बॉलीवूडची ‘रजनीगंधा’ विद्या सिन्हा यांचं निधन

बॉलीवूडची ‘रजनीगंधा’ विद्या सिन्हा यांचं निधन

बॉलीवूडमधील ‘रजनीगंधा’ ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा याचं आज रक्षाबंधनाच्या दिवशी निधन झालं. मागच्या बुधवारी तब्बेत ढासळल्याने विद्या सिन्हा यांना जुहू येथील क्रिटीकेअर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तेव्हापासून त्यांची तब्बेत ढासळतच गेली आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. रूग्णालयात दाखल केल्यानंतरही विद्या सिन्हा यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होण्याची शक्यता कमीच होती. ‘छोटी छोटी बात’, ‘पती पत्नी और वो’ सारख्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या अभिनेत्रींपैकी विद्या सिन्हा एक होत्या. राजा काका या चित्रपटातून पदार्पण केलेल्या या अभिनेत्रीचा दुसरा चित्रपट रजनीगंधा तुफान चालला. त्यानंतर विद्या सिन्हा यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. 

फुफ्फुस आणि हृदय झालं होतं कमकुवत

Instagram

विद्या सिन्हा यांचं फुफ्फुस आणि हृदय कमकुवत झाल्याने काही महिन्यांपूर्वीच त्यांना अँजिओग्राफी करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता असं म्हटलं जात आहे. विद्या सिन्हा यांचं वय 72 होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतही विद्या सिन्हा यांनी तब्बेतीकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे त्यांना त्रास झाला. विद्या यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतरही मध्ये काही दिवस त्यांच्या तब्बेत सुधारण होत असल्याचं दिसून येत होतं. पण व्हेंटिलेटर काढल्यानंतर मात्र त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. अखेरीस आज विद्या सिन्हा यांचं निधन झालं. विद्या सिन्हा यांनी सत्तरीच्या काळात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आपल्या चित्रपटाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्तम भूमिका साकारल्या. तर साधारण ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी परदेशात स्थायिक होऊन बॉलीवूडला रामराम ठोकला होता. 

अभिनेता जय भानुशालीला हवी आहे मुलगी, लवकरच होणार बाबा

कुल्फीकुमार बाजेवालामध्ये करत होत्या काम

Instagram

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या बॉडीगार्ड या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये जम बसवला होता. तर सध्या टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका कुल्फीकुमार बाजेवालामध्येही त्या काम करत होत्या. त्याशिवाय काव्यांजली, कबूल है, चंद्रनंदिनी यासारख्या मालिकांमध्येही विद्या सिन्हा यांनी काम केलं आहे. दरम्यान त्यांचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीलं आहे. विद्या सिन्हा यांनी 2009 मध्ये पती नेताजी साळुंखे यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आणि त्यानंतर त्यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. त्यांचं हे दुसरं लग्न होतं तर त्यांचं पहिलं लग्न त्यांच्याशेजारी राहणाऱ्या वेंकटेश्वर अय्यर यांच्यासह झालं होतं. अय्यर यांचं 1996 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी नेताजी साळुंखे यांच्याशी लग्न केलं होतं. तर विद्या आणि अय्यर यांनी 1989 मध्ये एका मुलीला दत्तकही घेतलं होतं. विद्या सिन्हा यांनी आपली कारकीर्द तर गाजवलीच. पण कमबॅक केल्यानंतरही त्यांनी बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं. 

Movie Review : अशक्य स्वप्न पूर्ण करण्याची कहाणी ‘मिशन मंगल’

छोटीसी बात हा प्रेक्षकांच्या आवडीचा चित्रपट

अमोल पालेकर यांच्याबरोबर काम केलेला ‘छोटीसी बात’ हा प्रेक्षकांच्या विशेष आवडीचा चित्रपट होता. तर अमोल पालेकर यांच्याबरोबर त्यांचे हिट चित्रपट होते. संजीव कुमार यांच्यासह चित्रीत झालेलं ‘ठंडे ठंडे पानी से’ हे गाणं विशेष गाजलं.  याशिवाय त्यांचे ‘तुम्हारे लिए’, ‘सफेद झूठ’ आणि ‘मुक्ती’सारखे चित्रपटही गाजले. अचानक विद्या सिन्हा यांचं जाणं हे त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच मनाला चटका लावणारं आहे. 

पुन्हा डेट करत असल्याच्या अफवेवर नेहा कक्कर भडकली