चित्रपटातून नशीब आजमावल्यानंतर बॉबी देओलचा वेबसिरीज प्रवास सुरु

चित्रपटातून नशीब आजमावल्यानंतर बॉबी देओलचा वेबसिरीज प्रवास सुरु

चित्रपटातून काम करणे प्रत्येक अभिनेत्यासाठी फार महत्वाचे असते. पण सध्याचं जग चित्रपटांच्या पलीकडे जाऊन पोहोचले आहे. कारण आता थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा अनेकांना मोबाईलमध्येच वेबसिरीज पाहायला आवडतात. त्यामुळेच अनेक बड्या कलाकारांनी वेबसिरीजमधून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. याच माध्यमातून अनेकांनी आपले नावही कमावले आहे. या कलाकारांची यादी फार मोठी आहे. पण आता जे कलाकार काही कारणास्तव चित्रपटातून पुन्हा कमबॅक करु शकले नाहीत असे कलाकारही आता वेबसिरीजचा आधार घेऊ लागले आहेत. आता बॉबी देओलच घ्या ना काही चित्रपटांनंतर त्याला काम मिळणे बंद झाले पण आता तोही वेबसिरीजच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपला नवा प्रवास सुरु करणार आहे. त्याचे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांची उत्सुकता या वेबसिरीजने वाढवली आहे. 

शकुंतला देवी नंतर आता 'शेरनी' व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग

या वेबसिरीजमधून करतोय पदार्पण

बॉबी देओल  नेटफ्लिक्सच्या ‘आश्रम’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या सिरीजचा ट्रेलर अजून आला नाही. पण याचा एक डिस्क्लेमर आधी रिलीज करण्यात आला आहे. या वेबसिरीजमध्ये काही भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा कोणत्याही एका ठराविक बाबांशी निगडीत नसून ही संपूर्ण काल्पनिक कथा असल्याचा दावा हा वेबसिरीजकडून करण्यात आला आहे. या वेबसिरीजमध्ये बॉबी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.  21 ऑगस्ट रोजी ही वेबसिरीज रिलीज होणार आहे.  बॉबी देओलचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले असले तरी या वेबसिरीजमध्ये आणखी कोम असेल याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी उत्सुकता वाढली आहे. 

बॉबी देओलने घेतला ब्रेक

Instagram

धर्मेंद्रचा मुलगा बॉबी देओल चित्रपटात आला त्यावेळी त्याच्या लुक्समुळे तो बराच चालला. बॉबी देओलला अनेक चित्रपटात खूप काम मिळाले. त्याने अनेक चित्रपटात मुख्य भूमिका स्विकारल्या. त्याने 40 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे पण त्यानंतर बॉबी देओल चित्रपटांपासून दुरावला. यामागे महत्वाचे कारण होते ते म्हणजे काम नसणे. बॉबी देओलला चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. पण त्यानंतर त्याला खूप वर्षानंतर  रेस (2018) आणि हाऊसफुल्ल (2019) या चित्रपटात काम मिळाले. 51 वर्षांचा बॉबी देओल खूप दिवसांनी वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला. पण आता या नव्या वेबसिरीजमुळे त्याला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत पाहता येणार आहे. 

कधी काळी या अभिनेत्रींनी निभावली होती व्हिलनची भूमिका

बॉबी देओलचा मुलगाही करु शकतो पदार्पण

Instagram

धर्मेंद्र यांची तिसरी पिढी चित्रपटात आली आहे. सनी देओलच्या मुलाने नुकतेच चित्रपटात पदार्पण केले आहे. होम प्रोडक्शन असलेल्या ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून काम केले. त्यामधून त्याचा डेब्यू करण्यात आला. त्यानंतर त्याने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही.  बॉबी देओलचा मुलगा आर्यमन आता 19 वर्षांचा आहे. तो ही दिसायला सुंदर आहे त्यामुळे तोही येत्या काळात चित्रपटांमध्ये येऊ शकतो अशी अपेक्षा आहे. 


सध्या तरी बॉबी देओलच्या वेबसिरीजची सगळ्यांना प्रतिक्षा आहे. कारण याचे पोस्टर पाहता ही सिरीज नक्कीच चांगली असणार असे अनेकांना वाटत आहे. 

मुझसे शादी करोगे'फेम अभिनेत्रीचा अपघात, फोटो व्हायरल