बर्थ डे गर्ल आलिया भट विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का

बर्थ डे गर्ल आलिया भट विषयी या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटचा आज वाढदिवस आहे. आलियाचा जन्म 15 मार्च 1993 मध्ये मुंबईत झाला. आलिया बॉडीवूड दिग्दर्शक महेश भट आणि अभिनेत्री सोनी राजधान यांची कन्या आहे. अभिनेत्री पुजा भट तिची  मोठी बहिण आहे. मुंबईतील जमनाबाई नर्सरीस्कुलमधून तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आलियाने वयाच्या सहाव्या वर्षी अक्षय कुमारच्या 'संघर्ष' चित्रपटात बालकलाकाराचे काम केलं होतं. आलिया बॉलीवूडची ही क्युट बेबीडॉल 26 वर्षांची झाली आहे. अभिनेत्री म्हणून वयाच्या अठराव्या वर्षी ती बॉलीवूडमध्ये आली. 2012 साली धर्मा प्रॉडक्शनच्या 'स्टुडंट ऑफ दी एअर'मधून बॉलीवूडमध्ये आलियाने पदार्पण केलं. फारच कमी वयात तिला चांगली लोकप्रियताही मिळाली. एवढ्या कमी कालावधीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. या सर्व भूमिका तिच्या सक्षम अभिनयामुळे प्रेक्षकांनी पसंत केल्या. त्यामुळे कमी कालावधीत तिचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. 
 

 

 


View this post on Instagram


 

 

Sunshine mixed with a bit of magic. 🌸🌸🌸🌸🌸 Happy Birthday Alia. 💕


A post shared by Mahesh Bhatt (@maheshfilm) on


 

 

 


View this post on Instagram


 

 

Love you daddy-friend 💕 Happy Father’s Day 👨‍👧


A post shared by Alia 🌸 (@aliaabhatt) onआलियाचा करियर ग्राफ


बऱ्याचदा नवोदित अभिनेत्री सुरूवातीला ग्लॅमरस भूमिका करणं पसंत करतात. आलियाने मात्र तिच्या बॉलीवूडमधील पदार्पणानंतर लगेच विविध धाटणीच्या भूमिका करण्यास सुरूवात केली. हायवे, 2 स्टेट्स, उडता पंजाब, लव्ह यु जिंदगी, बद्री की दुल्हनिया, राझी असे हटके विषयासह तिने अनेक चित्रपट केले. गली बॉय चित्रपटाने तिला एक चांगली ओळख निर्माण करून दिली. आगामी चित्रपट कलंक आणि ब्रम्हास्त्रसाठीदेखील आलिया सज्ज झाली आहे. शिवाय बाहुबलीच्या मेकर्सनी तिला एका चित्रपटासाठी साईन केल्याचीही चर्चा आहे. एस.एस. राजमौली यांनी स्वत: आलियाकडून ही फिल्म साईन करुन घेतली असून बाहुबलीप्रमाणेच हा एक बीग बजेट सिनेमा ते आलियासोबत करणार आहेत. या चित्रपटाचं नाव 'रामा रावणा राज्यम' असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. सहाजिकच या बीग बजेट चित्रपटामुळे आलियाचा नावाचा चांगलाच दबदबा बॉलीवूडमध्ये निर्माण होणार यात शंकाच नाही.


आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म


alia-bhatt2


रणबीर कपूरने आलियासाठी केलं आहे खास बर्थ डे पार्टीचं आयोजन


आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं नातं आता जगजाहीर झालं आहे. कारण बॉलीवूडचे हे लव्ह बर्ड्स अनेक कार्यक्रमात एकत्र दिसतात. करण जोहरच्या ब्रम्हास्त्रमध्येही ही दोघं एकत्र काम करत आहेत. सोशल मीडियावर आलिया आणि रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना तर अक्षरशः उधाण आलं आहे. आज आलियाच्या वाढदिवसासाठी रणबीर कपूरने खास प्लॅनिंग केलं होतं. रात्री सरप्राईझ देत त्याने आलियाचा वाढदिवस साजरा केला.

‘माझं लग्न झालं आहे’ म्हणाली आलिया भट


alia ranveer


दबंग गर्ल सोनाक्षी करतेय नवोदित अभिनेत्याला डेट


फोटोसोजन्य - इन्टाग्राम