बॉलीवूडचे ‘हे’ सेलिब्रेटी सध्या वेबसिरिजमध्ये आजमावत आहेत आपलं नशीब

बॉलीवूडचे ‘हे’ सेलिब्रेटी सध्या वेबसिरिजमध्ये आजमावत आहेत आपलं नशीब

एक असाही काळ होता जेव्हा बॉलीवूड सेलिब्रेटीज छोट्या पडद्यावर काम करण्यास सहज तयार होत नसत. मात्र 2000 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या माध्यमातून बिग बी अभिताभ बच्चन यांनी त्यांच्या नव्या इनिंगला सुरूवात केली. कौन बनेगा करोडपती शोच्या यशानंतर बॉलीवूड सेलिब्रेटीजनां छोट्या पडद्याचे वेध लागले. हळूहळू सर्वच मोठमोठे कलाकार टेलीव्हिजन माध्यमातून झळकू लागले. एवढंच नाही तर आपल्या चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठीदेखील सेलिब्रेटीजनी छोट्या पडद्याचा वापर करण्यास सुरूवात केली. 

आता बदलत्या काळानुसार बॉलीवूड सेलिब्रेटीजनी आपला मोर्चा वेबसिरिजकडे वळवला आहे. सध्या वेबसिरिजचा जमाना आहे. अनेक निरनिराळ्या विषयांवर आधारित वेबसिरिजची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे बॉलीवूडचे हे स्टार्स या माध्यमातून आपलं नशीब आजमावू पाहत आहेत. मात्र याचत काही सेलिब्रेटीजना यश मिळालं आहे तर काही मात्र अपयशाचा सामनादेखील करावा लागत आहे.

पाहूया कोणकोणते बॉलीवूड सेलिब्रेटी वेबसिरिजमध्ये काम करत आहेत

आर माधवन

‘रहना है तेरे दिल मै’ आणि ‘दिल चाहता है’ मधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता आर माधवन सध्या वेबसिरिजमध्ये आपलं नशीब आजमावत आहे. आर माधवनने बॉलीवूडप्रमाणे टॉलीवूडमध्येही आर माधवन लोकप्रिय आहे. 2018 साली आर माधवनने ब्रीद या वेबसिरिजच्या माध्यमातून वेबसिरिजमध्ये पदार्पण केलं होतं. चाहत्यांना ब्रीदमधील आर माधवनचे काम फारच आवडले होते.

सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी

नेटफ्लिक्सवर 2018 च्या ‘सिक्रेट गेम्स’ वेबमालिकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. या वेबसिरिजमध्ये सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी या दोघांनी काम केलं होतं. याच्या पुढील भागांचीदेखील चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

राजकुमार राव

एकता कपूरच्या अल्ट बालाजीवरील ‘बोस’ मालिकांमधून राजकुमार रावने पदार्पण केलं होतं. ही वेबसिरिज सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित होती. या वेबसिरिजला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.

दिया मिर्झा

अभिनेत्री दिया मिर्झाने ‘रहना है तेरे दिल मै’ या चित्रपटातून बॉलीवूड करिअरला सुरूवात केली होती. नुकतीच दिया मिर्झा झी 5 च्या काफिर या वेबसिरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. काफिरमध्ये एका दहशतवादाच्या संशयावरून अटक केलेल्या महिलेचा संघर्ष दाखविण्यात आला आहे. मोहित रैना या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या मालिकेला  सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

शर्मन जोशी

‘स्टाईल’ आणि ‘दिल चाहता है’ या चित्रपटांमधून शर्मन जोशीला चांगली लोकप्रियता मिळाली. मात्र त्यानंतर त्यांच्या चित्रपटांना फार यश मिळालं नाही. आता शर्मन वेबसिरिजमधून आपलं करिअर घडवत आहे. काही दिवसांपूर्वी एकता कपूरच्या अल्ट बालाजी वरील ‘बारिश’ मालिकेत शर्मनने काम केलं होतं. मात्र या वेबसिरिजला फार यश मिळू शकलं नाही.

हुमा कुरेशी

बॉलीवूडमध्ये काही चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्यावर हुमा कुरेशीदेखील वेबसिरिजकडे वळली आहे. तिने नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लैला’ या वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. या वेबसिरिजमध्ये हुमाला किती यश मिळतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

राधिका आपटे

अनेक बॉलीवूड आणि मराठी चित्रपटांमधून राधिकाने काम केलं आहे. याशिवाय तिने अनेक वेबसिरिजमध्ये देखील काम केलं आहे. राधिकाच्या या वेबसिरिजमधील कामांमुळे ती सोशल मीडियावरील एक लोकप्रिय अभिनेत्री ठरत आहे.

जॅकी श्रॉफ

बॉलीवूड सेलिब्रेटी जग्गू दादा अर्थात जॅकी श्रॉफने देखील हॉट स्टारच्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या वेबसिरिजमध्ये काम केलं आहे. रामलखनच्या पोलिस ऑफिसरने या वेबसिरिजमध्ये मात्र या मालिकेत एका कैद्याचे काम केलं आहे. जग्गू दादाच्या फॅन्सना त्याचे हे काम फारच आवडले होते. 

करिष्मा कपूर

अभिनेत्री करिष्मा कपूरदेखील वेबसिरिजच्या माध्यमातून आपलं नशीब आजमवण्यासाठी तयार झाली आहे. कारण ती लवकरच मेंटलहूड या वेबसिरिजमधून झळकणार आहे. करिष्माप्रमाणे आज असे अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी आहेत जे वेबसिरिजमध्ये काम करण्याचा विचार करत आहेत. 

अधिक वाचा

दिया मिर्झाचं 'काफिर'मधून वेबसिरिजमध्ये पदार्पण

रणवीर सिंह ठरतोय नंबर वन सेलिब्रेटी ब्रॅंड

अभिनेत्री करिश्मा कपूर करतेय कमबॅक

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम