ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण

दीपिका पादुकोणच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण

सध्या रोज कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीला कोरोनाची लागण (corona) झाल्याचे ऐकू येत आहेत. जगभरात कोरोनाने थैमान माजवले आहे. या सगळ्यात श्रीमंतांपासून ते अगदी गरिबांपर्यंत सगळेच भरडले जात आहेत. आता बॉलीवूडची मस्तानी दीपिका पादुकोणही कोरोनाच्या संक्रमणापासून वंचित राहिलेली नाही. दीपिकाच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. दीपिकाच्या घरातील व्यक्ती या संकटातून लवकरात लवकर बाहेर याव्यात यासाठी तिचे चाहते प्रार्थना करत आहेत. 

‘लव्ह लग्न लोच्या’फेम अभिनेत्री विवाहबंधनात, फोटो व्हायरल

दीपिकाच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा

दीपिका पादुकोणचे वडील प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण, तिची आई आणि बहीण अनिशा या तिघांनाही 10 दिवसांपूर्व कोरोना झाल्याचे समोर आले होते. तिघांनाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरत बंगळूरूमधील भगवान महावीर जैन रूग्णालयात दाखल करण्यात आले. एक आठवड्यात दीपिकाची आई आणि बहीण अनिशाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र प्रकाश पादुकोण यांच्या प्रकृतीत तोपर्यंत सुधारणा झाली नव्हती. आई आणि बहीण कोरोनाच्या त्रासातून बाहेर आल्या असल्या तरीही अजून वडिलांनी पूर्णतः कोरोनावर मात केलेली नाही. पण हळूहळू प्रकाश पादुकोण यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण आता दीपिकालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दीपिकाचे चाहते चिंताग्रस्त असून दीपिका लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. 

कंगनाचं ट्विटर अकाऊंट झालं बॅन,सोशलवर मीम्सचा पाऊस

ADVERTISEMENT

मानसिक आरोग्य या काळात महत्वाचं

दीपिकाने यासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली असून या काळात मानसिक आरोग्यही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहेत. यामध्ये तिने म्हटलं आहे की, ‘माझं कुटुंब आणि मी सर्वच जण ठीक होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण यावेळी हे लक्षात घ्यायला हवं की भावनात्मकदृष्ट्याही उत्तम राहणं आणि त्यातून बरं होणं गरजेचं आहे’ आपण कुटुंबापासून दूर असलो तरीही रोज त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्कात असल्याचंही तिने सांगितले आहे. इतकंच नाही तर #youarenotalone असा हॅशटॅग वापरत तिने अनेक कोरोनाग्रस्त लोकांना यातून बाहेर येण्यासाठी मानसिक आधारही दिला आहे. यासह तिने मदतीसाठी दूरध्वनी क्रमांक दिला आहे. ज्या व्यक्तींना मानसिक आधाराची गरज आहे त्यांनी नक्की या क्रमांकावर संपर्क साधा असंही तिने म्हटलं आहे. दीपिका पादुकोण काही वर्षांपासून मानसिक आजार असणाऱ्यांसाठी ट्रस्ट चालवत आहे. अशा व्यक्तींना बोलण्याची आणि व्यक्त होण्याची गरज असते त्यामुळे त्यांना आधार देणे महत्त्वाचे असल्याचे दीपिका वाटते. नैराश्यातून स्वतः गेली असल्यामुळेच दीपिकाने हे पाऊल उचलले आहे. दीपिका सध्या योग्य उपचार घेत असून क्वारंटाईन आहे. मुंबईत कडक लॉकडाऊन केल्यानंतर दीपिका पती रणवीर सिंहसह तिच्या कुटुंबासह राहण्यासाठी बंगळूरूला रवाना झाली होती. तिचे हे फोटोही व्हायरल झाले होते. दीपिका सध्या कोरोनाची लागण झाल्यामुळे आराम करत असून योग्य ते उपचार घेते आहे. दरम्यान निर्बंध शिथील झाले होते तेव्हा दीपिकाने आपल्या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरू केले होते. आता पुन्हा एकदा कडक निर्बंध लावल्याने चित्रीकरण बंद आहे. पण यातून लवकरच बाहेर येऊन पुन्हा एकदा जोमाने दीपिका काम सुरू करेल अशी तिच्या चाहत्यांना आशा आहे. 

लवकरच येणार ‘दृश्यम 2’ चा हिंदी रिमेक, अजयचा दिसणार नवा अंदाज

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

04 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT