#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा

#BBM2 : बिग बॉसच्या घरात भरलीयं शाळा

बिग बॉसच्या घरातलं धुमशान आता थोडं थंडावल्याचं चित्र आहे. मंगळवारच्या एपिसोडच्या सुरूवातीला सगळ्यांंनी अगदी एकत्र येऊन वैशालीसोबत गाणी म्हणत एन्जॉय केलं. पण या गाण्यांमुळे नेहा इमोशनल झाली आणि आतमध्ये निघून गेली. असो आता वीकेंडच्या वारनंतर घरातले सदस्य नव्या टास्कसाठी तयार झाले आहेत. एकीकडे घरातले सदस्य टास्कमध्ये बिझी आहेत तर बाहेरून त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे. हे त्यांना माहीतही नाही.  


शाळा सुटली पाटी फुटली


बिग बॉसच्या सदस्यांची होस्ट महेश मांजरेकरांनी वीकेंडचा वारमध्ये चांगलीच शाळा घेतली. त्यानंतर आता या आठवड्याच्या टास्कचं नाव आहे शाळा सुटली पाटी फुटली. या नव्या टास्कसाठी दोन टीम्स करण्यात आलेल्या आहेत. एक टीम आहे शिक्षकांची आणि एक टीम आहे विद्यार्थ्यांची.

मजेशीर गोष्ट अशी आहे की, या आठवड्यातल्या टास्कसाठी कॅप्टन नसणार आहे. कारण घरातली जवळजवळ प्रत्येकानेच काही ना काही नियम तोडल्याने कोणालाही कॅप्टन म्हणून निवडण्यात आलेलं नाही. पण विद्याधर जोशी यांना एक सिक्रेट टास्क देण्यात आलेलं आहे.

पण टास्क सुरू होताच शिक्षक शिव आणि विद्यार्थिनी नेहामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालं. या शाळेच्या युनिफॉर्ममध्ये हे विद्यार्थी खूपच क्युट दिसत आहेत. 

आता पाहूया या टास्कमध्ये पुढे काय काय होतं ते.


#BBM2 मध्ये बिचुकलेनंतर नवा टार्गेट होतोय सेट


सई ठेवतेय #BBM2 च्या घरावर लक्ष


bbm2-sai-lokur-6


अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचली होती. आता पुन्हा एकदा सई ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डोकावत आहे. पण याचा अर्थ ती बिग बॉसच्या घरात जाणार नाही. तर बिग बॉसच्या घरातल्या रोजच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून त्यावर भाष्य करणारा ‘एक घर बारा भानगडी’ हा शो ती मराठी बॉक्सऑफिसवर करत आहे. याबाबत अभिनेत्री सई लोकुर म्हणाली की,, “हा शो सुरू झाल्यापासून मला सोशल मीडियावरून माझ्या चाहत्यांचे सतत मेसेजेस येत होते. मी हा शो पाहते का, मला यातल्या स्पर्धकांविषयी काय वाटतं, याविषयी ते जाणून घेऊ इच्छित होते. त्यामुळे माझी मतं सांगणारा हा शो मी घेऊन आलीय. या शोचं वैशिष्ठ्य आहे की, बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी माझी परखड मत मी इथे मांडतेय, पुन्हा एकदा बिग बॉसशी या शोमुळे मी अप्रत्यक्षपणे जोडली गेलीय, याचा मला आनंद आहे.”


BigBoss:season 13 असणार खास, हे सेलिब्रिटी असणार स्पर्धक


एक घर बारा भानगडीची गंमत


बिग बॉसचा आवाज जसा #BBM2 च्या घरात ऐकु येतो, तसा बिग मावशीचा आवाज या शोमध्ये आहे.याबाबत सईने सांगितलं की, तिच्यासोबतची माझी चर्चा खूप मनोरंजक होत असल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांकडून येतायत. मला स्पर्धकांविषयी नक्की काय वाटतं. ते तुम्हाला यामध्ये ऐकता येईल.“ युट्युबवरील मराठी बॉक्सऑफिसवर येणा-या या शोमध्ये सईसोबतच तिचा बिग बॉसच्या घरातला लाडका मित्र पुष्कर जोगही आहे. त्यामुळे आता जशी बिगबॉसच्या घरात या दोघांची आंबट-गोड मैत्री पाहायला मिळाली. तशीच नोक-झोक या शोमध्येही पाहायला मिळेल का, हे औत्सुक्याचे ठरेल.


‘या’ कारणामुळे उतरन फेम रश्मी देसाईचा बिग बॉस 13 मध्ये भाग घेण्यास नकार