कॅन्सरच्या उपचारानंतर सोनाली बेंद्रेचा नवा लुक

कॅन्सरच्या उपचारानंतर सोनाली बेंद्रेचा नवा लुक

कॅन्सरवर उपचार करण्यासाठी मागील वर्षी जुलै महिन्यात अभिनेत्री सोनाली बेंद्रे न्यूयॉर्कला गेली होती. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारपणावर तिने आता पूर्णपणे मात केली आहे.. हायग्रेड कॅन्सरवर उपचार करून की आता पुन्हा तिच्या जीवनात रूळत आहे. नुकतच तिने तिचा मेकओव्हर केला आहे. या नव्या लुकबाबत तिने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फारच भावुक झालेली दिसत आहे.


sonali new look %281%29


सोनाली झाली भावूक


या व्हिडीओसोबत तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सोनालीने शेअर केले आहे की, “जेव्हा तुम्हाला मुळीच अपेक्षा नसतात अशावेळी तुमची मैत्री एखाद्या चांगल्या व्यक्तीशी होते. माझी मैत्री न्युयॉर्कमध्ये  tomoarakawa सोबत झाली. ही मैत्री आता आणखी दृढ झाली आहे. ही व्यक्ती दोन कात्र्या हातात घेऊन कौशल्याने काम करतो. तो काम करत असताना त्याच्याकडे बघतंच राहवं असं वाटतं. मी त्याची मनापासून आभारी आहे कारण तो माझ्यासाठी वेळ काढून न्युयॉर्कमधून भारतात आला आहे. Kromakay salon मध्ये माझा हेअरकट करण्यात आला. त्यासाठी या सलॉनचीदेखील मी आभारी आहे.” सोनाली बेंद्रे तिच्या नव्या लुकबाबत फारच उत्साही आणि भावनिक झाल्याचं यातून स्पष्ट होत आहे. कारण कर्करोगाचे निदान झाल्यावर याच सलॉनमध्ये तिने तिचे लांबसडक केस कापले होते.

आजारपणात सोनाली होती कुटूंबापासून दूर


आपल्या कुटुंबापासून आणि मित्रमंडळींपासून दूर रहाणे फारच कठीण असते. एखाद्या कठीण प्रसंगी तर आपल्याला त्यांच्या आधाराची अधिक गरज असते. आजारपणात तर त्यांच्यासारखा दुसरा कोणताच आधार नाही असं वाटत असतं. उपचार सुरू असतानाही सोनालीने सोशल मीडियावरुन काहीशा अशा भावना व्यक्त केल्या  होत्या. “दुरावा आपल्याला बरंच काही शिकवतो.घरापासून दूर राहून मला अनेक गोष्टी समजल्या .प्रत्येकजण आपलं जीवन वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतो. मात्र जीवनात यासाठी कधीकधी संघर्ष देखील करावा लागला तरी प्रयत्न करणे कधीच थांबवू नका” अशी भावना तिने व्यक्त केली होती. अमेरिकेत असताना सोनाली सतत आपल्या आजारपणाबाबत सोशल मीडियावरुन अपडेट देत होती. 


sonali new look 3


सोनालीचं पहिलं फोटोशूट


सोनालीने कॅन्सरवर मात केल्यानंतरचं पहिलं फोटोशूटदेखील तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं होतं. या फोटोशूटमध्ये तिने तिच्या ऑपरेशनच्या खूणा दाखविल्या होत्या. आजारपणात उपचार करताना तिच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांच्या खूणा अजूनही तिच्या शरीरावर आहेत. मोठ्या धैर्याने ती या आजारपणाला सामोरी गेली होती. तिने तिच्या या ऑपरेशनच्या खूणा दाखविणारं एक फोटोशूट तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. शिवाय तिला लांबसडक केस खूप आवडत होते. मात्र आजारपणात तिला तिचे केस कमी करावे लागले. केस काढल्यानंतर टोपी, स्कार्फ अथवा विगचा आधार घेण्यापेक्षा ती जशी आहे तशीच तिच्या चाहत्यांसमोर आली होती.


sonali new look 2


जुलैमध्ये सोनाली झाली होती अॅडमिटजुलै महिन्यात सोनालीला हायग्रेड कॅन्सर झाला असल्याची बातमी आली. खुद्द सोनालीनेच ही बातमी तिच्या ट्विटर अकांउटवरून तिच्या चाहत्यांना शेअर केली होती. या बातमीने तिच्या चाहत्यांसह बॉलीवूडमधील अनेकांच्या काळजात धस्स झालं होतं. त्यानंतर कॅन्सरवर उपचार करण्यासाठी सोनाली अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये गेली होती. मात्र आता ती या असाध्य आजारपणावर मात करून पुन्हा आपल्या मायदेशी परत आली आहे.


आणखी वाचा


Good News: इरफान खान कॅन्सरवर मात करून मुंबईत परतसोनाली बेंद्रे इज ‘बॅक’, शुटींगला केली सुरुवात


#BBM2 मध्ये पहिल्या टास्कची धमाल


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम