ADVERTISEMENT
home / बिग बॉस
बिग बॉस मराठी सिझन 2 ‘या’ तारखेला होणार सुरू

बिग बॉस मराठी सिझन 2 ‘या’ तारखेला होणार सुरू

एप्रिलमध्ये की मे महिन्यांमध्ये सुरू होणार अशा चर्चांमध्ये अखेर #BiggBossMarathiseason2 ला मुहूर्त मिळाला आहे. या शोच्या पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. पण हा शो सुरू कधी होणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं दिसतंय.

या तारखेला होणार शुभारंभ

सूत्रानुसार, हा शो 19 मे रविवारी ऑन एअर होणार असल्याचं कळतंय. पण हा सिझन दाखवणाऱ्या वाहिनीकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

तसंच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याच आवाहनही या वाहिनीकडून करण्यात आलं आहे.

#POPxoMarathi ने आधीच दिलेल्या बातमीनुसार हा सिझन लोणावळ्यात नाहीतर मुंबईतल्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये होणार आहे. बिग बॉस मराठी हाऊसचा संपूर्ण सेट इथे शिफ्ट करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

सहभागी होणाऱ्यांबद्दल औत्सुक्य

बिग बॉस मराठी सिझन 1 आणि 2 चे होस्ट महेश मांजरेकर यांच्या प्रत्येक प्रोमोने प्रेक्षकांमध्ये औत्सुक्याचं वातावरण आहे. कारण नुकत्याच आलेल्या बिग बॉस मराठी सिझन 2 प्रोमोमध्ये लावणी, राजकारण आणि चक्क किर्तनकार या क्षेत्रातील सेलिब्रिटी स्पर्धकांचाही हाऊसमध्ये सहभाग असल्याचं कळतंय. अगदी शो चा प्रिमीयर होण्याआधीच या नावांची सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे.

जेव्हा या शो चा राजकारणातील कवी मनाच्या स्पर्धकाचा प्रोमो आला तेव्हा सगळ्यांनी नाव घेतलं ते कवी मनाचे राजकीय नेते रामदास आठवले यांचं. पण सुत्रानुसार, या सिझनमध्ये भाग घेणार आहे साताऱ्यातील राजकीय व्यक्तीमत्व अभिजीत बिचकुले. आश्चर्य म्हणजे अभिजीत याचाही उल्लेख मित्रमंडळींमध्ये कवी मनाचे नेते असाच केला जातो.

बिग बॉस मराठीचा सिझन 1 एप्रिल 15, 2018 ला सुरू झाला होता. त्यानंतर यंदा हा शो 14 एप्रिल आणि 21 एप्रिल सुरू होणार होता. पण लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमुळे याची लाँच डेट पुढे ढकलण्यात आली.

गणेश गायतोंडे परत येतोय…. पाहिलात का Sacred Games 2 चा टीझर

ADVERTISEMENT

काहीही असो प्रेक्षकांच्या रिमोट टाईममध्ये बिग बॉस मराठी सिझन 2 साठी वेळ फिक्स आहे. फक्त सिझनला सुरूवात होऊ द्या. काय खरं आहे ना. 

हेही वाचा –

अभिनेता पुष्कर श्रोत्री ‘त्या’ कॅप्शनमुळे होत आहे ट्रोल

06 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT