ADVERTISEMENT
home / मनोरंजन
चित्रपटात किन्नरची भूमिका साकारुन या कलाकारांनी मिळवली अफलातून प्रसिद्धी

चित्रपटात किन्नरची भूमिका साकारुन या कलाकारांनी मिळवली अफलातून प्रसिद्धी

चित्रपटात वेगळी भूमिका साकारण्याचे स्वप्न सगळ्याच कलाकारांचे असते. पण काही भूमिका असतात ज्या करण्यासाठी एक वेगळी मेहनत घ्यावी लागते. अनेकदा अशा भूमिका करताना प्रेक्षकांचा रोष देखील सहन करावा लागतो. किन्नरांचे आयुष्य आपल्यापेक्षा फार वेगळे असले तरी ते समाजाचा एक भाग असल्याचा विसर आपल्याला अनेकदा पडतो. पण या भूमिका आणि त्यांच्याशी निगडीत काही काम एखाद्या कलाकाराने केले तर ते आपल्याला कायम लक्षात राहते. किन्नरच्या भूमिका साकारण्याची जोखीम काही कलाकारांनी घेतली आहे. जाणून घेऊया असे कलाकार ज्यांनी ऑनस्क्रिन साकारली किन्नरची भूमिका आणि मिळवली अफलातून प्रसिद्धी 

अखेर बॉलीवूडच्या या सेलिब्रिटी जोडीने घेतला घटस्फोट, मुलाला दोघंही सांभाळणार

आशुतोष राणा

आशुतोष राणा

Instagram

ADVERTISEMENT

आशुतोष राणाने पडद्यावर कायम ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याने साकारलेली किन्नरची भूमिका आजही प्रसिद्ध आहे. ‘शबनम मौसी’(2005) या चित्रपटात त्याने एका अशा किन्नरची भूमिका साकारली होती. जिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी होता. राजकारणात प्रवेश करणारी शबनम मौसी ही पहिली किन्नर होती. जी निवडणुकीला उभी राहिली आणि तिने ती जिंकलीसुद्धा. आपण समाजाचा एक भाग आहोत हे सिद्ध करण्यासाठी आणि किन्नर समाजाला उभारी देण्यासाठी तिने काम केले. आशुतोष राणाने साकारलेली ही भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. शबनम मौसीचा अभिनय त्याने पडद्यावर अगदी चपखल वाटावा असा केला होता. त्यामुळे त्याची खूप प्रशंसाही झाली.

सडक2 च्या ट्रेलरला प्रेक्षकांची नापसंती, लाईक्सपेक्षा जास्त डिस्लाईक्स

सदाशिव अमरापुरकर

सदाशिव अमरापुरकर

Instagram

ADVERTISEMENT

सदाशिव अमरापुरकर यांच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. 1991 साली आलेल्या ‘सडक’ या चित्रपटात त्यांनी व्हिलनची भूमिका साकारली होती. त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या किन्नरची भूमिका बजावली होती. त्यांची ही भूमिका व्हिलनची जरी असली तरी त्यांचा अभिनय हा वाखाणण्यासारखा होता. सदाशिव अमरापुरकर यांना या रोलसाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला होता. 

 

 

परेश रावल

परेश रावल

ADVERTISEMENT

Instagram

परेश रावल यांनी देखील अनेक भूमिका साकारल्या आहेत. 1997साली आलेल्या ‘तमन्ना’ या चित्रपटात त्यांनी किन्नरची भूमिका साकारली होती. महेश भट दिग्दर्शित या चित्रपटात अनेक महत्वाचे कलाकार होते. पण परेश रावल यांच्या अभिनयाची चर्चा मात्र या चित्रपटानंतर खूप होऊ लागली.

रवि किशन

रवि किशन

Instagram

ADVERTISEMENT

हिंदी- भोजपुरी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवणारे रवि किशन यांनी देखील ग्रे शेड असलेल्या भूमिका साकारल्या आहेत. 2013 साली आलेल्या ‘बुलेट राजा’ या चित्रपटात त्यांनी किन्नरची भूमिका साकारली होती. रवि किशनला अशा भूमिकेत पाहण्याचा विचारही ज्यांनी केला नसेल त्यांच्यासाठी रवि किशनचा हा लुक एक शॉकपेक्षा कमी नव्हता. बुलेट राजा चित्रपटाने जेवढी कमाई केली नसेल त्याहून अधिक तारीफ ही रविकिशनची त्या रोलसाठी झाली. 

राकेश बापट घेणार ऑनलाईन क्लास स्वतःच बनवा ‘बाप्पाची मुर्ती’

राजकुमार राव

राजकुमार राव

Instagram

ADVERTISEMENT

राजकुमार राव यानेही अनेक वेगळ्या भूमिका पडद्यावर साकारल्या आहेत.राजकुमार राव याने देखील किन्नरची भूमिकी साकारली आहे. ‘एमी साइरा बानो’ या चित्रपटात त्याने ही भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयामुळे त्याची ही भूमिका फार उठून दिसली होती. 

किन्नरच्या भूमिकेला न्याय देण्याचे काम या काही कलाकारांनी केले. त्यांचा अभिनयही आजही अनेकांच्या लक्षात आहे. 

16 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT