जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूवर बनणार बायोपिक, तयारी सुरु

जेलमध्ये असलेल्या आसाराम बापूवर बनणार बायोपिक, तयारी सुरु

बलात्काराच्या आरोपाखाली सध्या शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूवर आता चित्रपट बनणार असल्याचे कळत आहे. शिवाय या चित्रपटाची तयारीदेखील सुरु झाली आहे. गँग्ज ऑफ वासेपूरचा निर्माता सुनील बोहरा या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटासाठी सगळे आवश्यक राईट्स सुनील बोहरा यांनी घेतले असून त्यांना हा आतापर्यंत आलेल्या बायोपिकपेक्षाही अधिक मोठा आणि चांगला बनवायचा आहे.


पुस्तकाने चित्रपटासाठी केले प्रेरित


asaram bapu 1


 पत्रकार उशनीर मुजूमदार यांनी आसाराम बापूच्या संपूर्ण आयुष्याची माहिती देणारे 'गॉड ऑफ सिन : द कल्ट, द क्लाउट अँड डाऊनफॉल ऑफ आसाराम बापू’  हे पुस्तक लिहिले आहे.या पुस्तकावरुन अनेक वाद निर्माण झाले होते. हे पुस्तक सुनील बोहरा यांनी  वाचले असून या पुस्तकाच्या वाचनानंतरच त्यांना याचे रुपांतर चित्रपटात करण्याची इच्छा निर्माण झाली आहे. त्यांनी ती इच्छा अनेकदा व्यक्त करुन दाखवली आहे. एका खाजगी वृत्तपपत्राशी या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, तथाकथित धर्मगुरु त्यांचा उमेदीचा काळ वाचणे त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेलं एक वादळं. एक इतका मोठा नावाजलेला धर्मगुरु असे करु शकेल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. पण काही महिलांनी ती हिंमत दाखवली आणि  खरा चेहरा लोकांसमोर आणला. महिलांच्या आवाजाला बळकटी मिळावी म्हणून एका वकिलाने ही केस कोणताही मोबदला न घेता लढली. हे सगळचं प्रेरणा देणार आहे. पुस्तक वाचल्यानंतर अंगावर काटा आल्यावाचून राहात नाही.


स्क्रिप्टच्या मागे सुनील बोहरा


निर्मात्यांनी चित्रपट करायचे तर निश्चित करुन टाकले आहे. त्यांनी चित्रपटासाठी पुस्तकाचे राईट्सही घेतले आहे. त्यामुळे हा प्रोजेक्ट त्यांच्याकडेच आहे हे नक्की.. पण सध्या ते लेखकासोबत अधिक चर्चा करत असून चित्रपटासाठी लागणारी स्क्रिप्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. जो पर्यंत स्क्रिप्ड पूर्ण होत नाही तो पर्यंत या चित्रपटाची कास्ट देखील निश्चित करता येणार नाही, असे सुनील बोहरा यांनी स्पष्ट केले आहे.


guilty asaram


आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळावी ओळख


आसाराम बापूंचे अनुयायी हे देशातच नाही तर संपूर्ण जगभर आहेत. त्यामुळे हा चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा  अशी निर्माता म्हणून सुनील बोहरा यांची इच्छा आहे.


चित्रपटाला येतील का अडचणी ?


आसाराम बापूंवर लैगिंक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांना मानणारा समुदाय त्यांच्यावरील आरोपाचे खंडन करत होता. पण  तरीदेखील त्यांच्याविरोधात सबळ पुरावे जमा झाल्यानंतर त्यांचे अनुयायी देखील हक्कबक्क झाले आता पुन्हा एकदा जखमेवर मीठ चोळण्यासाठी हा चित्रपट येणार आहे म्हटल्यावर  या चित्रपटाला किती अडचणी येणार ते देखील येत्या काळात कळेल.


 आसाराम बापूंचे नेमके प्रकरण काय?


narayan sai


वाईट कामांसाठी आसाराम बापूंचे आश्रम 2013 साली प्रकाशझोतात आले. नारायण साई या त्यांच्या मुलाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आले. यावेळी आसाराम बापूंनी देखील बलात्कार केल्याचे साक्षीदारांनी सांगितले. अधिक अडचणीत येऊ नये या साठी आसाराम बापूने  साक्षीदारांचे खून केले. आसाराम बापूविरोधात दोन बहिणींनी आवाज उठवला आणि त्यांच्या कुकर्माच्या अनेक गोष्टी प्रकाशझोतात आल्या. आसाराम बापूनंतर राधे माँ,