Viral Video: पाहा या बॉलीवूड अभिनेत्रीचा वाढदिवसाच्या दिवशी हटके अंदाज

Viral Video: पाहा या बॉलीवूड अभिनेत्रीचा वाढदिवसाच्या दिवशी हटके अंदाज

करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' मधून बॉलीवूडमध्ये जबरदस्त एंट्री करणारी अनन्या पांडे (Ananya Panday) हिचा आज 21वा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा बर्थडे व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिच्या वाढदिवशी तिने आगामी 'पति पत्नी और वो' च्या सेटवर केलं छोटंसं सेलिब्रेशन. पाहा तिचं क्युट सेलिब्रेशन.

अनन्याचा व्हायरल व्हिडिओ

तिचा हा बर्थडे सेलिब्रेशन व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल होत आहेत. तिला सोशल मीडियावर अनेकजण विश करत आहेत. पण हा व्हिडिओ खरंच हटके आहे. या व्हिडिओत ती मस्त नाचत आणि हसत प्री-बर्थडे सेलिब्रेशन करत आहे. ऐरवीही क्युट दिसणार अनन्या यात जास्तच क्युट दिसतेय.

व्हिडिओमागची स्टोरी

अनन्या पांडे (Ananya Panday) चा हा व्हिडिओ खरंतर प्री-बर्थडे सेलिब्रेशनचा असून तिच्या आगामी 'पति पत्नी और वो' (Pati Patni Or Wo) च्या सेटवर शूट करण्यात आला आहे. जो तिच्या फॅनपेजने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एकीकडे तिला सगळे विश करत आहेत तर दुसरीकडे अनन्या पांडे मस्त डान्स करत आहे. तसंच तिचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात केक कट करण्याआधीच स्वतः अनन्या केक खात आहे. मग इतरांना देते. या बर्थडे सेलिब्रेशनला अनन्यासोबत कार्तिक आर्यन, भूमि पेडणेकर आणि पती पत्नी आणि वो ची इतर टीमही उपस्थित होती.

लहानपण देगा देवा

अनन्या पांडे (Ananya Panday) च्या वाढदिवशी तिचे वडील चंकी पांडे (Chunkey Pandey) आणि आई भावना पांडेनेही तिच्या बालपणाशी निगडीत काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जे फॅन्सना खूपच आवडत आहेत. 

फोटोमध्ये चिमुकली अन्यना खूपच क्युट दिसत आहे. या फोटोसोबत अभिनेता चंकी पांडेने आपल्या मुलीबाबत लिहीलं आहे की, "ट्विंकल ट्विंकल ऑलवेज माय लिटल स्टार."

सतत लाईमलाईटमध्ये आहे अनन्या

बॉलीवूड इंडस्ट्रीत आल्यापासूनच अनन्या सतत लाईमलाईटमध्ये आहे. खरंतर तिचा पहिला सिनेमा स्टुडंट ऑफ द ईयर बॉक्स ऑफिसवर खास काही करू शकला नाही. पण तरीही तिच्या फॅशन सेन्स आणि युथफुल लुकमुळे ती सतत चर्चेत असते. 

अनन्या पांडे 'पति पत्नी और वो' या चित्रपटासोबतच 'खाली पीली' या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत 'धडक' फेम अभिनेता ईशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

हेही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.