बॉलीवूडची अजरामर पण अधुरी प्रेम कहाणी….

बॉलीवूडची अजरामर पण अधुरी प्रेम कहाणी….

बॉलीवूडमध्ये आजही अनेकांच्या मनात घर करून आहे ती अधुरी प्रेम कहाणी. जिचा उल्लेख आजही झाला तरी गरमागरम चर्चांना उधाण येते. ती प्रेमकहाणी आहे अमिताभ, जया आणि रेखा यांची. रेखा आणि अमिताभ या जोडीने ऑनस्क्रीन जितक्या हिट फिल्म्स दिल्या तितकीच ऑफ स्क्रीन त्यांची जोडी वादात राहिली. अमिताभ आणि रेखा यांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर इतकं चर्चेत होतं की, आता दोघंही एकमेकांना नजर उचलून पाहतही नाहीत. असं काय झालं रेखा आणि अमिताभमध्ये की, ते दोघं एकमेंकाचा सामना करत नाहीत.

Instagram

का आला अमिताभ-रेखामध्ये दुरावा

अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे एक ठिकाणी येऊनही अनेकदा ते एकमेंकाकडे पाहून साधं हसतही नाहीत. 70-80 च्या दशकात सर्वात जास्त चर्चेत असणारी जोडी म्हणजे अमिताभ-रेखा. आज हे दोघंही वयाच्या अशा वळणावर आहेत जिथे सगळे रूसवे-फुगणे विसरले जातात. एकेकाळी रेखा आणि बिग बी एकमेंकाशिवाय राहू शकत नव्हते. पण आज बघा काय झालं आहे. ना रेखा ना अमिताभ दोघंही एकमेंकाबद्दल काहीच बोलत नाहीत. असं काय आहे जे त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून थांबवतं. सुत्रानुसार, रेखा अमिताभ यांचा ब्लॉग वाचतात पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत. अमिताभ यांचे चित्रपट पाहून रेखा त्यांचं कौतुक करतात पण फक्त म्हणतात की, ते खूप चांगले कलाकार आहेत. पण अनेकांना या दोघांचं सत्य माहीत नाही. सिलसिला चित्रपटानंतर या दोघांनीही पुन्हा कधी एकत्र काम केलं नाही. कदाचित याचं रहस्य त्या रात्रीत आहे का….

Instagram

त्या रात्री असं काय घडलं....

तो 1977 सालचा काळ होता जेव्हा रेखा सिंदूर लावून फिरत असे. तसंच तिच्या आई होणाची बातमी मीडियामध्ये देऊन अमिताभ आणि तिचं नातं जगजाहीर करत होती. तर दुसरीकडे जया बच्चन शांतपणे आपल्या विखुरलेल्या कुटुंबाला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. एक दिवस जेव्हा अमिताभ एका शूटींगच्या निमित्ताने मुंबईबाहेर गेले होते तेव्हा जया यांनी रेखांना फोन केला. जया यांचा फोन उचलताना रेखाला वाटलं की, आता जया काहीतरी बरं-वाईट ऐकवणार. पण असं झालं नाही. जयाने फोन करून रेखाला आपल्या घरी डिनरसाठी बोलावलं. रेखा विचार करत होती की, जया तिच्या घरी बोलवून तिला काहीतरी सुनवेल किंवा भांडण काढेल. रात्रीच्या वेळी रेखा नटून-थटून जया यांच्या घरी पोचली. रेखाच्या तुलनेत जया अगदी साध्या कपड्यांमध्ये होत्या. जया यांनी रेखाचं स्वागत केलं आणि खूप गप्पा मारल्या. पण या गप्पांदरम्यान अमिताभ यांचा उल्लेखही केला नाही. जया यांनी रेखाला आपल्या घराचं इंटीरियर दाखवलं, गार्डन दाखवलं आणि खूप कौतुकही केलं. डिनरनंतर जेव्हा रेखा घरी जाऊ लागली तेव्हा तिला निरोप देताना जया यांनी एक खास गोष्ट सांगितली. जी ऐकून रेखा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. जया यांनी दरवाज्यावर रेखा यांना सांगितलं की, काही झालं तरी मी अमितला सोडणार नाही. हे होताच पुढच्या दिवशी मीडियामध्ये जया आणि रेखा यांच्या डिनरबाबतचे किस्से रंगू लागले. पण ना जया काही बोलल्या ना रेखाने तोंड उघडलं. या डिनरनंतर एकाएकी अमिताभ यांचं आयुष्य खूपच बदललं. तेव्हापासूनच अमिताभ यांनी रेखापासून दुरावा ठेवायला सुरूवात केली. कारण त्यांना कळलं होतं की, जयाला त्यांच्या रेखाच्या बाबतीत कळलं आहे. पण त्या कुटुंबामुळे त्या काहीच बोलणार नाहीत. Instagram

बॉलीवूडमधील जाणकार असं सांगतात की, जर जयाने त्या दिवशी रेखाला डिनरसाठी बोलवलं नसंत तर आज कदाचित रेखा त्यांच्या संसारात शिरण्यास यशस्वी झाली असती.

Instagram

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.