ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
बॉलीवूड अभिनत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार

बॉलीवूड अभिनत्री ज्यांनी थाटला क्रिकेटर्ससोबत संसार

बॉलीवूडप्रमाणेच क्रिकेट या खेळालाही एक ग्लॅमर आहे. त्यामुळे बॉलीवूड अभिनेत्री बऱ्याचदा क्रिकेटर्सच्या प्रेमात पडताना दिसतात. आजवर अनेकींची नावे भारतीय आणि अभारतीय क्रिक्रेटर्ससोबत जोडली गेली आहेत. त्यातील काही जोड्यांना यश आलं तर काहींना एकमेकांची साथ अर्ध्यावरच सोडावी लागली. मात्र यातील अनेकींनी त्यांचा संसार क्रिकेटर्ससोबत थाटला आहे. यासाठीच जाणून घेऊ या बॉलीवूडच्या अशा तारका ज्यांनी क्रिकेटर्ससोबत लग्न केलं आहे. 

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी कन्यारत्न झालं आहे. त्यांनी लग्नानंतर तीन वर्षांनी आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इटलीमध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्याआधी दोघंही एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडाली होती. चार वर्ष एकमेकांना डेट करून मग त्यांनी 2017 लग्नाचा निर्णय घेतला होता. 2013 मध्ये एका जाहिरातीसाठी दोघं एकत्र आली होती त्यादरम्यानच त्यांच्यात प्रेमाचे वारे वाहू लागले होते. आज हे बी टाऊनचं एक सेलिब्रेटी कपल आहे.

instagram

ADVERTISEMENT

जहीर खान आणि सागरिका घाटगे –

शाहरूखच्या ‘चक दे इंडिया’ आणि ‘इरादा’सारख्या चित्रपटात स्वतःचं नाव निर्माण केलेली मराठमोळी सागरिका अचानक जहीर खानच्या प्रेमात पडली. दोन वर्षांपूर्वी तिने गुपचूप मुंबई कोर्टामध्ये जहीरशी लग्न केलं. त्यानंतर ताजमध्ये फक्त काही मोजक्या लोकांसाठी ताजमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. त्या दोघांना पहिल्यांदा युवराज सिंहच्या लग्नात एकत्र पाहिलं होतं. त्यानंतर त्यांच्यात प्रेमाची खिचडी शिजत आहे हे चाहत्यांच्या लक्षात आलं. 

instagram

युवराज सिंह आणि हेजल किच –

हेजल किचने सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’मध्ये एक भूमिका साकारली होती. मात्र तिला बॉलीवूडमध्ये स्वतःची विशेष ओळख निर्माण करता आली नाही. त्यानंतर तिचं क्रिकेटर युवराज सिंहशी नातं जुळलं. काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी 2016 मध्ये धुमधडाक्यात आणि पारंपरिक पद्धतीने अगदी थाटामाटात लग्न केलं. 

ADVERTISEMENT

instagram

हरभजन सिंह आणि गीता बसरा

‘दी ट्रेन’ या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री गीता बसरा हिने बॉलीवूडच्या अनेक पंजाबी चित्रपटात काम केलेलं आहे. पंजाबी चित्रपटात प्रसिद्ध असूनही तिच्या आणि हरभजनच्या प्रेमप्रकरणाची खबर कोणालाच लागली नाही. या दोघांनी अचानक 2015 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही गोष्ट सर्वांना समजली. त्याआधी ते दोघं एकमेकांना जवळजवळ पाच वर्षे डेट करत होते. त्यांच्या लग्नाला आता बरीच वर्षे झाली असून त्यांना एक गोंडस मुलगीदेखील आहे.

ADVERTISEMENT

instagram

मोहम्मद अझरउद्दीन आणि संगिता बिजलानी

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी हिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलं होतं.संगिता बिजलानी मिस इंडिया होती आणि ती तेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावही होती. मात्र अचानक तिने क्रिकेटर मोहम्मद अझरउद्दीनसोबत विवाह केला. त्याचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. पुढे त्यांनी घटस्फोट घेतला आणि एकमेकांचा मार्ग मोकळा केला. लग्नाआधी तिचं नाव अभिनेता सलमान खानसोबतही जोडलं गेलं होतं. 

instagram

ADVERTISEMENT

मंसूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि नवाब मंसूर अली खान पतौडी यांनी सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाह केला.  या दोघांना सैफ अली खान, सोहा अली खान आणि सबा अली खान ही तिन मुले आहेत. सैफ आणि करिनालाही तैमूरनंतर आता दुसरा मुलगा झाला आहे. तर सैफ आणि अमृताची सारा अली खान आणि  इब्राहिम ही दोन मुलं आहेत. 

instagram

फोटोसौजन्य –  इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

या बॉलीवूड अभिनेत्री हुबेहूब दिसतात त्यांच्या ‘आई’सारख्या

लग्नाआधीच आई झाल्या या बॉलीवूड अभिनेत्री

‘या’ बॉलीवूड अभिनेत्री एकेकाळी होत्या ‘बालकलाकार’

ADVERTISEMENT
23 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT