ADVERTISEMENT
home / बिग बॉस
BBM2 : दिवसेंदिवस वाढतेय शिवानीची लोकप्रियता

BBM2 : दिवसेंदिवस वाढतेय शिवानीची लोकप्रियता

प्रत्येक कलाकार आणि त्यांच्या फॅन्सचं एक वेगळच नातं असतं. हजारोंच्या फॅन्समधून आपण त्या कलाकाराचे सगळ्यात मोठे फॅन आहोत, हे दाखवण्यासाठी ते खूप अजब गोष्टी करत असतात. असंच काहीसं झालंय #BBM2 च्या घरातील सदस्य असलेल्या शिवानी सुर्वेबाबत. शिवानी घरातील सदस्यांशी किती भांडली किंवा तिच्या रागाचा पारा दर एपिसोडमध्ये कितीही चढत असला तरी तिच्या फॅन्समध्ये काही कमी होताना दिसत नाहीयं. तिचे फॅन्स मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तिच्या एका जबरा फॅनने तिच्या प्रेमापोटी केली आहे एक हटके गोष्ट. जाणून घ्या कोणती आहे ती गोष्ट. 

कोण आहे हा शिवानीचा जबरा फॅन

शिवानीच्या या जबरा फॅनचं नाव आहे निनाद म्हात्रे. तो रायगड जिल्ह्यातल्या उरणमध्ये राहणारा आहे.  शिवानी सुर्वेच्या या चाहत्याने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रेंड होत असलेल्या ‘शिवानी स्टाईल’ या हॅशटॅगचा स्टिकर बनवलाय. याबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की, “शिवानी मला खूप आवडते. मी तिचा खूप मोठा चाहता आहे. मला तिचा बेधडक स्वभाव खूप आवडतो. ती बिग बॉसमध्ये खूप छान खेळत आहे.  माझ्यासाठी ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाची विजेती आहे. मी तिच्या प्रेमापोटी शिवानी स्टाईल स्टिकर गाडीवर लावला आहे. आता लवकरच तिच्या फोटोचा वॉलपेपर माझ्या खोलीतही लावणार आहे.”

Instagram

ADVERTISEMENT

निनाद, शिवानी आणि सोशल मीडिया

निनाद म्हात्रे शिवानीसाठी सोशल मीडियावर रोज पोस्ट टाकतो. त्याने तिच्यासाठी फॅनपेजदेखील बनवले आहे. तिच्या या बिग बॉसच्या प्रवासात तो तिला भक्कम पाठिंबा देतोय. याबाबत त्याने सांगितलं की, “आम्हा चाहत्यांचा एक इन्स्टावर ग्रुप आहे. तसेच व्हॉट्सअरग्रुपही आहे. ज्यामध्ये आम्ही सर्व शिवानीचे चाहते एकत्र आहोत. मी शिवानीला कधी भेटलो नाही. पण आता 1 सप्टेंबरच्या ग्रँडफिनाले एपिसोडनंतर तिला भेटून तिच्यासोबत एक फोटो काढायची आणि ऑटोग्राफ घेण्याचीही इच्छा आहे.”

शिवानीची लोकप्रियता

शिवानी बिग बॉसच्या घरात आल्यापासून प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. तिच्यावर कितीही टीका होत असली तरी तिला स्टाँग कटेस्टंट मानलं जात आहे. बिग बॉसच्या घरात येण्याआधी शिवानी सुर्वे हिने मराठीसोबतच अनेक हिंदी मालिकांमध्ये अभिनय केला आहे. तिची हिंदी मालिका ‘जाना ना दिल से दूर’ इंडोनेशियामध्ये सध्या टेलिकास्ट होत असल्याने शिवानीचे जगभरामध्ये फॅन्स आहेत. काही काळापूर्वी तर तिने गुगल सर्चमध्ये महेश मांजरेकरांनाही मागे टाकले होते.

आता पाहूया निनादची शिवानीला बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेमध्ये पाहण्याची इच्छा आणि शिवानी निनादची ही इच्छा तिला भेटण्याची पूर्ण करते का, वेट अँड वॉच.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

#BBM2 ची “शिवानीच खरी विनर”

#BBM2 : बिग बॉसच्या आदेशानंतर शिवानी व्हावं लागलं शांत

#BBM च्या घरात पुन्हा पडली वादाची ठिणगी

31 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT