बॉलीवूडच्या अभिनेत्री ज्या आहेत यशस्वी बिझनेस वुमन

बॉलीवूडच्या अभिनेत्री ज्या आहेत यशस्वी बिझनेस वुमन

बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी असे आहेत ज्यांनी अभिनय, डान्सच्या कौशल्याने बॉलीवूडमध्ये तर स्वतःची ओळख निर्माण केली आहेच. पण उद्योग क्षेत्रात यशस्वी उद्योजिकेचा मानही मिळवला आहे. चित्रपटात काम करता करता या अभिनेत्रींनी साईड बिझनेस सुरू केला ज्यातून त्यांना चांगलाच नफा मिळू लागला. यातील अनेक अभिनेत्रींनी आपल्या उद्योगात आता स्वतःचा चांगलाच जम बसवला आहे. जाणून घेऊ या  अशा बॉलीवूड अभिनेत्रींबाबत

अनुष्का शर्मा -

अनुष्का शर्मा अभिनयासोबतच एक यशस्वी उद्योदिकादेखील आहे. सध्या ती तिचं गरोदरपण एन्जॉंय करत आहे. त्यामुळे ती सध्या आराम करत असली तरी तिचं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस आणि चित्रपट डिस्ट्रिब्युशन कंपनी आहे. ज्याचं नाव क्लिन स्लेट फिल्म्स असं आहे. या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून आतापर्यंत तिने एनएच 10 , फिल्लोरी, परी जशा चित्रपटांची  निर्मिती केली आहे. लॉकडाऊनमध्ये प्रदर्शित झालेली पाताललोक ही वेब सिरिजच्या माध्यमातून तिने डिजिटल माध्यमातही पाय रोवले आहेत. लवकरच तिचा Nush या नावाचा कपड्यांचा ब्रॅंड सुरू होणार आहे. ज्यामुळे ती आणखी एका नव्या व्यवसायात आपली पाळंमुळं रोवण्याचा प्रयत्न करत आहे. 

Instagram

दीपिका पादुकोण -

दीपिका पादुकोण आज बॉलीवूडची एक टॉपची सुपरस्टार आहे. तिच्या सक्षम अभिनय आणि व्यक्तिमत्वाच्या जोरावर तिने अनेक चित्रपट सुपरहिट केले आहेत. ज्यामुळे तिचे चित्रपटातील मानधनही चांगलेच मोठे आहे. पण एवढंच नाही दीपिका या व्यतिरिक्त बिझनेसमध्येही यशस्वी झालेली आहे. तिचा फॅशन सेंस जबरदस्त आहे. काही वर्षांपूर्वीच तिने स्वतःची ऑनलाईन फॅशन लाईन " ऑल अबाऊट यु"सुरू केलं होतं. तिचा हे ऑनलाईन फॅशन प्लॅटफॉर्म  मिंत्रावर उपलब्ध आहे.एवढंच नाही तर ती अनेक ब्रॅंडची ब्रॅंड अॅम्बेसेडर सुद्ध आहे. ज्यामुळे तिला अभिनयाव्यतरिक्त अनेक मार्गाने पैसे कमवता येतात.

Instagram

सुश्मिता सेन -

मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता तिच्या सौंदर्याने आजही अनेकांना घायाळ करते. तिच्या सौंदर्य आणि अभिनयाप्रमाणे तिचा बिझनेस सेंसही अफलातून आहे. सुश्मिता सेनचं स्वतःचा ज्वैलरीचा बिझनेस आहे. तिचा हा व्यवसाय तिची आई सांभाळते. त्याचप्रमाणे तिचं स्वतःचं एक प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. ज्याचं नाव आहे तंत्र एंटरटेंटमेंट

Instagram

कैतरिना कैफ -

बॉलीवूडची बार्बी डॉल अशी ओळख असलेली कैतरिना कैफही उद्योग क्षेत्रात मागे नाही. जसं तिने बॉलीवूडमध्ये स्वतःच्या सौंदर्य आणि डान्सने मन जिंकून घेतलं आहे तसंच तिने एक यशस्वी उद्योजिका म्हणून नावही कमावलं आहे.कैतरिनाची नायका या सौंदर्य उत्पादन विकणाऱ्या साईटसोबत पार्टनरशिप आहे. त्याचप्रमाणे तिचा kay हा ब्युटी ब्रॅंडही लोकप्रिय आहे.

Instagram

सनी लिओन -

बॉलीवूडमध्ये स्वतःची  हटके छाप सोडणाऱ्या सनी लिओनचा स्वतःचा बिझनेसदेखील आहे. सनी लिओन एक एडल्ट स्टार असून तिने एडल्ट गोष्टी उपलब्ध होतील असं स्टोअर सुरू केलं आहे. ज्यामध्ये अॅडल्ट टॉईज, अॅडल्ट कपडे, पार्टी वेअर, स्विम वेअर अशा गोष्टी विकल्या जातात. या व्यतिरिक्त तिचा परफ्यूम आणि कॉस्मेटिक्सचाही बिझनेस आहे. ज्याचं नाव लस्ट असं असून तो खूप लोकप्रिय आहे.