प्रियांका चोप्राने केले लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन, सलॉनमध्ये पोहचले पोलीस

प्रियांका चोप्राने केले लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन, सलॉनमध्ये पोहचले पोलीस

कोरोना व्हायरसच्या वाढत्या कहरामुळे लंडन शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊनला (Lockdown) सुरूवात झाली आहे. सध्या अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra Jonas), तिची आई मधू चोप्रा आणि पती निक जोनास (Nick Jonas) हे लंडनमध्येच अडकले आहेत. मात्र या लॉकडाऊनदरम्यान प्रियांकाने जोश वूडच्या स्टायलिश सलॉनला भेट देऊन लॉकडाऊन नियमाचे उल्लंघन केल्याचे आता समोर आले आहे. यादरम्यान पोलीसही नियम उल्लंघन केल्याप्रकरणी सलॉनमध्ये येऊन पोहचले होते. मात्र प्रियांका चोप्रा अथवा जोश वूड यांच्यावर कोणत्याही प्रकारचा फाईन लावण्यात आला नाही. पण त्यांना याची पूर्ण कल्पना खडसावून देण्यात आल्याचे कळत आहे.

‘रंग माझा वेगळा’ म्हणत अभिज्ञा रंगतेय मेहुलच्या रंगात, मेंदीचे फोटो व्हायरल

सलॉनमध्ये पोहचले पोलीस

पोलिसांच्या प्रवक्त्याने मेल ऑनलाईन या वृत्तपत्राला दिलेल्या  माहितीतून ही बाब समोर आली आहे. संध्याकाळी साधारण 5.40 च्या सुमारास जोश वूडच्या स्टायशिल सलॉनमध्ये प्रियांका असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांना कळले. त्यावेळी पोलीस याठिकाणी पोहचले आणि त्यांनी हेअर सलॉनचे मालक आणि प्रियांका चोप्रा यांना कोरोनासंबंधित सर्व नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्यावर कोणतीही पेनल्टी लावण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे. सोमवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युकेमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली असल्याने प्रियांका चोप्राने घराबाहेर पडणं हेच मुळात नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे. सोमवारी ब्रिटनमधील जनतेला लॉकडाऊनच्या नियमांसंबंधी सांगण्यात आले असून याचे काटेकोर पालन करावे लागणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. पण बुधवारी याच नियमांचे उल्लंघन प्रियांका चोप्राने केल्याने निदर्शनाला आले. प्रियांका हेअर अपॉईंटमेंट घेण्यासाठी इथे आल्याचे दिसून आले. ब्रिटनमध्ये सध्या लॉकडाऊन चालू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 10000 पाऊंड इतका दंड भरावा लागणार आहे. मात्र या प्रकरणात हेअर सलॉनचे मालक आणि प्रियांका या दोघांनाही दंड भरावा लागलेला नाही. सेलिब्रिटी असण्याचा प्रियांकाला फायदा झाला आहे का अशी कुजबूजही आता सुरू झाली आहे. 

टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड होणार जॅकी श्रॉफची ऑनस्क्रीन बहीण

सलॉन बंद ठेवण्याचे आदेश असूनही नियमांचे उल्लंघन

ब्रिटनमध्ये हेअर,  ब्युटी, नेल, सलॉन, टॅटू पार्लर, स्पा, मसाज पार्लर, पिअर्सिंग यासंबंधित दुकाने बंद ठेवण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. मात्र या नव्या नियमांचे उल्लंघन करून प्रियांका सलॉनमध्ये गेली आणि तिने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे समोर आले आहे. प्रियांकाने विंटर कोट आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान  केले होते. तर तिच्यासह तिची आई आणि तिचा कुत्रा हेदेखील होते. पोलीस जेव्हा इथे पोहचले तेव्हा प्रियांका सलॉनमधून बाहेर पडली आणि निघून गेली. प्रियांकाने निकशी लग्न केल्यानंतर बॉलीवूडमध्ये जास्त काम केलेले नाही. सध्या तिची सिरीज व्ही कॅन बी हिरोज प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा  चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र आता बॉलीवूडमध्ये प्रियांका नक्की नवे कोणते प्रोजेक्ट घेणार की नाही अथवा तिचे भावी प्रोजेक्ट कोणते आहेत याबाबत जास्त कोणालाही माहिती नाही. मात्र लवकरच तिने गुड न्यूज द्यावी असेही एका बाजूला चाहत्यांना वाटत आहे. त्यामुळे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात असणारी प्रियांका या बाबतीत नक्की काय म्हणत आहे हे मात्र अजून समोर आलेले नाही. 

कपिल शर्माच्या घरी दुसरी गुड न्यूज, नाही थांबा कपिलने केला खुलासा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक