पाळीव कुत्र्याचा सतत विषय काढला होता त्यामुळे एजंल कोण? असा गोंधळही उडाला होता. पण आता या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. टीव्हीवरील लाडकी सून गोपीबहूने लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे साहजिकच तिच्या फॅन्समध्ये तिच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर घरात येणार नवा पाहुणा, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

कोणासोबत करतेय लग्न

 लग्नाची घोषण केली आहे म्हटल्यावर देवोलिना नेमकं कोणासोबत लग्न करतेय असा प्रश्न पडणं फारचं स्वाभाविक आहे. पण देवोलिनाने रिलेशनशीपची बातमी दिली असली तरी देखील तिने कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. बिग बॉसच्या घरातही अनेक वेळा तिने केवळ कोणीतरी तिच्या आयुष्यात आहे इतकेच म्हटले पण तिने कधीही कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही. तिने अजूनही हे नाव गुलदस्स्यात ठेवणे पसंत केले आहे. पुढे ती हे देखील म्हणाली की, जर सगळं काही सुरळीत सुरु राहिलं तर ती पुढच्या वर्षी हमखास लग्न करणार आहे. 

दुसऱ्या लग्नावरुन प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्यांना अभिज्ञाने दिले असे उत्तर

खासगी आयुष्य नसते चर्चेत

देवोलिनाला आपले खासगी आयुष्य कोणासमोरही मांडायला आवडत नाही. तिला या गोष्टीची फारशी चर्चा करायला आवडत नाही. त्यामुळेच तिने कोणत्याही सोशल मीडियावर या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. पण 2022 मध्ये लग्न करण्याचा तिचा मानस आहे.  त्यामुळे ती लग्नाची घोषणा करण्यासाठी हे संपूर्ण वर्ष घेणार आहे. तिचे नाव अनेकांसोबत जोडले गेले असले तरी देखील ती नेमकं कोणाबद्दल बोलत आहे याचा मुळीच अंदाज येत नाही. पण देवोलिना लग्न करणार आहे हे तिच्या बोलण्यातून लक्षात नक्कीच आले आहे.

आली होती बनून एजाजची प्रॉक्सी

बिग बॉसचा हा सीझन वाढवण्यात आल्यामुळे हा खेळ 100 दिवसांहून अधिक काळासाठी पुढे गेला. या घरात असलेला एजाज खान त्याच्या काही कमिटमेंट्समुळे घरातून बाहेर पडला पण तो खेळातून बाहेर पडला नव्हता. त्यामुळे त्याची प्रॉक्सी म्हणून पुन्हा एकदा या घरात देवोलिना भट्टाचार्जीला घरात खेळण्याची संधी मिळाली. या आधीही देवोलिना या घरात आलेली आहे. त्यामुळे तिच्यासाठी हा प्रवास काही नवा नव्हता.  यावेळी अर्शी खान आणि तिच्यामध्ये जोरदार भांडण पाहायला मिळालं. अर्शीच्या बोलण्यामुळे देवोलिनाला इतका त्रास झाला की. या घरात तोडफोड करतानाही ती दिसली पण तरीही या खेळात ती टिकून राहली. पण तिचा खेळ एजाजपासून बराच वेगळा असल्यामुळे ती  फिनाले राऊंडपर्यंत पोहोचू शकली नाही. त्या आधीच ती या खेळातून बाहेर पडली. 


बिग बॉस नुकतेच संपल्यामुळे सध्या तरी सगळ्यांच्याच आफ्टर पार्टी सुरु आहेत.लॉकडाऊननंतर 'साथ निभाना साथिया 2 'या मालिकेत देखील ती आहे.त्यामुळे ती प्रेक्षकांचे या मालिकेतून मनोरंजन करण्याचे काम करणार आहे. 

 

असं आहे दीपिका पादुकोणचे डेली रूटीन,शेअर केला व्हिडिओ