अभिनेत्री महिमा चौधरीने केले सुभाष घईंवर गंभीर आरोप, केला खुलासा

अभिनेत्री महिमा चौधरीने केले सुभाष घईंवर गंभीर आरोप, केला खुलासा

गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर असणारी महिमा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘परदेस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी महिमा गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर आहे. मात्र आता चित्रपट प्रदर्शित होऊन 23 वर्ष झाल्यानंतर महिमाने दिग्गज दिग्दर्शक सुभाई घेई यांच्याबद्दल खुलासा करत त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सुभाष घई यांनी त्यावेळी आपल्याला कशा प्रकारे त्रास दिला याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे. यानंतर सर्वांनाच आता धक्का बसला आहे. इतकंच नाही तर या गंभीर परिस्थितीत केवळ ते चार ते पाच लोकांनीच आपली साथ दिल्याचंही तिने स्पष्ट केलं आहे. 

संजय दत्तवर अजून एक संकट, फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रस्त

काही वर्ष तणावात गेल्याचे केले मान्य

बॉलीवूड अभिनेत्री महिमाने सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप लावत आपली काही वर्ष तणावात गेली असल्याचं इतक्या वर्षांनी स्पष्ट केलं आहे. महिमाने सांगितले की, ‘सुभाष घईंनी मला खूपच त्रास दिला होता. ते मला अगदी न्यायालयापर्यंतही घेऊन गेले होते आणि माझा पहिला शो त्यांना रद्द (कॅन्सल) करायला होता. हे सर्व माझ्यासाठी खूपच तणावग्रस्त होतं. त्यांनी सर्व निर्मात्यांना त्यावेळी मेसेज केला होता की माझ्यासह कोणीही काम करू नये. जर 1998 आणि 1999 मधील तुम्ही ट्रेडगाईड मॅगझिन पाहिले तर तुम्हाला त्यात नक्की जाहिरात दिसेल की, ज्यामध्ये छापण्यात आले होते, माझ्यासह कोणालाही काम करायचे असेल तर त्याआधी सुभाष घई यांच्याशी बोलावं लागेल, अन्यथा कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन झाल्याचे समजण्यात येईल. पण मी असं कोणत्याही प्रकारचं कॉन्ट्रँक्ट त्यावेळी साईन केलं नव्हतं ज्यामध्ये मला त्यांची परवानगी घ्यावी लागेल असं लिहिण्यात आलं होतं. त्यावेळी केवळ सलमान खान, संजय दत्त, डेव्हिड धवन आणि राजकुमार संतोषी या चार व्यक्ती माझ्यासह उभ्या राहिल्या आणि मला धीर दिला होता. या व्यक्तींनी मला धीर राखण्याचा सल्ला दिला होता. डेव्हिड धवनने तर मला कॉल करून त्रास करून घेऊ नकोस आणि शांत राहा असाही सल्ला दिला होता. या चार जणांव्यतिरिक्त मी त्यावेळी कोणाचाही कॉल घेतला नव्हता.’ 

पतीच्या आत्महत्येनंतर मयुरी देशमुखने केली भावनिक पोस्ट

‘सत्या’मधून काढून टाकण्यात आल्याचं महिमाने सांगितलं

महिमाने यापुढे सांगितले की, राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ चित्रपटासाठी मला साईन करण्यात आले होते. मात्र चित्रीकरण सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. तो माझा दुसरा चित्रपट होता. मी साईनिंग अमाऊंटदेखील घेतली होती. पण त्यावेळी त्यांनी मला साधं कॉल करूनही सांगितलं नाही की मला काढून टाकण्यात आलं आहे. त्यावेळी मला मीडियाकडून कळलं की, माझ्याशिवाय चित्रीकरणाला सुरूवात झाली असून माझ्या जागी उर्मिला मातोंडकर काम करत आहे. पण त्याआधी मी काही ठिकाणी मुलाखतीमध्येही सांगितलं होतं की, मी सत्या चित्रपट करत आहे. शेवटी महिमाने हेदेखील सांगितले की, इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी लढावं लागतं आणि आपल्याला आपल्या पायावर उभं राहावं लागतं. पुन्हा एकदा सुभाष घईंवर अशा प्रकारचे आरोप लागल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महिमाच्या या वक्तव्यावर अजूनपर्यंत कोणीही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता पुढे काय होतंय याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

फोर्ब्सच्या लिस्टनुसार अक्षय यंदाचा एकमेव श्रीमंत बॉलीवूड कलाकार

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा