आमिर खानचा नवा अवतार पाहिला का, 'Laal Singh Chaddha'मधील लुक व्हायरल

आमिर खानचा नवा अवतार पाहिला का,  'Laal Singh Chaddha'मधील लुक व्हायरल

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या (Aamir Khan) चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. आमिरनं 2020मधली ख्रिसमसची डेट आपला आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा'साठी (Laal Singh Chaddha) बुक केली आहे. सिनेमाचं शुटिंग देखील सुरू करण्यात आलं आहे. आमिरचा हा सिनेमा पुढच्या वर्षी सिनेमागृहांमध्ये धम्माल करणार आहे. आमिर खानचा सिनेमा म्हटलं की पहिली उत्सुकता असते ती त्याची लुकची, अर्थात. कारण सिनेमाच्या स्क्रिप्टपासून ते प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आमिर स्वतः बारकाईनं त्यात लक्ष घालतो. आतापर्यंत केलेल्या सिनेमांमध्ये आमिरनं स्वतःच्या लुकवर प्रचंड मेहनत घेतल्याचंही आपण पाहिलंच आहे. इतके प्रयोग केल्यानंतर आता 'लाल सिंह चड्ढा'मधील 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा लुक कसा असणार याची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

असा आहे आमिर खानचा भन्नाट लुक

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिर खान सरदाराच्या पेहरावात दिसत आहे. डोक्यावर पगडी, वाढवलेली दाढी, फिकट जांभळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पँट असा आमिरचा लुक आहे. अर्थात आमिरचा हा लुकदेखील हटकेच म्हणावा लागेल.  आमिरसोबत या सिनेमामध्ये बॉलिवूडची बेबो 'करीना कपूर' हिची देखील (Kareena Kapoor) सिनेमात मुख्य भूमिका आहे. आमिर खानप्रमाणेच करीना कपूरचाही सिनेमातील लुक व्हायरल झाला होता. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये करीना कपूरनं गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या चुडीदार ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. 'लाल सिंह चड्ढा' व्यतिरिक्त करीना कपूर 'गुड न्यूज' आणि 'अंग्रेजी मीडियम' सिनेमातही आपल्याला पाहायला मिळणार आहे.

आमिर खाननं 'लाल सिंह चड्ढा'चं मोशन पोस्टर केलं शेअर

आमिर खानं 5 नोव्हेंबर रोजी आपल्या ट्विटर हँडलवरून 'लाल सिंह चड्ढा'सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज केलं होतं. केवळं 36 सेकंदांच्या असलेल्या मोशन पोस्टरमध्ये एक गाणं ऐकायला मिळत आहे. 'क्या पता हम मे कहानी, या कहानी मे हम...'असे गाण्याचे बोल आहेत. 'लाल सिंह चड्ढा' हा हॉलिवूड सिनेमा 'टॉम हँक्स'चा रीमेक आहे. अद्वैत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. 'सीक्रेट सुपरस्टार' या सिनेमाद्वारे चंदन यांनी दिग्दर्शनमध्ये पर्दापण केले.
(वाचा : 90s मधील हे सुपरमॉडेल्स सध्या काय करत आहेत)

करीना-आमिरचा हा तिसरा सिनेमा

यापूर्वी करीना-आमिर ही जोडी 'तलाश' आणि 'थ्री इडियट्स' सिनेमामध्ये पाहायला मिळाली होती. 'थ्री इडियट्स' 2009मध्ये तर 'तलाश' 2012मध्ये बॉक्सऑफिसवर झळकला होता. 'थ्री इडियट्स'मध्ये या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं. या दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर चांगली गाजली होती. शिवाय, बॉक्सऑफिसवर सिनेमाही तुफान चालला होता.
(वाचा : हाऊसफुल 'कुमार' आणि ‘शूटर दादी’ भूमि पेडणेकर सर्वाधिक लोकप्रिय)

तिन्ही 'खान' दिसणार एकाच सिनेमात?

विशेष म्हणजे या सिनेमाद्वारे सिनेरसिकांना बॉलिवूडमधील तिन्ही खान मोठ्या एकत्रित पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. आमिरच्या या सिनेमात बादशाह शाहरुख खान आणि दबंग सलमान खान देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.
(वाचा : या कारणामुळे शिल्पा शेट्टी होती बॉलीवूडपासून दूर)

मिळालेल्या माहितीनुसार, आमिरने सिनेमात शाहरूखसाठी एक विशेष आणि महत्त्वाची भूमिका राखून ठेवली आहे. आमिरच्या सिनेमात 'अर्जुन' (शाहरूख खान) दिसणार आणि 'करण' (सलमान) नाही... असं कसं चालेल. प्रेक्षकांचीच आवडनिवड लक्षात घेता एकेकाळी गाजलेली ही 'करण-अर्जुन'ची (शाहरूख-सलमान) जोडी आमिर 'लाल सिंग चड्ढा' निमित्तानं त्यांच्या चाहत्यांसमोर पुन्हा आणणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण सलमाननं भूमिकेसाठी होकार दिला की नाही? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, नवीन रुपातील आमिर खान पाहण्यासाठी तुम्हाला 2020 मधील डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.  

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.