ADVERTISEMENT
home / बिग बॉस
#BBM2 : आरोह वेलणकरला फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

#BBM2 : आरोह वेलणकरला फिनालेसाठी प्रेक्षकांचा पाठिंबा

अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) आता फक्त रेगे चित्रपटातला अभिनेता राहिला नसून त्याची नवी ओळख निर्माण झाली आहे. त्याने वाईल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात २० जुलैला दणक्यात प्रवेश केला आणि खूप कमी वेळात आरोहने सगळ्यांची मनं जिंकत टॉप 6 मध्ये बाजी मारली. आरोह वेलणकरचा स्पष्टवक्ता स्वभाव आणि बुद्धीचातुर्य वापरून खेळायची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आरोहने टॉप 6 मध्ये एन्ट्री केल्यापासून सध्या सोशल मिडीयावरून त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

आरोहवर शुभेच्छांचा वर्षाव :

आरोह वेलणकरच्या सोशल मिडीयावर चाहत्यांनी अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.  त्यातील काही प्रातिनिधीक प्रतिक्रिया :

“आरोह तू माझा सर्वात आवडता स्पर्धक आहेस. मी तुझा खूप मोठा चाहता आहेस. मला तुझ्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायची आहे. तू एक स्ट्राँग कंटेस्टंट आहेस. तू बिग बॉसच्या घरातला सर्वाधिक समजूतदार आणि सरळमार्गी कंटेस्टंट आहेस”

ADVERTISEMENT

“आरोह तू बिग बॉसच्या घरात सर्वात चांगला खेळाडू आहेस. शिस्तबद्ध खेळाडू आहेस. तू सुरूवातीपासून असतास तर तूच विनर झाला असतास. तू खूप हुशार आहेस. तू जसा खेळतो आहेस. त्यामुळे मला तुझा बिग बॉसमधला परफॉर्मन्स खूप आवडतो आहे. “

“आरोह तू स्पर्धक म्हणून माझा फेव्हरेट आहेस. तुझा स्पष्टवक्तेपणा मला आवडतो. टास्कमध्येही तू खूप छान खेळतोस. माझ्यासाठी तूच बिग बॉसचा विनर आहेस.”

“कुणाशी भांडण नाही ना तंटा नाही. जिथे कुठे चुकलास, तिथे एकदम चांगल्याप्रकारे माफी मागितलीस. प्रत्येक टास्कमध्ये एकदम मन लावून खेळलास. जरी बिग बॉस जिंकला नाही तरी काही हरकत नाही. कारण तू जनतेचं मन जिंकलंस.”

“तुझं घरातल्या प्रत्येक स्पर्धकाविषयीचं विश्लेषण अगदी योग्य असतं. आपलं म्हणणं सर्वांसमोर ठामपणे मांडण्याची तुझ्यात हिम्मत आहे, याचे मला कौतुक वाटते. “

ADVERTISEMENT

“तु वाईल्ड कार्ड एंट्री असूनही सर्वांना मागे टाकलं दादा. वाईल्ड कार्ड कंटेस्टंटने कसं खेळावं, हे तू दाखवून दिलंस . तू खूप मॅच्युअर्डली बोलतोस आणि बरोबर बोलतोस ते आम्हांला आवडतं.”

बिग बॉस कंटेस्टंट्सनीही केलं कौतुक

जसे चाहते आरोहचे कौतुक करत आहेत. तसंच आरोहचं कौतुक बिग बॉसच्या घरातल्या स्पर्धकांनीही वेळोवेळी केलं आहे. आरोहने एन्ट्री घेताक्षणी बिग बॉसच्या घरात एक सकारात्मकता आणली होती. त्याला पहिल्यांदाच भेटणारे अभिजीत केळकर आणि वैशाली म्हाडे आरोहविषयी बोलताना, “तो चांगला आहे. पॉझिटिव्ह, स्पष्ट आणि क्लीअर वाटतो. चांगलं जमेल त्याच्याशी. स्वभाव छान आहे.”

 

ADVERTISEMENT

#Weekendchadaav मध्ये सुपरस्टार सलमान खान आलेला तेव्हाही महेश मांजरेकरांनी त्याची स्तुती केली होती की, “आरोह नेहमी सत्याच्या बाजूने असतो. तो नियमांना धरून खेळणारा स्पर्धक आहे.” असं म्हटलं होतं. नुकत्याच झालेल्या वीकेंडच्या डावमध्ये आरोहला बेस्ट परफॉर्मरचा किताबही मिळाला होता. महेश मांजरेकर म्हणाले होते की,”या आठवड्यात आरोह सेन्सिबल खेळला. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलला.”

 

थोडक्यात ‘हँडसम हंक’ आरोहला फिनालेसाठी प्रेक्षकांचा भरभरून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे तो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला, तर आश्चर्य वाटू नये.

27 Aug 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT