या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या 'आई'सारख्या

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या 'आई'सारख्या

बॉलीवूडमध्ये स्टार किड्सची नेहमीच चर्चा असते. मात्र यात जास्त चर्चा असते ती कलाकारांच्या मुलींची. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीजच्या मुली अगदी त्यांच्या आईसारख्याच दिसतात. वास्तविक मुलं बऱ्याच अंशी त्यांच्या आई-वडिलांसारखे दिसत असतात. मात्र जेव्हा एखादी अभिनेत्री हुबेहूब तिच्या आईसारखी दिसत असते तेव्हा तिच्याबद्दल अनेकांना कुतूहल वाटत असतं. मोठं झाल्यावर या मुली जेव्हा सिनेसृष्टीत पदार्पण करतात. तेव्हा त्यांच्याकडून चाहते त्यांच्या आईप्रमाणेच अभिनयाची अपेक्षा करू लागतात. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या आईप्रमाणे दिसतात.

सारा अली खान- अमृता सिंह

सध्या बॉलीवूडमध्ये सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे अमृता सिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानची. साराने केदारनाथ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. साराच्या सिम्बामधील कामाचंदेखील फार कौतुक झालं होतं. सारा अली खान तिच्या आईसारखी दिसते. साराला पहिल्यांदा पाहताच सर्वांच्या तोंडात आलं होतं, “अरे, ही तर सेम टू सेम अमृतासारखी दिसते.”  सारा नेहमी अगदी नम्रपणे वावरता दिसते. स्टार किड असूनही तिच्या वागण्यातून तसं कधीच दिसत नाही. साराच्या चाहत्यांना तिचा हा स्वभाव फार आवडतो. ज्यामुळे तिचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच तो पाहण्यासाठी चाहते गर्दी करतात. 

Instagram

सोहा अली खान- शर्मिला टागोर

सोहा अली खान दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आणि नवाब खान पतौडी यांची मुलगी आहे. 2004 साली या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. सोहा अली खानला पाहताच ‘कश्मिर की कली’ शर्मिला टागोरची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. सोहाने अभिनेता कुणाल खेमूशी लग्न केलं आहे. या दोघांना इनाया नावाची गोंडस मुलगीदेखील आहे. आता इनायादेखील तिची आई सोहा अली खान सारखी दिसणार का अशी चर्चा सर्वत्र होत आहे.

Instagram

श्रुती हसन - सारिका

एकेकाळची सुंदर अभिनेत्री सारिका आणि साऊथ आणि हिंदीतील दिग्गज अभिनेता कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन. श्रुतीदेखील अगदी तिच्या आईसारखीच दिसते. श्रुती तिच्या आई-वडिलांप्रमाणेच बॉलीवूडमध्ये लोकप्रिय ठरेल यात शंका नाही. कारण ती सध्या हिंदी, तमिळ, तेलुगू अशा सर्वच भाषांमधील चित्रपटात काम करत आहे. 

Instagram

श्रद्धा कपूर- शिवांगी कोल्हापूरे

श्रद्धा कपूर ही अभिनेत्री शिवांगी कोल्हापूरे आणि अभिनेता शक्ती कपूर याची मुलगी आहे. श्रद्धा तिच्या आईसारखी दिसतेच मात्र तिच्यामध्ये तिची मावशी आणि बॉलीवूड अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची छलकदेखील दिसते. श्रद्धा कपूर सध्या अनेक बॉलीवूड चित्रपटातून झळकत आहे. 

Instagram

इशा देवोल - हेमामालिनी

ड्रिमगर्ल हेमामालिनीचे आजही अनेक चाहते आहेत. हेमामालिनीला दोन मुली आहेत. त्या दोघींमध्ये हेमामालिनीच्या लुक्सची झलक पाहता येते. इशा देवोल मात्र सेम टू सेम तिच्या आईसारखीच वाटते. इशा नुकतीच दुसरी मुलगी झाली आहे. तिच्या दोन्ही मुली आराध्या आणि मिरायादेखील इशाप्रमाणेच दिसतात. 

Instagram

अनन्या पांडे - भावना पांडे

चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडेने नुकतच ‘स्टुडंट ऑफ दी इअर 2’ मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ज्यामधून अनन्याच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अनन्यादेखील तिची आई भावना पांडेसारखी दिसते. लवकरच ती वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येण्याची शक्यता आहे.

Instagram