सनी लिओनी वापरतेय असा वेगळा मास्क, मेकअप होत नाही खराब

सनी लिओनी वापरतेय असा वेगळा मास्क, मेकअप होत नाही खराब

सनी लिओनी अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या मेहनतीने आपली पहिली ओळख पुसून नवी ओळख निर्माण केली आहे. कोरोनानंतर आता पुन्हा एकदा चित्रीकरणांना व्यवस्थित सुरूवात झाली आहे. सनी लिओनीदेखील आता मुंबईत परतली असून तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. काही महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासह सनी कोरोनामुळे मायदेशी परतली होती. पण पुन्हा नुकतीच सनी मुंबईत परत आली आहे. सनीने आपण काम करत असलेल्या सेटवरील फोटो शेअर केला असून सध्या हा फोटो व्हायरल होत आहे. सनीने घातलेला मास्क हा चर्चेचा विषय ठरत आहे. सनी नेहमीच आपल्या फॅशनसाठी ओळखली जाते.

रश्मि रॉकेट'साठी जोरदार मेहनत घेत आहे तापसी पन्नू, असा मेंटेन केला फिटनेस

फॅशनेबल मास्क जो ठेवतो मेकअप नीट

अनेक सेलिब्रिटींनी कोरोना काळामध्ये वेगवेगळे मास्क घालत नवी फॅशन केली आणि हे मास्क ट्रेंडमध्येही आले. तर आता बाजारातही कपड्यांना मॅचिंग असेल मास्क आले आहेत.  त्यामुळे मास्कचेही ट्रेंड्स आता पाहायला मिळत आहेत. पण अनेक मास्क कपड्यांचे असल्याने लिपस्टिक लावल्यास अथवा मेकअप केल्यास, सर्व मेकअप आणि लिपस्टिक मास्कला लागते आणि कपडा खराब होतो. पण सनीच्या या मास्कने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आपण केलेला मेकअप खराब होऊ नये म्हणून सनीने एक पारदर्शक वेगळ्या प्रकारचा मास्क घातल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सनीचा संपूर्ण चेहराही दिसत आहे आणि हा मास्क घातल्यानंतर मेकअप खराब होणार नाही याचीही पूर्ण खात्री दिसून येत आहे. कोणत्याही अभिनेत्रीसाठी मेकअप हा खास असतो. केवळ अभिनेत्रीच नाही तर सामान्य महिलांसाठीही मेकअप हा जिव्हाळ्याचा विषय  आहे. त्यामुळे सनी लिओनीचा हा मास्क सध्या व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. तसंच या मास्कमध्ये संपूर्ण तोंड, नाक व्यवस्थित कव्हर होत असूनही चेहऱ्यवरील मेकअपही दिसून येत आहे. मुळात बाकीच्या  मास्कमध्ये  केवळ डोळे दिसत असल्याने चेहऱ्यावरील हावभावही कळत नाहीत. पण या मास्कमधून सर्व काही स्पष्ट दिसू शकतं. सनीने हा फोटो शेअर करत म्हटले, ‘चित्रीकरण करतानाही मेकअप खराब न करता सुरक्षित’. नेहमीप्रमाणेच सनी या फोटोतही सुंदर दिसत आहे. 

Bigg Boss 14 : राहुल वैद्यने केले या अभिनेत्रीला प्रपोझ, लग्नाची घातली मागणी

सनी करत आहे नव्या प्रोजेक्टवर काम

सनी लिओनीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपली पॉर्नस्टार ही इमेज बदलण्यासाठी सनीने नक्कीच खूप मदत केली आहे. आता सनी एका नव्या प्रोजेक्टमध्ये काम करत असून तिने चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात केली आहे. काही महिन्यांपूर्वी सनी अमेरिकेला रवाना झाली होती. पण आता पुन्हा  कामासाठी सनी मुंबईत परतली असून काळजी घेत आणि सुरक्षित राहून तिने कामाला सुरूवात केली आहे. सनीने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये ‘बॉलीवूड लाईफ आपल्या आयुष्यात पुन्हा परत आले’ असं म्हणून आपला आनंद व्यक्त केला आहे. गेले काही महिने सगळीच कामं ठप्प असल्याने बराच चढउतार पाहायला मिळाला आहे. त्यामुळे आता जोमात सगळ्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरूवात केली असून सगळेच काळजी घेत व्यवस्थित आपली कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यामध्ये बॉलीवूडही मागे नाही. आता लवकरच सनी नक्की कोणत्या रूपात आपल्याला दिसणार यासाठी तिचे चाहते नक्कीच उत्सुक असतील. 

#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक