'या' अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी

'या' अभिनेत्रींप्रमाणेच सुंदर आहेत त्यांच्या बहिणी

बॉलीवूडमध्ये एक से एक सुंदर अभिनेत्री आहेत. ज्यांच्या बहिणीही दिसायला सुंदर आहेत. पण त्या आपल्या सेलेब्स असलेल्या बहिणींसारखं लाईमलाईटमध्ये राहण पसंत करत नाहीत. पण काही अभिनेत्री अशाही आहेत ज्यांच्या बहिणीही लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहेत. आज आपण अशाच सेलिब्रिटी आणि त्यांच्या बहिणींबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांच्याबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे.

अनिशा पदुकोण

बॉलीवूडची पद्मावती अभिनेत्री दीपिका पदुकोणची बहीण आहे अनिशा पदुकोण. अनिशा आपल्या वडिलांप्रमाणेच एक स्पोर्ट्समन आहे. ती एक गोल्फर आहे. खेळाच्या दुनियेशी संबंध असणारी अनिशा मात्र बरेचदा बहीण दीपिकासोबत दिसते. तसंच दीपिकाही बरेचदा आपल्या बहिणीसोबतचे फोटोज तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असते.

शगुन पन्नू

View this post on Instagram

❤️

A post shared by Shagun Pannu (@shagun_pannu) on

आपल्या सिनेमांच्या हटके आणि धाडसी निवडीने थोड्याच काळात बॉलीवूडमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू. तिच्या नुकत्याच आलेल्या थप्पड चित्रपटाने तिने स्वतःचं अभिनयाचं पारडं जड असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. तापसीची स्वतःची वेडिंग प्लानर कंपनी आहे. ही कंपनी तापसीची बहीण शगुन पन्नू सांभाळते. तापसीही नेहमीच आपल्या बहिणीसोबतचे फोटो शेअर करत असते.

इसाबेल कैफ

बॉलीवूडची कॅट अनेकांची आवडती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, कतरिनाची लहान बहीण इसाबेलही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इसाबेलने आपल्या डेब्यू चित्रपटाचं शूटींगही पूर्ण केलं आहे. ती एका जाहिरातीतही झळकली होती. इसाबेल दिसायला एकदम कतरिनाची कॉपी आहे.

सुरीली गौतम

विकी डोनरमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. यामीची बहीण म्हणजे सुरीली गौतम. तीही लवकरच बॉलीवूडमध्ये झळकणार आहे. तिच्या आगामी बॅटल ऑफ सारागढी या चित्रपटाचं शूटींग पूर्ण झालं आहे. हा चित्रपट सारागढी युद्धावर आधारित आहे. यामीची बहीण सुरीलीने टीव्हीवरही काम केलं आहे.

समीक्षा पेडणेकर

यशराज बॅनरच्या दम लगाके हाय्येशा चित्रपटातून भूमी पेडणेकरने डेब्यू केला होता. तिची छोटी बहीण समीक्षा पेडणेकर अगदी बऱ्यापैकी सारख्या दिसतात. त्या इन्स्टावर नेहमी फोटो शेअर करत असतात.

नुपूर सनोन

कृती सनोनची बहीण नुपूर सनोन हीसुद्धा अभिनेत्री आहे. नुपूरने नुकताच अक्षय  कुमारसोबत एक म्युझिक व्हिडिओ केला होता. अशीही चर्चा आहे की, ती साजिद नडियादवालाच्या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

मग तुम्हाला आवडल्या का या बहिणींच्या सुंदर जोड्या. तुमची आवडती सेलिब्रिटी कोण आहे आणि तिच्या भावंडांबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.