अभिनेत्रीने रेखाने केला खुलासा, म्हणाली, 'गुम है किसीके प्यार में'

अभिनेत्रीने रेखाने केला खुलासा, म्हणाली, 'गुम है किसीके प्यार में'

बॉलीवूडची ‘उमराव जान’ एव्हरग्रीन रेखा नेहमीच तिच्या अभिनयासाठी आणि वैयक्तिक आयुष्यातील प्रेमासाठीही चर्चेत राहिली आहे. पण आता पुन्हा एकदा रेखा चर्चेत आली आहे ती पहिल्यांदाच टीव्हीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेच्या प्रोमोमुळे. नुकतंच रेखावर या मालिकेचा प्रोमो मुंबईतील एका हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे आणि हा प्रोमो आता प्रसारितही झाला आहे. इतकंच नाही तर या या प्रोमोसाठी रेखाने घसघशीत रक्कम घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. पण या टायटलपेक्षाही रेखाच्या संवादाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून आता तिच्या वैयक्तिक आयुष्याशीही हे प्रेक्षक जोडू पाहात आहेत. 

रेखाच्या चित्रपटावरूनच घेतले शीर्षक

ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या मालिकेचे शीर्षक हे  रेखाचा 1975 मध्ये प्रसिद्ध झालेला चित्रपट रामपुर का लक्ष्मण यावरून घेतले आहे. तसंच या चित्रपटातील ‘गुम है किसीके प्यार में’ हे गाणं आपल्या आवडत्या  गाण्यांपैकी एक असल्याचं रेखाने निर्मात्यांना सांगितलं आणि तिला ही संकल्पना आवडल्यानेच तिने या मालिकेसाठी प्रोमो करण्यास होकार दिल्याचे वृत्त आहे. निर्मात्यांनी तिला या प्रोमोसाठी विचारले असता रेखाने त्वरीत होकार दिल्याचेही सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर अगदी आपल्या साडीपासून ते हेअर स्टायलिंग आणि मेकअप या सगळ्याचा फायनल लुक रेखाने वैयक्तिकरित्या फायनल केल्याचेही सुत्रांकडून कळत आहे. 

बिग बॉस 14' वर माँ चा आशिर्वाद, शो प्रसारित होण्याआधीच जोरदार चर्चा

केवळ प्रोमोसाठी घेतले 2 कोटी

सध्या मिळालेल्या माहितीनुसार रेखाने या प्रोमोासाठी 2 कोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. कोविड - 19 चालू असल्यामुळे सुरक्षा लक्षात घेऊन याचा प्रोमो वांद्रामधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. यासाठी 10 तास निर्मात्यांना देण्यात आले होते. पण असं असूनही रेखाचं नाव या शो सह जोडलं गेलं तर शो ला अधिक प्रसिद्धी मिळेल याची निर्मात्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी रेखाचेच नाव या शो साठी फायनल केले होते.

सर्जरीनंतर पहिल्यांदाच रणदीप हुड्डाने शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

रेखाच्या आयुष्यातील लव्ह ट्रँगलचा अँगल

‘गुम है किसिके प्यार में’ ही आयपीएस अधिकारी विराट चौहानची कथा असून आपल्या प्रेम आणि कर्तव्य या दोन गोष्टींमध्ये गुरफटला आहे. विराट (नील भट्ट) याचं पत्रलेखा (ऐश्वर्या शर्मा) वर प्रेम आहे पण काही परिस्थितींमुळे त्याला आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी एका शहीदाची मुलगी (आएशा सिंग) सह लग्न करावे लागते. या मालिकेमध्ये लव्ह ट्रँगल दाखविण्यात येणार असून  रेखाच्या आयुष्यातील लव्ह ट्रँगलचा अँगल याला देण्यात आल्याची आता जोरदार चर्चा आहे. अमिताभ - जया आणि रेखा यांच्याबद्दल आतापर्यंत गेले कित्येक वर्ष अनेक गोष्टी छापून आल्या आहेत. मात्र या तिघांनीही कधीही त्यावर भाष्य केले नाही. मात्र रेखा बऱ्याचदा बिनधास्त यासंदर्भात हिंट देताना दिसून आली आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. 

अखेर सहा महिन्यानंतर मल्टीप्लेक्स आणि थिएटर उघडणार

कसौटी जिंदगीच्या जागी सुरू होणार मालिका

‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका लवकरच संपणार असून त्या जागी ही नवी मालिका सुरू होणार आहे. ‘कसौटी जिंदगी की’ ही मालिका दोन वर्षांपूर्वी शाहरूख खानने सुरूवातीला प्रेझेंट केली होती. आता हा ट्रेंडच सुरू झाला आहे. तर ‘कहा हम कहा तुम’ या मालिकेचा नरेटर सैफ अली खान होता. पण या सगळ्यात खरा भाव नेहमीप्रमाणेच खाऊन गेली आहे ती म्हणजे रेखा. रेखाच्या येण्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक