नायिका ज्यांनी खऱ्या आयुष्यात निवड केली 'खलनायकां'ची

नायिका ज्यांनी खऱ्या आयुष्यात निवड केली 'खलनायकां'ची

कोणत्याही  चित्रपटात नायक तेव्हाच मोठा होतो जेव्हा खलनायक त्याच्यासमोर तगडा असेल. बॉलीवूडमध्ये काही कलाकारांनी आपल्या खलनायकाच्या भूमिकेत इतका जीव ओतला की खऱ्या आयुष्यातही या कलाकारांना भेटण्याची आणि त्यांच्याशी बोलण्याची भीती वाटावी. मात्र खऱ्या आयुष्यात अशा काही नायिका आहेत ज्यांनी आपला जोडीदार म्हणून या ‘खलनायकां’ची निवड केली. बऱ्याच नायिका या उद्योगपती,  क्रिकेटर अथवा पडद्यावरील नायक यांच्याशी विवाहबद्ध झाल्या आहेत. पण खलनायकांच्या काही पत्नी या नायिका असूनही त्यांनी आयुष्यात जोडीदार म्हणून त्यांची निवड केली असल्याचे पाहायला मिळते. पडद्यावर भयानक वाटणारे हे कलाकार खऱ्या आयुष्यात मात्र अतिशय प्रेमळ आणि कौटुंबिक आहेत. अशाच काही खलनायक आणि त्यांच्या पत्नीविषयी आपण जाणून घेऊया. बॉलीवूडमध्ये तर अशा अनेक जोड्या आहेत. त्यापैकी काही जोड्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. रेणुका शहाणे

‘हम आपके है कौन’ मधील सलमानच्या वहिनीची भूमिका साकारणाऱ्या रेणुका शहाणेला आजही एक प्रेमळ आणि सोज्वळ वहिनीच्या भूमिकेतच पाहिलं जातं. रेणुकाने अनेक कार्यक्रम, मालिका आणि चित्रपटातून  आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून रेणुकाने 2001 मध्ये आशुतोष राणाची निवड करून सर्वच चाहत्यांना धक्का दिला होता. आशुतोष राणा हा खलनायकाच्या भूमिकेत अप्रतिमच आहे. मात्र खऱ्या आयुष्यात अत्यंत हुशार, प्रेमळ आणि कौटुंबिक माणूस अशीच त्याची ओळख आहे. जवळपास 19 वर्ष दोघांचाही संसार अत्यंत सुखात चालू आहे. आशुतोष आणि रेणुकाची जोडी बऱ्याच जणांना आवडते. 

2. पूजा बत्रा

View this post on Instagram

♥️

A post shared by Pooja Batra Shah (@poojabatra) on

आपल्या पहिल्या घटस्फोटानंतर पूजा बत्रा एकटीच होती. मात्र काही वर्ष नवाब शाहबरोबर नात्यात राहिल्यानंतर पूजाने त्याच्याशी लग्नगाठ बांधली. नवाब शाहने अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. ‘टायगर जिंदा है’, ‘डॉन 2’ मधील त्याच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पडद्यावर एक तगडा खलनायक असणाऱ्या नवाबने पूजाच्या आयुष्यात मात्र प्रेम फुलवले हे नक्की. या दोघांनी दोन वर्षांपूर्वीच एकमेकांशी लग्न करून चाहत्यांना धक्का दिला होता. 

बिग बॉस'फेम अभिनेत्रीला मिळाला आयुष्याचा जोडीदार, केला खुलासा

3. पोनी वर्मा

पोनी वर्मा ही अत्यंत नावाजलेली नृत्यदिग्दर्शिका असून  तिने 2010 मध्ये दाक्षिणात्य आणि बॉलीवूडमध्ये तगड्या खलनायकाच्या भूमिका साकारलेल्या प्रकाश राजबरोबर लग्न केले. प्रकाश राजचं आधीही लग्न झालं होतं. मात्र घटस्फोट झाल्यानंतर पोनीशी प्रकाशने लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. प्रकाश राज राजकारणातही अगदी आपलं मत स्पष्ट मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे.  प्रकाश राज प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत परखड मत मांडणारे व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत.  

4. निवेदिता भट्टाचार्य

एकता कपूरच्या अनेक मालिकांमधून काम करणाऱ्या निवेदिता भट्टाचार्यला कोण ओळखत नाही? बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा खलनायक के. के. मेनन यांच्यासह निवेदिताने लग्न केलं. यांच्या लग्नालाही बरीच वर्ष झाली आहे. निवेदिताने स्वतःही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांची जोडी अप्रतिम असून अनेकांना यांची जोडी आवडते. 

खळबळजनक कृत्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या पूनम पांडेने केला साखरपुडा

5. कृतिका सेंगर

View this post on Instagram

The Happiest wherever I'm with YOU 💕

A post shared by Kratika S Dheer (@itsmekratika) on

‘राणी लक्ष्मीबाई’, ‘कसम तेरे प्यार की’ सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी नायिका म्हणजे कृतिका सेंगर. कृतिकाने बॉलीवूडमधील खलनायक निकेतन धीरसह 2014 मध्ये लग्न केलं. आपल्या सोशल मीडियावर दोघेही नेहमीच एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करत असतात. निकेतन आणि कृतिका एकमेकांना खूप वर्ष ओळखत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. निकेतन हा अभिनेता पंकज धीरचा मुलगा असला तरीही त्याने खलनायकाच्या भूमिका साकारून आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मधील थंगबलीची त्याची भूमिका खूपच गाजली. 

सुपरस्टार होण्यासाठी या कलाकारांनी बदललं स्वतःचं नाव

6. नेहा

View this post on Instagram

With family in LA .#4thjuly#independence#longholiday

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj) on

बॉलीवूडमध्ये काही चित्रपटात काम करून नेहाने बॉलीवूडचा ‘भिकू म्हात्रे’ अर्थात मनोज वाजपेयीशी 2005 मध्ये लग्न केलं. ‘करीब’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेली नेहा ही मूळची मुस्लीम कुटुंबातील असून तिचं नाव शबाना रझा असे होते. मात्र तिने मनोज वायपेयीशी लग्न केले आणि आता दोघेही सुखाचा संसार करत आहेत. तिने अनेक चित्रपटात काम केले.  मात्र लग्नानंतर ती संसारातच रमली.